कापूस  : -

कापूस हे  राज्यातील दुसरे  महत्त्वाचे नगदी पीक असून, २०१२ ते २०१३  मध्ये त्या खालील क्षेत्र देशादेशातील एकूण क्षेत्राच्या ३५ टक्के ४१.४६लाख हेक्‍टर इतके आहे. तथापि, कापूस उत्पादकता ४९६ कि /हे ही राष्ट्रीय उत्पादकता पेक्षा ३०५ किलोमीटर कमी आहे राज्यांमध्ये जवळजवळ ९५ टक्के क्षेत्रावर बी.टी वाणांची लागवड झाली होती

उन्‍हाळी बागायती कपाशी

कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशी साठी स्वच्छ  उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीचा बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या  तापमानाची आवश्‍यकता असते.    कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सियस व हवेतील  आर्द्रता ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावी लागते. उष्ण दिवस आणि थंड रात्र  या प्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्याचे उपयुक्त असते.

कपाशीचे पीक सुमारे सहा महिने  शेतात राहून असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाचे असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल ९० सेंटिमीटर व पाण्याचा चांगला निचरा   होणारी जमीन निवडावी हलक्या क्षारयुक्त  आणि पाणथळ जमिनीत  कपाशीची  लागवड  करण्याचे टाळावे. अन्नद्रव्यांची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने  जमिनीचा सामू साधारणता ६ ते ८.५ पर्यंत असावा.

कपाशीच्या झाडांची मुळे जमिनीत ७० ते ९० दिवसात ६० ते ९० सेंटिमीटर पर्यंत खोल वाढतात. कपाशीच्या मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी, एक खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे ,पळ काट्या, पाला व इतर कचरा गोळा करून तो जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांचा सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. शेणखत अथवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ गाड्या या प्रमाणात या प्रमाणात मिसळावे. 90 सेंटिमीटर अंतरावर उथळ सरया पाडाव्यात,उथळ  साऱ्यांमुळे  कपाशीला आवश्यक तेवढे पाणी देता येते व त्यामुळे पाण्याची बचत होते. खोल व रुंद  सऱ्यांमुळे  झाडाची मुळे वर राहतात व जादा पाण्यामुळे पिकांची  कायिक, शाखीय वाढ जास्त होऊन उत्पादनात घट येते. शिवाय पाणीही जरूरीपेक्षा जास्त दिले जाते. तर सार्यांची  लांबी जमिनीच्या प्रकारानुसार ६ ते ८ मीटर ठेवावी.


बीज प्रक्रिया

बुरशीनाशक  :-

अप्रमाणित बियाण्यास थायरम बुरशीनाशकाची प्रक्रिया प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम या प्रमाणात करावी. त्यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

जिवाणू संवर्धक

हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी अझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरीलीम   या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो  बियाण्यास  २५ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. तसेच जमिनीतील मातीच्या कणांन्द्वारे  धरून ठेवलेले स्फुरद  पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी खस्फुरद विरघळणाऱ्या  जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी म्हणजे नत्र व स्फुरदयुक्त  खताच्या मात्रेमध्ये जवळजवळ २५ ते ३० टक्के बचत होते.


 पेरणी

बागायती बिगर बीटी कपाशीची पेरणी वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणी उशिरा झाल्यास वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान संभवते किंवा त्यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट  येते. पेरणी झाल्यानंतर ४ ते ६ इंच आकाराच्या सच्छिद्र  पॉलिथिन पिशव्या मध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व भरपूर पाणी द्यावे. नंतर प्रत्येक पिशवीवर  २ ते ३ बिया लावाव्यात. या पिशव्यांचा उपयोग नांगे भरण्यासाठी करावा. तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेवून त्यांचे किडीपासून संरक्षण करावे व वरचेवर पाणी द्यावे. साधारणपणे एका एकराच्या नांग्या भरण्यासाठी २५० ते ३०० पिशव्या पुरतात 

 वेगवेगळ्या भागासाठी उदाहरण  १ . सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांसाठी मार्चला पहिला पंधरवाडा, २ . अहमदनगर जिल्ह्यासाठी एप्रिल चा पहिला पंधरवडा आणि ३ . खानदेश ,विदर्भ ,मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मे चा दुसरा पंधरवडा, याप्रमाणे पेरणीच्यावेळी ची शिफारस केलेली आहे. पेरणी करतांना सरीच्या मध्यावर २  -३  इंच खोल खड्डा करावा व त्यात शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खते, बियाणे टाकून पूर्णपणे मातीने झाकावे व लगेच पाणी द्यावे. तसेच सरी पाडण्यापूर्वी शेणखत दिले नसल्यास प्रत्येक खड्ड्यात रासायनिक खतांबरोबर शेणखत द्यावे .

बीटी कपाशी वाणांची लागवड वातावरणाचे तापमान ३५  डिग्री सेल्सियस पेक्षा कमी झाल्यावरच २५  मे नंतर करावी. तसेच कपाशीची लागवड जमीन ओलावून  वापशावर  करावी.

  बागायती कपाशीसाठी रासायनिक खते

बागायती कपाशी ही रासायनिक खतांच्या मात्रा ना योग्य प्रतिसाद देते म्हणून खतांचा पुरवठा ही एक महत्त्वाची बाब आहे. संकरीत  कापसासाठी प्रति हेक्‍टरी १००  किलो नत्र, ५०  किलो स्फुरद व ५०  किलो पालाश, तर सुधारित वाणांसाठी  ८०  किलो गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या  पाळी अगोदर द्यावे किंवा खते कमी असल्यास लागवडीच्यावेळी प्रत्येक फुलीवर  छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर  शेणखत टाकावे व मातीत चांगले मिसळावे. २०  टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्र समान दोन हप्त्यांत पेरणीनंतर ३०  व ६०  दिवसांनी द्यावे. बीटी वाणांसाठी  शिफारशीत खतमात्रा पेक्षा २५  टक्के रासायनिक खत मात्रा १२५ , ६५ , ६५  किलो प्रति हे जास्त घ्याव्यात.

द्रवरूप खतांचा वापर करताना माती परीक्षण अहवालाचा अभ्यास  करून खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते. नत्र स्फुरद व पालाश या प्रमुख घटका व्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम, गंधक ,लोह, जस्त ,मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा गरज असते .हि अन्नद्रव्य विद्राव्य खतांमध्ये उपलब्ध असतात. सूक्ष्म  अन्नद्र्व्यांमुळे  बोंडाची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात. द्रवरूप खते संचाद्वारे देण्यासाठी व्हेंचुरी किंवा खत टाकी इंजेक्टर पंप या साधनांचा वापर करावा .

आंतरमशागत

नांग्या भरणे

सर्वसाधारणपणे १०  दिवसांत सर्व बिया उगवतात ,ज्याठिकाणी उगवले नसेल त्याठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच , त्याचं सुधारित अगर संकर वाणाचे  नांग्या भरण्यासाठी वापरावे व लगेच पाणी द्यावे, किंवा व वर उल्लेख केल्याप्रमाणे पॉलिथिन पिशवयांतील  रोपे २०  ते २५  दिवसांच्या आतच लावावीत.

विरळणी

पंधरा दिवसानंतर प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटून टाकावीत.विरळ ली  जमीन ओली असताना करावी.

खुरपणी

पेरणीनंतर जरुरीप्रमाणे दोन खुरपण्या व कोळपणी करून ६०  दिवसांपर्यंत पीक तणविरहित ठेवावे .यासाठी जेथे शक्य असेल तेथे हे जरूरीप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा वापर करावा .त्यासाठी खालीलप्रमाणे एक रासायनिक तन नाशक वापरावे व  आवश्‍यकतेप्रमाणे पिकाच्या खुरपण्या कराव्यात. तणनाशक मुळे खुरपणी च्या खर्चात बचत होते .

शेंडे व पाने खुडणे

भारी जमिनीत विशेषता रासायनिक खते व पाणी आणि जास्त दिले तर बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायिक वाढ जास्त होते .त्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते व बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा  संभव असतो. यासाठी पीक ७० -८०  दिवसांचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा खुडावा, यामुळे पिकात हवा खेळती राहते. बोंडे  सडत नाहीत व कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

 संजीवकाचा वापर

कपाशीला लागणारे पात्या, फुले ,बोंडे  यांची कीड,रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते व त्यामुळे उत्पादनात घट येते .नैसर्गिक कारणांमुळे होणारी पात्या, फुले, बोंडे  यांची गड कमी करण्यासाठी नॅप्थालीन  ऍसिटिक ऍसिड प्लानोफिक्स ा संजीवकाची हेक्‍टरी १०० मिली व ५००  लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पात्या लागल्या असतील तेव्हा पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी त्यानंतर १५  ते २०  दिवसांनी करावी .यामुळे उत्पादनात १०  टक्के वाढ होते.

पाणीपुरवठा

सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात पेरलेल्या कपाशीला८०० ते ९०० मिली पाणी लागते .कपाशीला  पेरणीपासून पाते लागेपर्यंत तुलनेने कमी पाणी लागते. या काळात पिकाला जास्त पाणी देऊ नये ,कारण जास्त पाण्यामुळे झाडांची अनावश्यक वाढ होते .पीक फुलोऱ्यात आल्यावर पाण्याची गरज वाढत जाते व बोंडे भरतांना ती सर्वात जास्त असते. कपाशीच्या उगवन, पाते लागणे, फुले उमलणे  व बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात जमिनीत ओलावा असणे जरुरीचे आहे. हे पेरणी ओलावून करावी. नंतर ३  ते ४  दिवसांनी टिंब वणीचे पाणी द्यावे. पावसाळा सुरू होऊन पुरेसा पाऊस पडेपर्यंत हवामान व जमिनीच्या मगदुरानुसार १०  ते १२  दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात पाऊसमान पाहून पाणी द्यावे. मात्र दोन पाळ्यांत १५  ते २०  दिवसांपेक्षा जास्त अंतर ठेवू नये.

जर पाण्याचा पुरवठा अपुरा असेल तर सरी आड सरी पद्धतीने पाणी द्यावे. पहिल्या पाडीला पहिली, तिसरी, पाचवी याप्रमाणे सऱ्यांत पाणी सोडावे व दुसऱ्या पाळीला दुसरी ,चौथी ,सहावी याप्रमाणे सऱ्यांत पाणी सोडावे. यामुळे कपाशीला लागणाऱ्या पाण्यात सुमारे 30 टक्के बचत होते .

ठिबक सिंचनाचा वापर

शेतात पाहणी केल्यानंतर आराखड्यानुसार ठिबक संचाची उभारणी करावी. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच शिवाय तणांचा उपद्रव कमी होतो.

पेरणी अंतर 

उन्‍हाळी बागायती कपाशीत भुईमुगाचा एस . बी ११  हा उपट्या वाण किंवा मग, उडीद किंवा गवार आंतरपीक  म्हणून घेतल्यास जास्त फायदा होतो. यासाठीचा सरीच्या एका बाजूस कपाशी, दुसर्‍या बाजूस भुइमुन्ग यांची  १  :१  या प्रमाणात पेरणी करावी. दोन्ही पिकांची पेरणी सरीच्या बगलेत मध्यावर करावी. आंतरपिकाची पेरणी कपाशीच्या पेरणीपूर्वी एक महिना अगोदर केल्यास फायदा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच तूर ,सोयाबीन यासारखी आंतरपिके घेतल्यास फायदा होतो.

वेचणी

शेतातील अंदाजे ३०  ते ३५  टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी, त्यानंतर साधारणपणे १५  ते २० दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेचण्या कराव्यात .कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले, कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा असलेला व किडा आणि कवटी कापूस वेगळा वेचावा. प्रत्येक झाडीचा कापूस वेगळाच साठवावा, घेतल्यानंतर कापूस तीन ते चार दिवस उन्हात वाळवून स्वच्छ व कोरड्या जागी साठवावा.

बोंडअ ळी   नियंत्रणासाठी विशेष काळजी:-

पिक साधारणपणे १  ते १.५  महिण्याची असतांना शेतात शेंडेअ ळीच्या   प्रादुर्भाव आढळून येतो. क्रीड ग्रस्त शेंडे तोडून नाश करावा.

संश्लेषित पायरेथ्रेड हे कीटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोन पेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करू नये.

संश्लेषित पायरे थ्रेड च्या  वापरानंतर दुसरी फवारणी असिफेट/ कार्बावरील  किंवा क्युनोलफोलची करावी .

अमेरिकन बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एच .एन .पी.व्ही .हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल .ई.या प्रमाणात सायंकाळच्या वेळी फवारावे .

सर्व प्रकारच्या बोंड अळीसाठी बी .टी ,हे जैविके अनुजीवयुक्त कीटकनाशक वापरावे .

अधूनमधून किडग्रस्त गळालेली पाने , फुले ,बोंडे वेचून नष्ट करावीत .

कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णतः टाळावे .

निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांच्या सुरुवातीच्या काळात वापर करावा .

पावर पंप वापरतांना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे .

उत्पादन -बागायती कपाशीच्या सुधारित वानाचे हेक्टरी २० ते २४ क्विंटल तर संकरीत वानाचे हेक्टरी २५ ते ३० क्विंटल . 

कापसावरील रोग व किडींचे नियंत्रण :-

कपाशीवरील २० पेक्षा जास्त रोग नोंदविण्यात आले आहेत. त्या रोगाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले आहे. 

१.बुरशीकडे होणारे रोग, २,जिवाणूमुळे होणारे रोग, ३,मुलद्रव्याच्या कमतरते मुळे होणारे रोग

या रोगापासून होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता प्रमुख नुकसानकारक आंनी वरचेवर आदळून येणाऱ्या रोगाचे नियंत्रण वेळीच करणे आवश्यक आहे.हा उद्देश लक्षात घेऊन कीड व रोग ओळखण्यामध्ये  शेतकऱ्याचीफागत होऊ नये या दुहेरी दृष्टीकोनातुब्न रोगांची लक्षणेव रो निवारण्याचे उपाय यांची संक्षिप्त माहिती देत आहोत.

बुरशीमुळे होणारे रोग:-

(१) कवडी(Anthracnose):-

 हा रोग कोलोट्रोट्रायकम इंडिकम'या बुरशीमुळे होतो हा रोग अमेरिकन व देशी अशा दोन्ही जातीवर आढळून येतो.आजकाल हा रोग सर्वसाधारणतः नगण्य प्रमाणत आढळतो . परंतु आतीवृष्टीच्या वर्षात , थंड हवामान आणि विशेषतःओलिताचे कपाशीवर या रोगापासून जास्त नुकसान संभवते .

हा रोग कपाशीच्या बियाण्याचे  ४८ टक्केपर्यंत व कापसाचे १० टक्का पर्यंत नुकसान करतो.

रोगाची लक्षणे (कवडी):-

हा रोग पिकाच्या सर्व अवस्थेत आढळतो.रोगात बियाण्यापासून निघालेली रोपे कुजतात .पानांवर तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात व अशी पाने गळतात.परंतु रोगाची लागण बोन्दाव्र कळपात करड्या रंगाचे व किडींचे खोलगट चट्टे पडता. तसेच बोंडे अर्धवट उमलतात.कापूस घट्ट चिकटून राहतो व कवडीसारख्या गुठळीत रंग पिवळसर तपकिरी होऊन त्याची धाग्याची प्रत बिघडते.

रोगाचे व्यवस्थापन /नियंत्रणाचे उपाय:-

रोगजंतू सुप्तावस्थेत बियाण्यात तसेच जमिनीत रोगात झाडाचे अवशेषात राहतात आणि योग्य वातावरणात सक्रीय होऊन रोगाची लागण होते. रोगाचा प्रसार बियाणे, पाण्यातून व हवेतून होतो म्हणून रोग व्यवस्थापनासाठी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम +१  ग्रॅम व्हीटाव्हॅक्स  प्रती किलो या प्रमाणत पेरणीपूर्वी चोळावे.यामुळे रोगाचा प्राथमिक प्रसार कमी करता येतो.

  बोंडे पक्व होण्याचे काळात  ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास  १२५०  ग्रॅम(०.२५ तीव्रतेचे ) कॉपार आँक्सिक्लो राइड आठवा १२५०ग्रम झायाबेन ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे .

  शेतातील पिकांचे रोगात अवशेष जाळून नष्ट करावेत.

(२)दहिया (Grey Mildew):-

हा रोग 'रॅमुलेरिया अँरीओला ' या बुरशीमुळे होतो.या रोगाचा प्रादुर्भाव सर्व प्रथम देशी कपाशीवर आढळून आला होता. देशी,अमेरिकन संकरीत व बी. ती.कपाशीवर हि हा रोग आढळून येतो. 

रोगाची लक्षणे(दहिया):-

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या रोगाची लक्षणे दिसतात.रोगात पानावर खालील बाजूने भूरकट पांढरे,कोनाकृती ठिपके दिसतात.हे ठिपके पसरून झाडावर दही शिपडल्यासारखे डाग दिसतात यामुळे या रोगास दहिया हे नाव पडले आहे.असेच ठिपके पाने,फुले आणि देठावरील येतात काही दिवसांनंतर झाडची रगत पाने,फुले बोंडे गळतात.

रोगाचा प्रसार :-

या रोगाची बीजे जमिनीत पडलेला रोगात अवशेषामध्ये सुप्तावस्थेत राहतात आणि पुढील वर्षी आँगस्ट -सप्टेंबर महिन्यात पोषक हवामंत पुन्हा सक्रीय होऊन कपाशीवर रोगाची लागण होते.रोगाचा पुढील प्रसार हवेतून होतो.आँगस्ट -सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊसआई सारखे ढगाळ वातावरणअसल्यास रोगाची लागण हमखास मोठ्या प्रमाणत होते.तसेच दाट झाडीचा परिसर नदी नाल्याकठची खोलगट शेते,जेथे दमात वातात्वरण वरील काळात हमखास असते.अशा ठिकाणी रोग हमखास  आढळतो.

नियंत्रणाचे उपाय:-

रोग आटोक्यात ठेव्यासाठी .आँगस्ट -सप्टेंबर महिन्यात वरील रोगाला पोषक परिस्थिती असल्यास वरचेवर पिकाची पाहणी करून रोग दिसून येताच ३०० मेष गांधाक्ची भुकटी हेकॅत्री ० किलो या प्रमाणत धुरळावी. धुरळणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.भर उन्हात धुरळणी केल्यास आनिष्ठ परिणाम होऊ शकतो किंवा कार्बेन्डझिम ५० डब्लु.पी.(०.१%), झायरम (०.२%),ट्रायडेमाॅर्फ ८० इ.सी.(०.०१%)या औषधाची पेरणीनंतर ३०,६० व ९० दिवसांनी फवारणी केल्यास रोगास चांगला प्रतिबंद होतो.

या रोगाला पूर्णतःप्रतिबंधक जाती उपलब्ध नाहीती म्हणून कमी प्रमाणत बळी पडणाऱ्या वापराव्यात.

(३)मर(Fusarium wit)- हा रोग 'फ्यूझारीयाम आँक्िस्पोरम फॉ.स्पे.वासईन्फे्टमया जमिनीत आढळतो.देशी काप्शीचे वन या रोगाला जास्त प्रमाणत बळी पडतात या रोगामुळे उत्पादनात ५ ते ६ टक्के घट येते .

रोगाची लक्षणे (मर):-

जमिनीचे २४ ते २८  सेल्सिअस तापमान व ४० ते ६० टक्के आद्रतेचे प्रमाण असताना या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो.हा रोग पिकाच्या वाढीच्यासर्व अवस्थेत होऊ शकते.रोगात झाडाची पाने

कोमजातात. मलूल होतात,लोंबतात व पिवळी पडून वाळतात.रोगाला संपूर्ण झाड किंवा काही फांद्या बळी पडतात रोगट झाडाचा खोडाचा आणि मुख्य मुळाचा भाग मधोमध उभा चिरल्यासआतील भागात काळपट पत्ते दिसतात या रोगकारक बुरशीच्या प्रसार प्रामुख्खाने जमिनीतून होतो. 

नियंत्रणाचे उपाय :-

पेरणीपूर्वी बियाण्यास १ ग्रॅम  कार्बेन्डझिम +३ ग्रॅम थायरम प्रती किलो या प्रमाणातचोळावे.

रो प्रतिबंधक वाणांचा उपयोग करावा . भारतात अमेरिकन काप्शीचे वन रोगाला प्रतिकार करतात .रोग प्रतिबंधक वन दि.बी.३१२,ए.के.४५ संजय,दिग्विजय 

(४)पानावरील ठिपके /अल्तानेर्रीया करपा(Alternaria Leaf Spot) :-

अलटरनेरिया या बुरशीमुळे पानावर ठिपके किंवामोठे चट्टे आढळून येतात.अमेरिकन जातीवर या रोगाचे प्रमाण जात असते.

रोगाची लक्षणे-पानावर सुरुवातीस गोलाकार तपकिरी रंगाचे लहान ठिपके येतात .पुढे हे एकमेक्कांत मिसळून ते मोठे होतात.लागण लोक्ग्रस्त झाडांचे अवशेष पाला पाचोळाव बोंडे) यामुळे होते . रोगाचा प्रसार हवेतून होतो.

रोगाचे व्यवस्थापन :-

वेळीच रोगात व गळलेली पाने वेचून जाळून टाकावीत.

पेरणीपूर्वी बियाण्यास जैविक प्रक्रिया सुडोमोनास फ्लुरोसन्स १० ग्रॅम प्रती किलो किंवा सिदेक्स किंवा डायफोलेटॉन किंवा इंडोफिल एम ४५  २ ते ३ ग्राम प्रती किलो बियाणे या प्रमाणे करावी.

सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविकाची (०.२%) फवारणे  किंवा मॅन्कोझेब(०.२%) पेरणीनंतर ३०,६० व ९० दिवसांनी करावी.यामुळे पानांवरील ठिपके/अलटरनेरिया करपा रोगांचे नियंत्रण होते.

(५)खोड व मूळकुजव्या (Root rot):-

हा रोग रायाझोक्टोनीय बटाटीकोला या बुसाशीमुळे होतो.हः रोग देश व अमेरिकन अशा दोन्ही कपाशीवर आढळून येतो.कपाशीच्या सर्व जाती या रोगास बळी पडतात.हा रोग प्रामुख्खानेपंजाब,गुजराथ राज्यात ज्या ठिकाणी जमिनीचे तापमान जास्त असते तिथे आढळतो महाराष्ट्रात रोगाचे प्रमाण कमी आहे या रोगाची बुरशी जमिनीत वर्षानुवर्ष राहते.

रोगाचे लक्षणे :-

या रोगाचा प्रादुर्भाव जून,जुलै महिन्यात दिसून येतो.तापमानाच्या तीव्र बदलावामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.अशी झाडे एकाएकी कोमिजून वाळतातव जमिनीतून विनासायान उपटले जाऊ शकतात मुळे कोमजतात व साल चटकन निघून येते.सालीतील तंतू सुटे होतात.सालीच्या खालील मुळाचा व ख्दाचा भाग तपकिरी व कला रंगाचे होतो. सालीच्या आतील भागात रोगकारक बुरशीच्या काळ्या रंगाच्या प्राथमिक प्रादुर्भाव मुख्यतः जमिनिद्वारा होतो.जमिनीत पाण्याचा आभाव तापमान हे रोगाच्या प्रसारास अनुकूल असते.

रोगाचे व्यवस्थापन:-

पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम + १ ग्रॅम बाविस्टीन प्रती किलो या प्रमाणत चोळावे.

कापाशित शेंगवर्गीय आणि ज्वारी यासारखी मिश्र पिके घ्यावीत.

कपाशीची पेरणी साधारणपणे १५ जून नंतर करावी 

मातीमध्ये ०.१ टक्के बिविस्ती मिसळावे त्यानुल  माती जन्तुविरहीत होऊन रोग बारा होण्यास मदत होते

जिवाणूमुळे होणारे रोग:-

(६) करपा/कोनोत्मक पानावरील  ठिपके:-

हा रोग झॅन्थोमोनास आँक्सेनोपोडीस पी.व्ही.माल्व्हेसियेराम या जिवाणूमुळेहोतो हा रोग आब्रोरीयम (रेशी) व हर्ब्रेशियम कपाशीवर कमी प्रमाणत येतो.परंतु बार्बडान्सव हिरसूटूम(अमेरिकन) काप्शीवर मोठ्या प्रमाणात येतो. 

रोगाचे व्यवस्थापन:-शेतात पडलेला रोगात पालापाचोळा,रोगात बोंडे गोळा करून जाळावीत .सुरुवातीस रोगट झाडे त्वरित नष्ट करावीत 

पिकाची फेरपालट ,उशिरालागवड  ,लवकर विरळणी,चांगली नांगरणी  हे रोग कमी करण्यास मदत करतात. 

निरोगी पिकापासून निवडलेले बियाणे पेरणीस वापरावे 

पेरणीपूर्वी बियाण्यास बाविस्टीन +थायरम ३ ग्रॅम प्रती किलो हेक्टरी या प्रमाणात प्रक्रिया करावी.

पिकावर रोग दिसून येताच कपाशीवर कॉपर आँक्सिक्लोराईड ३०  ग्राम स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिसांच्या अंतराने ४ फवारण्य कराव्यात.

मुलद्रव्याच्या कातार्तेमुळे होणारे रोग:-

(७) लाल्या रोग :-

सध्या बी.टी कपाशीवर मोठ्या प्रमाणावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.आहे तसेच हा रोग अमेरिकन कपाशीवर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो आहे.

रोगाची करणे:-

हा रोग प्रामुख्खाने मॅग्रेशियम,नायट्रोजन व बोरॉनया आन्द्रवाची कमतरता व रस शोषण कारानार्याकिडी जसे तुडतुडे,फुलकिडेव कोळी यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे ,झाडे जमिनीतील अन्नद्रव्ये व्यवस्थित रित्या शोषून घेऊ शकल्यामुळे दहिया रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रदुर्भाव बी .टी कपाशीवर अधिक बोंड टिकून राहत असल्याने त्यांना जास्त प्रमाणात अन्नद्रव्याची गरज असते हि गरज न भागाने,हलक्या व निचरा न होणाऱ्या जमिनीत बी.टीकपाशीची लागवड उशिरा झालेला भीज पाऊसव धुई (धुके).

रोगाची लक्षणे:-

सुरुवातीस पानाच्या कडा तांबूस होऊ लागतात व कालांतराने सर्व पृष्ठभाग्लाल्सार होतो.यामुळे पाने गळून पडतात झाडाची वाढ खुंटते व बोंडे लाल पडून अकाली,अपरिपक्व परिस्थितीत अपूर्ण उमलतात कापूस कवडीसारखा होऊन धागा निकृष्ट दर्जाचा व कमकुवत होतो.

 रोगाचे व्यवस्थापन :-

या रोगाच्या नियंत्रणासाठी जमिनीचे पृथ्थकारण करून योग्य खताची मात्र ध्यावी.पिक ५५ ते ६० दिवसांचे असताना मॅग्नेशियाम सफेत ४०० ग्राम ते १०० लिटर पाण्यात २ ते ३ फवारण्य कराव्यात .,

तसेच २% डीएपीच्या २ ते ३ फवारण्य कराव्यात 

दहिया रोगासाठी बाविस्तीनाच्या १० ग्राम १० लिटर पाण्यात वापर आणि खात्च्या योग्य व विभागून मात्र ध्यावी 

रस शोषणाऱ्या कीटकांचा बंदोबस्त करावा.

ताणनाशकामुळे होणारी विकृती :-

२-४,डी किंवा तस्तम रासायनिक तणनाशकाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर झाल्यास कपाशीच्या झाडाची पाने लांबट होऊन शिराची उभट वाढ होतर व पानाचा आकार बदलतो.बऱ्याचवेळा शेतकऱ्याने २-४ डी हे तणनाशक आठवा त्याचा पंपही वापरला तरी हि लक्षणे  दिसून येतात.

व्यवस्थापन :-

वरील लक्षन दिसून आल्यास प्रभावित पाने,शेंडे व पाते त्वरित खुदावेत. अशा पिकास २% युरिया फवारणी द्यावी तसेच जमिनीतून युरिया द्यावा. म्हणजे रोगाचे प्रमाण 

कमी होऊन रोग आटोक्यात येईल.

कपाशीच्या रोग नियंत्रणासाठी साधारणपणे असे करा 

कपाशीचे शेत स्वच्छ केल्यावर लगेच पळती फळाने नांगरणी करा .

पेरणीपूर्वी बियाण्यास बाविस्टीन +थायरम ३ ग्राम बुरशीनाशक १:२)या प्रमाणत १ किलो बीयन्यस चोळावे.पिकावर गरजेनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी.योग्यवेळी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात 

कपाशीवरील किडी आणि व्यवस्थापन :-

कपाशीवर मावा(चीकता),फुलकिडे ,पिठ्या ढेकुण इ.किडी आढळतात .त्यांचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

(१)रस शोषणाऱ्या किडी:-

मावा :-

पूर्ण वाढ झालेला मावा लांबट असून रंगाने पिवळसरते गडद हिरवे किंवा काळे व १ ते २ मी.मी.लांब असतात . मावा शरीराने मृदू असून पोटाच्या मागच्या बाजूस शिंगासारखी दोन टोके असतात. हि कीड बहुतेक करून बिन्पान्खी आवस्थेत आढळते.परंतु पंख असलेला मावासुद्धाआढळून येतो.हा पंख असलेला मावा सहसा पिकाच्या सुरुवातीला आणि शेवटी आढळून येतो सततचा रिमझिम पाऊसआणि अधिक आद्रता या किडीच्या वाधील्का शोषक असते परंतु जोराचा पाऊसझाल्यास त्यांची संख्या कमी आढळते. 

नुकसानीचा प्रकार:-

मावा व त्याची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात .अशी पाने आकसतात व मर गळतात ,त्यामुळे  झाडाची वाढ खुंटते .याशिवाय मावा शरीरातून चिकट गोड द्रव पदार्थबाहेर टाकतो.त्यामुळे पानावरील भाग चिकट बनतो.कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून पानांवर कला थर जमा होता.त्यामुळे पानांच्या अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊन त्यांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम  होतो.पिकाच्या शेवटच्या अवस्थेत माव्याच्या प्रादुर्भाव झाल्यास कापसाची नोंडे च्नागली उमलत नाहीत.तसेच काहिऊ रोगांच्या विषाणूचा प्रसार माव्यामार्फत केला जातो.हि कीड कापूस ,भेंडी ,वांगी,मिरची,बटाटे,कलिंगड इ.बऱ्याच पिकांवर दिसते 

 तुडतुडे :-

प्रौढ तुडतुडे साधारणपणे २-४ मी.मी ,लांब,पाचरीच्या आकाराचे व फिकर हिरव्या रंगाचे असतात त्यांच्या समोरच्या पंखावर प्रत्येकी एक काळा ठिपका असतो आणि डोक्याच्या बह्गावर दोन काळे ठिपके असतात.यांचे पिल्लेसुद्धा फिकट हिरव्या रंगाचे असून यांना पंख असतात तुडतुड्यांचे एक वैशिष्ट्यम्हणजे ते नेहमी तिरके चालतात व चटकन व जलद उडी मारतात.

नुकसानीचा प्रकार:-

प्रौढ तुडतुडे आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने राहून त्यातील रस पोषण करतात .अशी पाने प्रथम कडेने पिवळसरहोऊन नंतर तपकिरी रंगाची होतात.जास्त प्रदुभाव झाल्यास संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन त्यांच्याकडा मुरगळतात .परिणामी झाडाची वाढ खुंटते अशा झाडांना चाफे,फुले आणि बोंडे फारच कमी प्रमाणात ;लागतात .प्रादुर्भाव फारच जास्त झाल्यास संपूर्ण झाडासुद्धावाळू शकते. अधूनमधून होणारा हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरण या किडीच्या वाढीला पोषकअसते.या बरोबरच कापसाची उशिरा पेरणी आणि नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षाजास्त वापर या किडीच्या वाढीस मदत करतो.हि कीड कपाशी,भेंडी,वांगी,बटाटे ,सुर्यफुल इत्यादी पिकांवर आढळून येते.

फुलकिडे :-

हि कीड आतिशय लहान व नाजूक असते. ते १ मी.मी पेक्ष कमी लांब असून रंगाने फिकट पिवळसर असतात .सुक्ष्मदर्शक यंत्रातून त्यांची तपासणी केली तर  त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ दिसतात यांचे पिल्ले सुक्ष्म व बिनपंखी  असतात.

नुकसानीचा प्रकार:-

प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कापसाच्या पानामागील भाग खरडवून त्यातून निघणारा रस पोषक करतात .प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात व प्रथम तो भाग पांढरुका आणि नंतर आणि नंतर तपकिरी होतो.त्यामुळे पाने,फुले,कळ्या आकसतात ,झाडाची वाढ खुंटते हि कीड कापूस ,आंब, मिरची ,तोंडली ,दुधी भोपळा ,पेरू इत्यादी पिकाना उपद्रव करते.

पांढरी माशी :-

पांढरी  माशी  सर्वसाधारणपणे १.५ मी.मी लांब असते.पंख पांढरी किंवा करड्या रंगाचे असून शरीरावर पिवळसर झाक असते.डोक्यावर मध्यभागी दोन तांबडी ठिपके असतात.पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने  आढळून येतात. त्यांचा रंग फिकट पिवळा किंवा पिवळा आसतो.तो एका ठिकाणी स्थिर राहून पानातील रस पोषक करतात .

नुकासानिचा प्रकार:-

पांढऱ्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून रस पोषक करतात अशी पाने कोमेजतात .प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने लालसर  ठिसूळ होऊन शेवटी वाळतात.याशिवाय पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात .त्यामुळे संपूर्ण झाड चिकट होते.कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून पाने व झाड चिकट व काळसर होते.परिमाणी पानाच्या अन्नानिर्माण करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते आणि झाडाची वाढ खुंटते.अशा  झादान्नापते,फुले आणि बोंडे लागण्याचे प्रमाण कमीहोते .याशिवाय झाडावरील उत्पादनावर आणि प्रतीवर देखील विपरीत परिमाण होतो. काही रोगांच्या विषाणूचा प्रसार सुद्धा या माशी मुळे होतो.

पिठ्या ढेकुण :-

या किडीचा आकार ४ ते ५ मी.मी.असून त्याचा रंग पांढरट ते गुलाबी असतो.या किडीचा पिल्ले आणि प्रौढ ढेकुण लहान चपटीव दीर्घ वर्तुळाकार असतात .शरीराभोवती मेणासारखा पांढऱ्या रेशमी कापसारखे आवरण हळूच बाजूला केले तर गुलाबी रंगाचे ढेकुण दिसतात .या किडीची अंडी गुलाबी रंगाची असतात.टी पुंजाक्यामध्ये झाडावर,जमिनीत आढळतात.या अंडी पुंजाभोवती कापसारखे मेणाचे पांढरे आवरण असते. 

नुकसानीचा प्रकार:-

 कपाशीच्या पानाच्या शीरेजवळ,कोवळीशेंडे ,कळ .