प्रस्तावना :-
पालक हि अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते. पालकातील षोषण मुल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे.
पालकाच्या बह्जीत अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणत असतात तसेच प्रोटीन्स आणि कॅल्शियम, लागवडीसाठी लोह, फोस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणत असतात . पालकांचा उपयोग भाजी आमटी सूप भजी इत्यादीमध्ये करतात. पालकाची भाजी काही प्रमाणत सारक आहे.
हवामान:-
पालक हे कमी दिवसात तयर होणारे हिवाळी पिक असल्यामुळे महाराष्ट्रात कडक उन्हाळ्याचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते थंड हवामानात पालकाचे उत्पदान जास्त मिळून दर्जा चांगला राहतो. तर तापमान वाढल्यास पिक लवकर फुलो -यावर येते आणि दर्जा खालावतो.
जमीन:-
पालकाचे पिक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पिक चांगले येऊ शकते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके शकत नाहीत तेथे पालक घेता येते.
सुधारित जाती:-
पालक आँल ग्रीन पुसा ज्योती, पुसा हरित या पालकाच्या भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली तेथे विकसित करण्यातालेल्या सुधारित जाती आहेत.
लागवड :-
महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळ जवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून - जुलै मध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर ऑक्टोंबर केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी १० ते १५ दिवसांच्या अंतराने हप्ता हप्त्याने बियाणी पेरणी करावी.
पालक हे कमी दिवसात तयार होणारे पिक असल्यामुळे जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फेकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्यास वाफसा आल्यावर पेरणी करावी. बी ओळीत पेरतांना दोन ओळीत २५-३० सेंटी मीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्यास पिकाची वाढ कमजोर होऊन पानांचा आकार लहान राहतो. आणि पिकांचा दर्जा खालवतो .लागवडीपूर्वी बियाण्याला थायरम या बुरशीनाशकाची २ ग्राम दर किलो बियाण्याला या प्रमाणत प्रकिया करावी. त्यामुळे मर रोगाला प्रतीबंद होतो. पालकाच्या एक हेक्टर लागवडीपासून २५-३० किलो बियाणे लागते.
खते व पाणी व्यवस्थापन :-
पालक हे कमी कालावधीचे पिक असले तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकाचे उत्पदान व प्रतीक्षा अवलंबून असल्यामुळे पालकाच्या वापर करावा लागतो.तसेच पिकला पाण्याचा नियमित पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणे आवश्यक आहे.
पालकाच्या पिकला जमिनीच्या मगदुरापासून हेक्टरी २० गाड्या शेणखत ८० किलो नत्र ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. शेणखत पूर्वमशागत वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश १/३ नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र २ समान भागांत बिभागातून पहिल्या आणि दुसरया कापणीच्या वेळी द्यावे. ज्या जातीमध्ये दोन पेक्षा जास्त कापण्या करता येतात . तेथे प्रत्येक कार्पनिनंतर हेक्टरी २० किलो नत्र द्यावे.
पानातील हिरवेगार अधिक चांगला येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बी उगून आल्यानंतर १५ दिवसांनी आणि प्रत्येक कापणी नंतर १.५% युरिया फवारावा. बियांच्या पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. किवा वापसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पिकला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात पालच्या पिकला १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो.
कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण:-
पालकावर मावा, पाने, कुरतडणारी अटी आणि भून्गरे यांचा उपद्रव आढळतो. या किडींच्या नियंत्रणासाठी पिक लहान असतांनाच ८ ते १० दिवसांच्या अंतराने १५ मिली एन्डोसल्फॉन (३५ टक्के प्रवाही ) १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. काढणीच्या ८ ते १० दिवस आधीच फवारणी करू नये. पाल्कावर मर रोग, पानांवरील ठिपके, तंबोरा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो.मर रोगामुळे उगवण झाल्यावर रोपांची मर होण्यास सुरुवात होते. ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा कराव. आणि पेरणीपूर्वी बियाण्यावर थायरम ह्या बुर्शिनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आद्रता वाढल्यास पानांवर गोल करड्या रंगाचे बांगडीच्या आकाराचे डाग पडतात. ह्या बुर्शिज्यान्या रोगामुळे पिकाचे मोत्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकाची उदाहरणार्थ ,ब्लॉयटॉक्स किवा कॉपर आँक्सिक्लोराईड १० लिटर पाण्यात २० ग्रामह्या प्रमाणत मिसळून फवारणी करावी.
केवडा आणि तंबोरा रंगाचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्यास या रोगांना आळा बसतो.
काढणी उत्पादन आणि विक्री :-
पेरणी नंतर सुमारे १ महिन्याने पालक कापणीला तयार होते. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने १५ ते ३० सेंटीमीटरउंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनिपासून ५ ते ७.५ सेमी भाग ठेऊन वरील भाग खाडून अथवा कापून घ्यावा. आणि पानांच्या जुड्या बांद्याव्यात.
त्यानंतर १५ दिवसाच्या अंतराने जातीनुसार ३-४ किवा त्यापेक्षा जास्त खुडे करावेत .
कापणी करतानाचं खरब रोपे वेगळी काढून जुड्या बांद्याव्यात काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा. जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेऊन किवा बांबूच्या टोप्ल्यामध्ये अगर पोत्यामध्ये व्यव्स्थित रचून भरून विक्रीसाठी पाठव्यावत. टोपलीच्याखाली आणि वर कडुनिम्बाचा पाला ठेवल्यास पालक लागाव्दिसाठीवर खब होत नाही वाहतुकीस जुद्यांवर अधून मधून थंड पाणी शिंपडल्यामुळे पानांचा तजेलदारपणा टिकून राहतो.
मात्र पाणी जास्त झाल्यास साधण्याची क्रिया सुरु होते. म्हणून जुद्यांवर जास्त प्रमाणत पाणी मारू नये. पालकाचे उत्पादन पिकाच्या लागवडीची वेळ, जात खुडे आणि पिकाची योग्य काळजी यांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे हेक्टरी १० ते १५ एवढे उत्पादन मिळते. शिवाय बियाण्याचे उत्पादन १.५ टनापर्यंत मिळू शकते.