मशरूम :-
अळंबी किंवा मशरूमचे औषधी गुणधर्म :-
मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी उर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेह व्यक्तींना असते.मशरूम मध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळीकमी करणारे घटक आहेत.
मूत्रपिंड (किडनी ) रोग्यांचा जीवनकाल वाढविण्यास उपयुक्त .
कमी उर्जेचा आहार, वजन कमी मध्ये कमी उर्जा ,प्रथिने ,जीवनसत्वे तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्याक्तीन्कार्ती उत्तम आहे .
मशरुम्मध्ये 'क ' जीवनसत्वे असते. मशरूमचे नियमित सेवन केल्यास स्काव्ह्री रोगापासून बचाव होऊ शकतो.
पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरिता मदत करणारे अन्न
अळंबीचे प्रकार:-
बटन मशरूम:
बटनमशरूमची लागवड मोठ्या प्रमाणत हिमाचल प्रदेश,आसाम पंजाब या प्रदेशात केली जाते. बटन मशरूमचे लागवड कमपोस्ट खान्तावर केली जाते.
दीर्घ मुदतीची पद्धत (२६-२८ दिवस)किवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट तयार केली जाते.
ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकिकरण केले जाते.
कंपोस्टच्या वजनाच्या ५%ते १० % या प्रमाणात बी पेरळे जाते.
१२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खात,माती,वाळू यांच्या निर्जंतुक मिक्षणाचा थरद्यावा लागतो व उत्पादनाकरीता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.
शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम ):
नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५%) या मशरूमची लागवड ८-१० न्म्हीने करता येते.
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड बटन माशुमपेक्षा अल्पखर्चिक व किफायातदार आहे. अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम देणारी जात म्हणून शिंपला माशारुमचा उल्लेख केला जातो
धिंगरी माशुरामच्या उत्पादनाकरिता अल्प पाणी लागते. हि अत्यंत महत्वाची बाब आहे .
२०० लिटर पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी अळंबी उत्पादन घेऊ शकता .
अळंबी लागवड
बी पेरणे:-
प्लास्टिकच्या पिशवीत कडचा थर द्यावा.अंदाजे दोन ते अडीच इंच .नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे.
बीच्या थरावर पुन्हा कडचा थर द्यावा. पुन्हा बी चा थर असे करून पिशवी भरावी.
बी पेरताना ओल्या कडच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना कड दाबून भरावे.
पिशवी भरल्यानंतर दोऱ्याच्या सहाय्याने थोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत.
छिद्रे पडताना दाभान किवा गंज नसलेल्या सुईच्या वापर करावा .
उबविणे:-
बुरशीच्या वाढीकरिता उबविणे हि महत्त्वाची क्रिया आहे.
बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सिअस ठेवावे.
खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सिअस ठेवावे.
पिशवी काढणे:-
पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरीदिसते.
ती ब्लेडने कापून काढावी व रॅकर ठेवावी.
तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ७०-८५%राहील याची दक्षता घ्यावी.
खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्य प्रकाश (संधिप्रकाश )व हवा खेळती राहील.
पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी.
दिवसातून ३ -४ वेळा पाण्याची फवारणी करावी.
फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा.
काढणी:-
मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते.
वाढ झालेळे मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत .
मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दिस खर्डवा व पाणी द्यावे.
१० दिवसांनी दुसरे पिक ,परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिक मिळतात.
एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्राम पर्य्नात ओळी आलीम्बी मिळते.
शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खात,जनावर्ण पौस्थिक चार म्हणून करण्यात येतो.
साठवण:-
ताज्या आलीम्बीची (मशरूमची) साठवण छिद्रे पडलेल्या २०० ते ३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात.
मशरूम वळविण्याकरिता ४५-५० अंश सेल्सिअस तापमान योग्य ठरते.
वळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.
अलाम्बीचे भरघोस उत्पादन येण्याकरिता महत्वाच्या बाबी:-
मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा.
मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे.
मश्रुमच्या खोलीत खेळती हवा राहिल,याची काळजी घ्यावी.
खोलीतील तापमान ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८० % राहील याची काळजी घायवी.
आलीम्बी लागवड करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे,चप्पल यांचा वापर करावा.
नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा
काडाचे निर्जंतुकीकरण महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी.
सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधिप्रकाश बॅग उघल्यावरच भरपूर ठेवावा .
मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे.
पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर १० इंच ठेवावे.
रोग,किडीचा,चीलातांचा प्रादुर्भाव झाल्यास नुवान (१ मी .मी.,१ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.)
आळीबीचे स्पाॅन विश्वसनीय संस्थेमार्फत घ्यावे. जुने,काळसर,हिरवी,बुरशी असणारे सपोन वापरू नये.
भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये किडी,रोगांचा पर्दुर्भाव झाला तर नाही ना, या करिता दर रोज निरीक्षणकरावे.
मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावी.योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायर मध्ये आलीम्बीचे सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी.
अशा पद्धतीने काळजी काळजी घेतल्यास आपण यशस्वी घेऊ शकतो.
मशरूमचे लागवडीसाठी खालील बाबी आवश्यक आहेत.
१.जागा
२.पाणी
३.कच्चा माल
४.प्लास्टिक
५.बियाणे
६,वातावरण
७.यंत्रसामुग्री
१.जागा :-
मशरूम उत्पादनाकरीता जागा हि बंदिस्त स्वरुपाची लागते. झोपडी,बांबू हाउस,मातीचे घर यांमध्ये मशरूम उत्पन्न अत्यंत उत्तम घेता येते.
२.पाणी:-
पाणी हि अत्यंत महत्वाची बाब आहे.मशरूम उत्पादनाकरीता पाणी स्वच्छ व शुद्ध हवे.
३.कच्चा माल :-
आळीबी मशरूम करिता कच्चा माल म्हणजे शेतीमधील टाकाऊ घटक:
(१)गव्हाचा भुसा, (२)कपाशीच्या कड्या,(३)भाताचा पेंड,(४)गावात,(५)सोयाबीनचा भुसा,(६)कडवा ,इत्यादी.
आळीबी उत्पादन प्रामुख्खाने कच्च्या मालातील सेल्यालोज हा घटक आळीम्बीचे महत्वाचे आणणा आहे. सेल्यालोज ज्या घटकात अधिक,त्यावर आळीम्बीचे उत्पन्न अधिक येते. घटक पदार्थ निवडताना सर्वात महव्ताचीबाब म्हणजे घटक ( कच्चा माल) कोरडा हवा. तसेच तो नवीन काढणीचा हवा व तो पावसात भिजलेला नसावा. कच्चा माल साठवितांना बंदिस्त जागेचा वापर करावा
४.प्लास्टिक:-
आळीम्बी उत्पादनाकरीता प्लास्टिक पोलीप्रपिलीनाचेवापरावे व जाडी (गेज) ८०-१०० वापरावा. प्लास्टिकचा आकार १८ बाय २२ इंच २२ बाय २७ इंच असावा.
५.बियाणे:-
आळीम्बी बियाणांस सपोन असे म्हणतात गव्हाच्या दाण्यावर मशरूमच्या बिजानुंची वाढ केली जाते. प्लास्ठीक्च्या पिशवीत ५०० ग्राम , १ कि.ग्राम या मापात हे बियाणे उपलव्ध असते.
६.वातावरण :-
मशरूम करिता वातावरणात हे अंधारमय हवे.वातावरणात आद्रता ७० ते ८० %,तापमान १८ ते २८ अंश सेल्सिअस असावे. उत्तम उत्पादनाकरीता खेळती हवा असणे हि एक महव्ताची बाब आहे .
७.यंत्रसामग्री :-
आळीम्बी उत्पादनाकरीता खूप मोठी अवजड व महाग यंत्र किंवा साहित्य लागत नाही .१.ड्रम -(कच्चा माल भिजवण्यासाठी )
२.हितार-(पाणी गरम करण्याकरिता )
३. फोगर्स/ह्युमिडी फायर-(वातावरण नियंत्रित )
४ .ड्रायर -आळीम्बी वाल्विण्याकरिता
५.थार्मामिटर-तापमनाची नोंद ठेवण्याकरिता
६.हेअर हायग्रोमिटर - आद्रता दर्शविण्याकरिता