भेंडी :-
प्रस्तावना :-
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे . भेंडीच्या फळात कॅलशीअम व आयोडीन हि मूलद्रव आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात . महाराष्ट्रामध्ये भेंडीखाली ८१९० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे . भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते .
जमीन व हवामान :-
भेंडीचे पिक हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत घेता येते . परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी . भेंडीचे पिक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्हाळी हंगामात पिक चांगले येते . पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते . पाण्याची कमतरता असताना इतर भाज्यांपेक्षा भेंडीचे पिक चांगले येते . उन्हाळ्यात भाज्यांची चनचन असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते .
वाण :-
पुसा सावनी सिलेक्शन २ -२ फुले उत्कर्षा , परभणी क्रांती , अरका अनामिका या सुधारित जाती लागवडीस योग्य आहेत .
बियाणांचे प्रमाण :-
हंगामात हेक्टरी ८ किलो आणि उन्हळ्यात १० किलो बियाणे पुरेसे होते . १ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी ३ ग्राम थायरम चोळावे .
पूर्वमशागत व लागवड :-
जमिनीचे मशागत एक नगरात व दोन कुळवन्या करून जमीन भूसभुशीत करावी व हेक्टरी ५० गाड्या शेणखत मिसळून तिसरी कोळवणी करावी . पेरणीसाठी खरीप हंगामात दोन ओळींतील अंतर ६० सेमी ठेवावे . आणि उन्हाळ्यात ४५ सेमी ठेवावे . एक ओळीतील दोन झाडांत ३० सेमी अंतर राहील अशा बेताने बी टोकावे प्रत्येक ठिकाणी दोन बियाणी टोकणी करावी . उन्हाळ्यात सारया पडून वर्म्ब्याच्या पोटाशी बी टोकावे . शेतात ओलावणी करूण वाफसा आल्यानंतर बी पेरावे .
खते व पाणी व्यवस्थापन :-
पेरणीच्या वेळी ५० -५० -५० किलो हेक्टर नत्र स्फुरद व पालाश यांची मात्रा जमिनीत मिसळावी व पेरणीनंतर एक महिन्याचे कालावधीने नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा . पेरणीनंतर हलके पाणी द्यावे . त्यानंतर ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
आंतरमशागत :-
एक कोळपणी व दोन निंदण्या करून शेतातील तणांचा बंदोबस्त करावा .
रोग व कीड :-
भुरी :-
भेंडीवर प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो .
उपाय :-
या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक १ किलो किंवा डायथेनएम ४५ , १२५० ग्राम ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारणी करावी .
कीड :-
भेंडी पिकास मावा तुडतुडे शेंडेअळी लाल कोळी या किडींचा प्रादुर्भाव होतो .
उपाय :
या किडींच्या नियंत्रणासाठी ३५ सीसी एन्डोसल्फान १२४८ मिली किंवा सायफरमेथीरीन ३५ सीसी २०० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे . पहिली फवारणी उगवणी नंतर फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने करावी .
काढणी व उत्पादन :-
पेरणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फळे तोडणीस तयार होतात . दर ३ ते ४ दिवसांनी फळे काढणीला येतात . परभणी क्रांती हा वाणी केवडा रोगास बळी पडत नसल्याने इतर वाणांपेक्षा ३ ते ४ आठवडे अधिक काळ पर्यंत फळांची तोडणी करता येते . त्यामुळे अधिक काळ पर्यंत फळांची तोडणी करता येते . त्यामुळे अधिक उत्पादन येते . खरीप हंगामात हिरव्या फळांचे उत्पादन हेक्टरी १०५ ते ११५ क्विंटल निघते तर उन्हाळी हंगामात ७५ ते ८५ क्विंटल निघते .