मेथी:-
भाजीपाला पिकांमध्ये मेथी महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी असून मेथीचा वापर आहारातविविध प्रकारे करण्यात येतो. महाराष्ट्रात बहुतेक सर जिल्यांत मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात मेथीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्रातील हवामनात मेथीची पिके खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते.
भातीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्याटप्याने लागवड करुन्जावाल्जाव्ल वर्षभर मेथिचीपिक घेता येऊ शकता .
महत्व :-
मेथीची हिरवी पाने आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. मेथीच्या बियांचा म्हणजे मेथ्यांचा मसाल्यामध्ये आणि लोणच्यामध्ये उपयोग करतात. एठीची भाजी पाचक असून मेथीच्या भाजीमुळे यकृत आणि प्लिहायांची कार्यक्षमता वाधुउन पचनक्रिया सुधारते. मेठीमध्ये प्रोटीन्स आणि मॅग्नेशियम ,फोस्फरस ,पोटॅशियम ,लोह इत्यादी खनिजे तसेच अ आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणत असतात. मेथीच्या १०० ग्राम खाण्यायोग्य भागात पुढील अन्न घटक असतात.
अन्न घटक प्रमाण (०%)अन्न घटक प्रमाण (०%)
पाणी ८६ कार्बोहायड्रेट्स६.०
प्रोटीन्स ४.४ फॅटस् ०.९
तंतुमय पदार्थ १.१ खनिजे १.५
मॅग्नेशियां ०.०७ फॉस्फरस ०.००५सोडियम ०.०००८ कॅल्शियम ०.४
पोटॅशियां ०.०५ लोह ०.०२ सल्फर ०.०२ क्लोरीन ०.०२
जीवनसत्व अ ६४५० जीवनसत क ०.०५
उष्मांक (कॅलरिज )४९
हवामान आणि जमीन:-
मेथी हे थंड हवामान वाढणारे पिक आहे. विशेषतः कसुरी मेथीस थंड हवामान मानवते .म्हणून हिवाळ्यात ह्या मेथीची लागवड करतात.
मेथी हे कमी दिवसात तयार होणारे पिक आहे. विविध प्रकारच्या हमानात मेथीचे पिक येत असते तरी उष्ण हवामानात पिकाची वाढ कमी होऊन चांगल्या दर्जाची भाजी मिळत नाही. मेथीच्या लागवडीसाठी मध्यम ते कदर आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.
उन्नत जाती:-
मेथी हि शेंगा कुळातील पिक असून मेथीची मुख्य दोन प्रकार आहेत.
(१)कसुरी मेथी :
ह्या मेथीची पाने लहान,गोलसर असून तिची वाढ सुरुवातीला फाराच सावकाश होते. ह्या मेथीची रोपे लहान झुडूपवजाअसतात आणि फांद्या आणि देठ नेहमीच्या मेथिपेक्षा बारीक असतात. ह्या मेथीची फुले आकर्षक पिवळ्या रंगाची ,लांब दांड्यावर येणारी असून शेंगा लहान,कोयत्याच्या आकाराच्या आणि बाकदार असतात तर नेहमीच्या मेथिपेक्षा बारीक असतात.कसुरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते.
कसुरी मेठीमध्ये कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन )हि सुधारित जात असून,ती २ महिन्यात तयार होते. हि जात उशिरा तयार होणारी असली तर तिचे अनेक खुडावे घेता येतात. आणीही जात परसबागेत लावण्यास फारस उपयुक्त आहे.
(२)नेहमीची मेथी:-
हि मेथी लवकर वाढते.या मेथीला भरपूर फांद्या येतात आणि वाढीची सवय उभटअसते. या मेथीची पाने लंबगोल किवा गोलसर असतात. या मेथीची फुले फान्धारी असून ती शेंड्याकडे पाण्याच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी दोन किवा तीन येतात.
या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते. या मध्ये पुसा अर्ली बंचिंग हि सुधारित जात विकसित करण्यात आली आहे. बऱ्याचठिकाणी स्थानिक वाणांची लागवड केळी जाते. हिरवी, कोवळी कुसाकुशीत पाने,लवकर फुलावर ण येणे, कोवळेपणा जास्तीट जास्त टिकून राहणे.चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत.
लागवडीचा हंगाम:-
मेथी हे थंड हवामानतील पिक असले तरी महाराष्ट्रातील खरीप पिक घेतली जाते. मेथीची लागवड खरीप हंगामात जून -जुलैमहिन्यात आणि रब्बी हंगामात सप्टेंबर - ऑक्टोंबर महिन्यात करतात.
भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी पेरणी टप्याटप्याने करतात. समशीतोष्ण हवामान आणि पाण्याचा नियमित पुरवठा असल्यास मेथीची लागवड वर्षभर करता येते. परंतु थंड हवामानात उत्पादन आणि पिकाचा दर्जा चांगला मिळतो.
लागवड पद्धती :-
मेथीची लागवड सपाट वाफ्यांमध्ये २० ते २५ सेमी. अंतरावर ओळीतून पेरून किवा बी फेकून करतात.आंतरपीक म्हणून मेथीचे पिक घेताना मुख्य पिकामधील ओकल्या जागेत मेथीचे बी २०-२ सेमी अंतरावर पेरावे.
मेथीच्या लागवडीसाठी ३ २ मीटर आकाराचे किवा त्यापेक्षाअधिक लांबीचे सपाट वाफे तयार करून त्यात बी फोकून किवा ओळीत पेरणी करतात. पेरणीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. बी ओळीत पेरल्यास खुर्पनिआनी तन काढणे सोपे होते. तसेच कापणी करणे सोपे जाते. तसेच कापणी करणे सोपे जाते .
नेहमीची मेथी पेरणीनंतर ३ - ४ दिवसाचे उगवते . तर कसुरी मेथीची उगवण होण्यास ६-७ दिवस लागतात सध्या किवा नेहमीच्या मेथीच्या एक हेक्टार लागवडीसाठी २५- ३० किलो बियाणे लागते. आंतरपीक म्हणून घेतान बियाण्याचे लागते. आंतरपीक घेताना बियाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार ठेवावे. बियाणे याची दक्षता घ्यावी. तसेच बियांसाठी बिज्क्रिया करताना कॅप्टन ३ ग्राम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बियास चोळावे.
खते आणि पाणी व्यावस्थापण:-
पानांची चांगली वाढ होण्यास्तही मेथीच्या पिकला नत्रयुक्त खतांची आवश्यकता असली तरी हे शेंगा वर्गीय कुळातील पिक असल्यामुळे सुरुवातीला हेक्टरी २० किलो नत्र आणि त्यानंतर १५ दिवसांनी खुरपणी करून हेक्टरी २० किलो नात्र दिल्यास पिकाची वाढ जोमदार होते किवा पेरणीनंतर ३ आठवड्यांनी १० लिटर पन्यत१५० ग्राम युरिया मिसळून फवारणी केल्यास मेथीची उत्पादन आणि प्रत सुधारते.
पिकाचा खोडवा घेतल्यासही वरीलप्रमाणे खतांचा वापर खर्च करावा. मेथीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. कोवळी आणि लुसलुशीत भाती मिळण्यासाठी ४-६ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.पाण्याच्या नियमित पुरवठा केल्यास अधिक उप्त्पादन मिळवून खोडवेही जास्त येतात.
महत्वाच्या किडी,रोग,आणि त्यांचे नियंत्रण :-
मेठीवर मावा आणि पाने पोखरणारी आली या किडींचा प्रादुर्भाव होतो. मावा कीड काळसर रंगाची असून पानांच्या खालच्या भागावर आणि शेंड्यावर राहून मोठ्या प्रमाणात पानांमधील रस शोधून घेते. त्यामुळे रोपे निस्तेज होऊन मालाची प्रत खराब होते.
पाने पोखरणारी कीड पानांमधील रस शोषून घेत वेडीवाकडी पुढे जाते.त्यामुळे पानांवर पांढऱ्यारंगाच्या वेड्यावाकड्या ओळी दिसतात आणि मालाची प्रत खराब होते. ह्या किडीच्या नियंत्रणासाठी पिक लहान असतानाच १५ मिली मॅलॅथिआँन (५०% प्रवाही) १० लिटर पाण्यात मिसळून दर८ - १० दिवसांच्या ८ दिवस आधी औषध फवारू नयेत.
मेथीच्या पिकावर रोगावर फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र काही वेळा मररोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. बियांची दाट पेरणी करून नये. पिकला नियमित पाणी द्यावे आणि शेतात स्वच्छता राखावी.
मेथी पिकावर काही प्रमाणात मुळकुज,पानावरील ठिपके ,केवडा व तांबोरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. पेरणी पूर्वी कॅप्टन ३ ग्राम मेटॅलॅक्झिल ३५% ग्राम प्रतिकिलो कियाने या प्रमाणत बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी जमिनीत ट्रायकोड्र्माचा उपयोग करावा .
पानांवरील रोगाच्या नियंत्रणासाठी क्लोरोथॅलोनिल किवा कॅप्टन किवा थायरम २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे गंधक २० ग्राम प्रति१० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किवा गंधक भुकटी २५ किलो प्रती हेक्टरी धुरळशवी.
काढणी,उत्पादन आणि विक्री:-
बी पेरल्यापासून ३० ते ३५ दिवसांनी मेथीचे पिक काढणीला तयार होते.मेथीची काढणी कारताना संपूर्ण रोपटे मुळापासून उपटून काढतात किवा जमिनीलगत खुडून घेतात.
मेथीच्या पिकाचा खोडवा २-३ वेळा घेता येतो .कसुरी मेथीचे जास्त खोदावे घेता येतात. प्रमुख्ख्याने हिवाळ्यात खोडवा घेणे शक्य होते.काही वेळा २-३ खुसावे घेतल्यावर पिक बियांसाठी ठेवतात . मेथीची पाने तजेलदार असताना आणि फुले येण्यापूर्वी काढणी करावी.
काढणीच्या २-३ दिवस आधी पाणी दिल्यास काढणी करणे सोपे जाते आणि पाने ताजी राहतात. काढणीनंतर मेथीच्या योग्य आकाराच्या जुड्या बांधून कापडात किवा जाळीवर पिशव्यांमध्ये आथवा बांबूच्या टोपल्या मध्ये जुड्या व्यवस्थित रचून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात .
मेथीच्या जुड्या तुडवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच काढणी संद्याकाळी करावी म्हणजे ताजी भाजी बाजारपेठेत पाठवता येते. मुळांना जास्त माती असल्यामुळे मुळेपाण्यात धुवून पाणी झटकून घ्यावे. म्हणजे भाजी सडत नाही.मेथीची आणि विक्री ह्यामध्ये कमीत कमी कालावधी असावा.
मेथीचे उत्पादन काढणीच्या पद्धतीनुसार दर हेक्टरी ७-८ टनइतके मिळते.कसुरी मेथीचे उत्पादन हेक्टरी ९-१० टनमिळते. मेथीचे पिक बियाण्यासाठी ठेल्यास सध्या मेथीची हेक्टरी १ ते १.५ टनतर कसुरी मेथीचे हेक्टरी ६०० ते ७०० किलो एवढे बियाने मिळते.