कोशिंबीर :-
प्रस्तावना :
कोथिंबिरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते . कोथिंबीरच्या विशिष्ट स्वादायुक्त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते . मात्र कोथिंबीरिची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते .उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते . त्यामुळे कोथिंबिरीच्या लागवडीस चांगला वाव आहे . कोथिंबीर हि रोजच्या आहारात वापरली जाणारी महत्वाची पालेभाजी आहे . कोथिंबिरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानावर इतर भाज्याचा स्वाद वाढविण्यासाठी शाकाहारी तरी मासाहारी पदार्थामध्ये कोथिंबिरीच्या वाड्या चटणी आणि कोथिंबिर लोकप्रिय आहे .
हवामान आणि जमीन
कोथिंबिरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते त्यामुळे अतीपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबिरीची लागवड ३६ अंश सेल्सिअस च्या वर गेल्यास कोथिंब्रीची वाढ कमी होते. कोथिंबिरीच्या पिकासाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी . सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत कोथिंबिरीचे पिक चांगले येते .
सुधारित जाती ;-
नंबर ६५ टी ५३६५ एन पीजे १६ व्ही १ व्ही २ आणि को -१, डी -९२ डी -९४ जे २१४ के ४५ या कोथिंबिरीच्या स्थानिक आणि सुधारित जाती आहेत .
लागवडीचा हंगाम :-
कोथिंबिरीची खरीप , रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात लागवड करतात . उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्यात कोथिंबिरीचे उत्पादन घ्यावे .
लागवड पद्धती ;-
कोथीबिरीच्या लागवडीसाठी शेत उभे आडवे नांगरून चांगले भुसभुशीत करून ३*२ मीटर आकाराचे सपाट वाफे बांधून घ्यावे . प्रत्येक वाफ्यात ८ ते १० किलो चांगली कुजलेली शेणखत टाकून मिसळून घ्यावे .वाफे सपाट करून बी सारखे पडेल या बेताने फेकून पेरावे . बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे . तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्यास सपाट वाफ्यांमध्ये १५ ते २० सेमी अंतरावर खुरप्याने उथळ ओळी पडून बी पेरावे आणि नंतर मातीने झाकून घ्यावे . उन्हाळी हंगामात पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावे . आणि वाफसा आल्यावर बीयाने पेरावे . कोथिंबिरीच्या लागवडीसाठी हेक्टरी ६० ते ८० किलो बी लागते . पेरणीपूर्वी बियाण्यांवर चांगली उगवण होण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे . पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळ्या कराव्यात यासाठी धने चपलेने अथवा लाकडी फळीने रगडून बी वेगळे करावे . तसेच पेरणीपूर्वी धाण्याचे बी १२ तास पाण्यात उबदार जागी ठेवावे आणि नंतर लागवडीसाठी वापरावे . त्यामुळे उगवण १५ ते २० दिवसा ऐवजी ८ ते १० दिवसात होऊन कोथिंबिरीच्या उत्पादनात वाढ होते आणि काढणी लवकर होण्यास मदत होते .
खते आणि पाणी व्यवस्थापण ;-
कोथीबिरीच्या पिकाच्या चांगल्या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्टरी ३५ ते ४० गाड्या शेणखत जमिनीत मिसळून द्यावे . कोथिंबिरीच्या पिकाला पेरणीच्या वेळी ५० किलो १५-५-५ हे मिश्रण खत द्यावे . बी उगवून आल्यावर २०- २५ दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे . कोथिंबिरीच्या खोडवा घ्यावयाचा असल्यास कापनिनंतर हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे .कोथिंबिरीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे . सुरुवातीच्या काळात बियांची उगवण होण्यापूर्वी वाफ्याला पाणी देताना वाफ्याच्या कडेने वाळलेले गावात किंवा उसाचे पाचट लावावे .
कीड व रोग ;-
कोथिंबिरीवर फारसे रोग आणि कीडी दिसून येत नाही . काही वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव होतो .भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी लांब सी एस -६ सारख्या भुरी प्रतिबंधक जातीचा वापर करावा . आणि पाण्यात विरघळणारे गंधक वापरावे .
काढणी उत्पादन आणि विक्री :-
पेरणीपासून दोन महिन्यांनी कोथिंबिरीला फुले येण्यास सुरुवात होते . म्हणून त्यापूर्वी हिरवीगार आणि कोवळी लुसलुशीत असताना कोथिंबिरीची काढणी करावी . साधारणपणे १५ ते २० सेमी उंच वाढलेली परंतु फुले येण्यापूर्वी कोथिंबीर उपटून अथवा कापून काढणी करावी . नंतर कोथिंर्बिरीचा जुड्या बांधून गोन्पातात किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवावी . पावसाळी आणि हिवाळी हंगामात कोथिंबिरीचे हेक्टरी १० ते १५ टन उत्पादन मिळते तर उन्हाळी हंगामात ६ ते ८ टन उत्पादन मिळते .