काकडी :-
प्रस्तावना
काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते . काकडी कोकणासारख्या अतिपर्जान्यांच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते . काकडी पासून कोशिंबीर बनविली जाते .त्यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्ये दररोज उपयोग होतो . महाराष्ट्रामध्ये अंदाजे ३७११ हेक्टरवर या पिकाची लागवड होते .
हवामान आणि जमीन :-
काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढणारे पिक आहे . पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन या पिकास योग्य असते .
लागवडीचा हंगाम ;-
काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात जून -जुलै महिन्यात करतात .
वाण
शीतल वाण :-
हि जात डोंगर उताराच्या हलक्या आणि जास्त पावसाच्या प्रदेशात ४५ दिवसांनी फळे चालू होतात . फळे रंगानी हिरवी व मध्यम रंगाची असतात .कोवळ्या फळांचे वजन २०० ते २५० ग्राम असते . हेक्टरी उत्पादन ३० ते ३५ टन मिळते .
पुना खीरा :-
या जातीमध्ये हिरवे आणि पिवळत तांबडी फळे येणारे दोन प्रकारचे बियाने बाजारात मिळते .हि लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात . हि जात उन्हाळी हंगामात चांगली असून हेक्टरी उत्पादन १३ ते १५ टन मिळते .
प्रिया :-
हि संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात . हेक्टरी उत्पादन ३० ते ३५ टन मिळते .
पुसा संयोग ;-
लवकर येणारी जात असून फळे हिरव्या रंगाची असतात . हेक्टरी उत्पादन २५ ते ३० टन मिळते .या शिवाय पॉइंट सेट , हिमांगी ,फुले शुभांगी यासारख्या जाती लागवडीस योग्य आहेत .
बियाणे प्रमाण :-
या पिकाकरीता हेक्टरी २.५ ते ४ किलो बियाणे लागते .
पूर्वमशागत व लागवड ;-
शेतात उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखरणी करावी .उन्हाळी हंगामासाठी ६० ते ७५ सेमी अंतरावर सरया पडून घ्याव्यात . खरीप हंगामात कोकण विभागास काकडीची लागवड करावयाची असल्यास दर ३ मीटर अंतरावर ६० सेमी रुंदीचे ३० सेमी खोलीचे चार खोडून चारांच्या दोन्ही बाजूंना ९० सेमी अंतरावर ओळी ३० *३०*३० सेमी अंतरावर आकाराचे खड्डे तयार करावेत प्रत्येक खड्ड्यात २ ते ४ किलो शेणखत मिसळावे . प्रत्येक आल्यात ३ ते ४ बिया योग्य अंतरावर लावाव्यात .
खते व पाणी व्यवस्थापन :-
काकडी पिकास ५० किलो नत्र ५० किलो पालाश ५० किलो स्फुरद लागवडीपूर्वी द्यावे . व लागवडीनंतर १ महिन्याने नत्राचा ५० किलोचा दुसरा हप्ता द्यावा व पावसाळ्यात ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे .
आंतरमशागत ;-
काकडीचे वेलांना आधार दिल्यास फळांची प्रतीक्षा सुधारते परंतु ते खर्चिक असल्याकारणाने महाराष्ट्रामध्ये काकडीचे पिक जमिनीवर घेतले जाते . लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी पिकातील गावात काढून टाकावे . फळे लागल्यानंतर फळांचा संपर्क मातीशी येऊ नये म्हनून फालान्खाली वाळलेल्या काटक्या घालाव्यात .
काढणी व उत्पादन :-
फळे कोवळी असतांनाच काढणी करावी म्हणजे बाजारात चांगला भाव मिळतो . काकडीची तोडणी दर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने करावी . जाती व हंगामानुसार काकडीचे हेक्टरी २०० ते ३०० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते .