प्रस्तावना:-
कांदा हे व्यापारी दृष्ट्या सर्वात महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे.भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणाऱ्या राज्यातील क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी आहे .महाराष्ट्रामध्ये अंदाजे १ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते .महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे,सोलापुर ,जळगाव, धुळे ,अहमदनगर ,सातारा या जिल्ह्यांमध्ये कांदा हे पिकवण्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्या बाबतीत प्रसिद्ध आहे .एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील ३७ टक्के तर भारतातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.
हवामान :-
कांदा हे हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्टातील सौम्य हंगामात कांद्याची २ ते ३ पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून १ ते २ महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागतांना.तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्त असते
जमीन:-:-
पाण्याची उत्तम रित्या निचरा होणारी भुसभुशीत व सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असलेली मध्यम ते कसदार जमीन कांद्याला चांगली मानवते.
पूर्वमशागत :-
जमिनीची उभी आडवी नांगरणी करून व देकले फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत हेक्टरी ४० ते ५० तन शेणखत मिसळावे.
लागवड हंगाम:-
महाराष्ट्रातील कांद्याची लागवड खरीप हंगामात जुने ते ऑक्टोंबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जुने महिन्यात करतात.
वाण:-
बसवंत ७८०:
खरीप व रब्बी हंगामासाठी हि जात योग्य असून या जातीचा रंग गडद लाल असतो.कांदे आकाराने मध्यम व मोठे आकाराचे असतात. हि जात १०० ते १० दिवसात तयार होते. हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल मिळते.
एन-५३:
हि जात खरीप हंगामासाठी योग्य आहे. १०० ते १५० दिवसात तयार होते. या जतिचा रंग लाल भडक असतो. हेक्टरी उत्पादन २०० ते २५० क्विंटल मिळते.
एन-२-४-१:
हि जात रब्बी हंगामासाठी योग्य असून रंग भगवा व विटकरी आहे. कांदा आकाराने मध्यम गोल असून साठवणुकीत हा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे टिकतो. हि जात १२० ते १३० दिवसात तयार होते. हेच्क्टारी उत्पादन ३०० ते ३५० किव्न्तल मिळते.
पुसा रेड :-
कांदे मध्यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्यम तिखट असतात. लागवडीपासून १२० दिवसात तयार होतात. हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल मिळते.
बियाण्याचे प्रमाण:-
हेक्टरी कांद्याचे १० किलो बियाणे पुरेसे असते.
लागवड:-
कांद्याची रोपे, गादी वाफे करणाऱ्या क्षेत्राची खोल नागरटी करून कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. गादी वाफा १ मी रुंद ३ मी लांब १५ सेमी उंच करावा. वाफ्यातील देकले निवडून बाजूला काढावीत. वाफ्याच्या रुंदीशी समांतर अशा ५ सेमी बोटाने रेषा पाडाव्यात.
झारीने पाणी घालावे. बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे .फुलकिडे व करपा यांच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायथेन एम-45 तसेच 50 ग्रॅम युरिया व १० मिली सॅडोवीट चिकट यासारखे द्रव्य मिसळून दर १० दिवसाच्या अंतराने ४ ते ५ फवारण्या कराव्यात. रोपांना हरभऱ्याच्या आकाराची गाठ तयार झाली की रोप लागवडीत योग्य समजावे .खरीप कांद्याची रोपे ६ ते ७ आठवड्यांनी८ ते १० आठवड्यांनी तयार होतात . रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर पाणी द्यावे .कांद्याची लागवड गादीवाफा यावर तसेच सरी-वरंब्यावर करता येते. यामध्ये हेक्टरी रोपांचे प्रमाण जास्त असले तरी मध्यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्पादन मिळते. सपाट वाफा २ मीटर रुंद व त्यांची लांबी ठेवावी .रोपांची लागवड सकाळी अथवा संध्याकाळी करावी रोपांची लागवड करावी .
खते व पाणी व्यवस्थापन:-
कांदा पिकास हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी घ्यावे त्यानंतर एक महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. नत्र स्फुरद व पालाश याचे टक्केवारी आपल्या ॲपच्या खते कॅल्क्युलेटर द्वारे नियोजन करावे .कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्त्वाचे असते .खरीप हंगामात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळी रब्बी हंगामात ६ ते ८ दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे .
आंतरमशागत:-
रोपांच्या लागवडी नंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी ३ आठवड्या अगोदर पाणी बंद करावे म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो आणि आणि माना कडून कांदा काढणीस तयार होतो.
रोग व कीड:-
कांद्यावर प्रमुख रोग म्हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो पाठीवर लांबट गोल तांबूस के पडतात शेंड्यापासून पाने आल्यासारखे दिसतात खरीप कांद्यावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो फुलकिडे किंवा ओव्या आहेत तरी अगदी लहान आकाराचे कीटक पाठीवरील तेलगट पृष्ठभागात करतात व त्यात असतात त्यामुळे पाठीवर पांढरे ठिपके पडतात
उपाय :-
काढणी व उत्पादन:-
कांद्याचे पीक लागवडीनंतर तीन ते 4.5 महिन्यात काढणीस तयार होते कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते यालाच मान मोडणे असे म्हणतात मोडल्यावर कांदा काढणी पक्व झाला असे समजावे कुदळीच्या सहाय्याने आजूबाजूची जमीन करून कांदे उपटून काढावेत काढणीनंतर चार-पाच दिवसांनी कांदापातीचे सकट शेतात लहान-लहान डिग्र्या च्या रूपाने ठेवावा नंतर कांद्याची पात व मुळे कापावे दात काढताना 3 ते 4 सेमी लांबीचा ठेवून पात कापावी यानंतर कांदा चार ते पाच दिवसात सावलीत सुकवावे हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.