शेवगा:-

महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यांमध्ये देखील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू आहे. अशा परीस्तीमध्ये शेवगा लागवड फायदेशीर ठरते. कारण,शेवगा पिकासाठी ठराविक प्रकारीच जमीनच असावा अस काही नाही , हलक्या जमिनीत देखील शेवगा पिकाची लागवड करणे शक्य आहे शेवगा पिकासाठी पाण्याची गरज देखील इतर पिकांच्या तुलनेने कमी आहे. 

शेवगा लागवडी संबधी :-

शेवगा लागवडीसाठी जून जुलै महिन्यांमधील पहिल्या पावसानंतरचा काळ अनुकूल असतो,कारण या वेळी हवेतील आद्रता वाढते .जेणेकरून उन्हाची तीव्रता देखील देखील कमी असते. 

शेवगा लागवड करण्यासाठी पूस पडण्याच्या अगोदर दोन फुट लांब, रुंद आणि खोल खड्डे खोदावेत व रोपे लावावीत शेवग्याची रोपे जर बियांपासून अभिवृद्धी केलेले असतील. तर मातृव्रूक्षातील अनुवांशिक गुण (true to type) झाडे मिळत नाहीत तसेच फळ धारणा देखील शाखीय पध्दतीने केलेल्या अभिवृध्दिपेक्षा ३ ते ४ महिना उशिरा होते.

शाखीय पध्दतीने म्हणजे फाटे कलम वापरून अभिवृद्धी केल्यास झाडाला शेंगा लवकर लागतात. कतीन्ग्स (फातेकालम ) लागवड करण्यासाठी  आकाराच्या जाडीची तसेच १ ते १५ मीटर लांबीची फांदी काडी वापरावी. 

खत व्यवस्थापन :-

शेवगा पिक वेगाने वाढणारे पिक आहे.,म्हणून पावासाच्या सुरुवातीला किवा पावसाळ्यात प्रत्येक झाडाला १० किलो काम्पोस्ट/शेणखत ,७५ ग्रामनात्र (१६५ ग्राम युरिया ) ५० ग्राम स्फुरद (१०८ ग्राम डी. ए.पी.) व ७५ गरमपालाश (१२० ग्रामएम.ओ.पी.)द्यावे.

हवामान :-

शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते सर्वसाधारण पाने २५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ चांगली होते. तसेच तापमान ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास फुलगळ होते. 

लागवडीसाठी जमीन :-

शेवग्याची लागवड हलक्या , माळरान जमिनीत तसेच डोंगरउताराच्या जमिनीत करता येते. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये.जमिनीचा सामू ६-७.५ असावा. 

जाती:-

शेवग्यासाठी कोकण रुचिरा,पी. के.एम-१ ,पी.के.एम.-३,जाफना ,चेम मुन्रांगा या वाणांचा करावा.

फाटे कलम न मिळाल्यास पॉलीथीनच्या पिशवीत बियांपासून रोपे तयार करून लागवड करावी. एक ते दोन महिन्याची रोपे लागवडीकरिता ५०० ग्रामबियाणे लागते. बियासाठी नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये चौकशी करावी. 

लागवड करण्यापूर्वी पावसाळ्यापूर्वी ६०*६०*६०* आकाराचे खड्डे घ्यावेत. हे खड्डे चांगली माती एक घेमेले कुजलेल्या शेणखत,२५० ग्रामसुफला (१५.१५.१५)

आणि ५० ग्रामफॉलीडॉल पावडर टाकून भरावेत. 

बहुवर्षीय वाणासाठी ४*४ मीटरवर लागवड करावी व एक वर्षीय वाणासाठी २.५*२.५ मीटरवर लागवड करावी.

व्यवस्थापन :-

शेवग्याच्या झाडास दरवर्षी १० किलो शेणखत,१७० ग्राम युरिया ४७० ग्राम ,सुपर फॉस्फेट व १२५ ग्राम म्युरेट ऑफ पोटाश हि खते द्यावीत ( माती परीक्षणानुसार खते द्यावीत.)

शेवग्याच्या झाडाची लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यानंतर पहिली ७ ते ८ महिन्यांनी दुसरी छाटणी करावी. पहिल्या छाटणीच्या वेळी झाडाचे मुख्य खोड जमिनिपासून  एक मिटर अंतरावर छातावे. आणि दुसर्या छाटणीच्या वेळी फांद्या छाटाव्यात.

शेवगाच्या लागवडीनंतर ८ ते १० महिन्यांनी शेवग्याच्या शेंगा काढणीस तयार होतात. शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून सुमारे ३० ते ३५ किलो हिरव्या शेंगा मिळतात.