कार्ली व दोडका  :- 

प्रस्तावना :- 

कार्ली व दोडका या सारख्या वेलभाज्यांना मांडव बांबू इत्यादी प्रकारचा आधार द्यावा लागतो . कार्ली व दोडका  यांच्या वाढीची सवय व मशागतीची सूत्रे जवळ सारखीच आहेत महाराष्ट्रामध्ये कार्ल्याखाली अंदाजे ४५३ हेक्टर क्षेत्र असून दोडका या पिकाखाली ११४७ हेक्टर क्षेत्र  आहे . कारल्याला प्रदेशात व मोठ्या शहरात त्र दोडक्याला स्थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते . 

हवामान :- 

या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात त्र दोदाक्यास समशीतोष्ण व दमट हवामान मानवते . दोडका थोडीशी थंडी सहन करू शकतो . मात्र कार्ल्याच्या वेलीवर थंडीचा परीनाम  होतो .  

जमीन :- 

भुसभुशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्यम जमिनीत लागवड करावी . चोपण अथवा चिबड जमिनीत हि पिके घेऊ नयेत . 

पूर्वमशागत व लागवड :-

जमिनीची उभी आडवी नांगरत करून तणांचे व गवताचे तुकडे वेचून शेत स्वच्छ करावे . तद नंतर प्रती हेक्टरी १०० ते १५० क्विंटल शेणखत किंवा कंपोस्टखत टाकावे . कुळवणी करून खात जमिनीत चांगले मिसळावे . कारल्याची लागवडीसाठी दोन ओळींत १.५ ते २ मीटर व दोन वेलीत ६० सेमी अंतर ठेवावे . दोडक्याची दोन ओळी २.५ ते ३.५ मीटर वर दोन वेलीत ८० ते १२० सेमी अंतर ठेवतात . प्रत्येक ठिकाणी २ ते ३ बिया लावतात . दोन्ही पिकात बियांची टोकन ओलसर जमिनीत करावीत . बिया वरंब्याच्या बगलेत तोकाव्यात . उगवण होईपर्यंत पाणी बेताचे  द्यावे . 

हंगाम :- 

कारल्याची लागवड उन्हाळी पिकासाठी जानेवारी  फेब्रुवारी  महिन्यात करतात .उशिरात उशिरा मार्चमध्ये जून जुलाई महिन्यात करतात . दोडका कमी दिवसात येणारा असल्यामुळे त्याची लागवड कार्ल्यापेक्षा १५ ते २० दिवसांनी उशिरा केली तरी चालते . 

वाण :- 

अ ) कारले 

कोईमतूर लॉग :- 

या जातीची फळे पांढरी व लांब असतात . या जातीची लागवड  महाराष्ट्रात पावसाळी हंगामात होते . 

अरका  हरित :- 

या जातीची फळे आकर्षक लहान मध्यम भागी फुगीर , हिरवीगार असतात . फळांमध्ये बियांचे प्रमाण अल्प असते . 

पुसा दो मोसमी :- 

या जातीचे फळ वजनदार व लांब व हिरवे असते . हि जात दोन्ही हंगामात योग्य आहे . ५५ दिवसांत फळे काढणीस सुरुवात होते . 

पुसा विशेष :- 

हि जात उन्हाळी हंगामासाठी योग्य असून नदी काठच्या लागवडीस योग्य आहे . 

या शिवाय विद्यापीठाने विकसित केलेल्या सिलेक्शन -४ , सिलेक्शन -५ , सिलेक्शन -६ ,तसेच कोकण तारा , फुले ग्रीन गोल अर्काह्रीत , हिरकणी या जाती लागवडीस योग्य आहे . 

ब ) दोडका :- 

पुसा नसदार :- 

या जातीची फळे एकसारखी लांब व हिरवट रंगाची असतात . या जातीस ६०  दिवसांनी फुले येतात . प्रत्येक वेलीस १५ ते २० फळे लागतात . 

को - १ :- 

हि हळवी जात असून फळे न६० ते ७५ सेमी लांबीची असतात . प्रत्येक वेलीस ४ ते ५ किलो फळे लागताट . या शिवाय पुसा चिकणी कोण हरित , फुले सुचेता तसेच स्थानिक जाती लागवडीयोग्य आहेत . 

बियाण्यांचे प्रमाण :- 

कार्ल्यासाठी हेक्टरी ५ ते ६ किलो बियाणे लागते . बियाणे २५ ते ५० पी . पी . एम . एन . ए . ए . च्या द्रावणात बुडवून नंतर प्रतिकिलो बियाण्यास ३ ते ४ ग्राम कार्बोंडा झिम  लावून नंतर लागवड करावी . 

दोडक्यासाठी हेक्टरी ३ ते ४ किलो ग्राम बियाणे लागते . 

खते व पाणी व्यवस्थापन :- 

कारले पिकासाठी प्रती हेक्टरी २० किलो नत्र ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश लागणीच्या  वेळी द्यावे व नत्राचा दुसरा हप्ता २० किलो या प्रमाणात फुले दिसायच्या प्रती हेक्टरी २० ते ३० किलो नत्र २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावेत . व नत्राचा २५ ते ३० किलोचा दुसरा हप्ता १ महिन्याने द्यावा .

आंतरमशागत :- 

झाडा भोवतालचे तन काढून  स्वच्छता ठेवावी , जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी . दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्याचा वापर करावा . तसेच तारांवर नफा मिळविता येतो . 

रोग व कीड :- 

रोग :- 

या पिकावर प्रामुख्याने  केवडा व भूरी  रोगाचा प्रादुर्भाव होतो . भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी  डिनोकाप -१ मिली , १ लिटर पाण्यातून फवारावे तसेच केवडा या रोघाचा नियंत्रणासाठी डायथेन  झेड ७८ हेक्टरी औषध १० ग्राम १० लिटर पाण्यातून फवारावे . 

किडी :- 

या पिकावर प्रामुख्याने तांबडे भूगीरे , फळमाशी व मावा या किडीचा प्रदुभाव होतो . पाने खाणारी आळीच्या नियंत्रणासाठी ट्रायऑझोफोस  २ मिली प्रतिलिटर पाण्यातून फवारावे . फळ माशीच्या नियंत्रणासाठी मेलोथीऑन २ मिली प्रतिलिटर पाण्यातून फावारावे . 

काढणी व उत्पादन :-  

लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फुलावर येतो . पूर्ण वाढलेली पण कोवळी फळे  काढावीत . नखाने हळूच दाबल्यावर वर्ण पडतो . ती  फळे  कोवळी समजावीत . दोडक्याचे हेक्टरी १०० ते १५० क्विंटल उत्पादन मिळते . 

कारल्याची फळे कोवळी असतानाच काढावीत कारल्याचे हेक्टरी १०० ते १५० क्विंटल उत्पादन मिळते .