टोमॅटो :- 

प्रस्तावना :- 

महाराष्ट्रात टोमॅटो लागवडीत  अंदाजे २९१९०  हेक्टर क्षेत्र आहे  . नाशिक , पुणे , सातारा , अहमदनगर , नागपूर , सांगली हेक्टरी महाराष्ट्रातील टोमॅटो  पिकवणारे महत्वाचे जिल्हे आहेत . तीनही म्हणजे खरीप , रब्बी उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड  करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्रातील शेतक -यांचे प्रमुख फळपिक आहे . टोमॅटो म्ध्येशीर संरक्षक अन्नघटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्व अनन्य साधारण आहे . टोमॅटो ए , ब , आणि क , जीवनसत्वे तसेच खनिज चुना , लोह इत्यादी पोषक अन्नाद्रव्येही टोमॅटो मध्ये पुरेशा प्रमाणात असतात . 

टोमॅटोची कच्ची अथवा लाल रसरशीत फळे भाजी किंवा कोथिंबीरीसाठी वापरली जातात . तसेच टोमॅटोच्या पिकलेल्या फळांपासून सूप , लोणचे , सॉस , केचप , जाम ,ज्यूस इत्यादी पदार्थ बनविता येतात . यामुळे टोमॅटो चे औद्योगिक महत्व वाढलेले आहे . 

हवामान :- 

टोमॅटो हे उष्ण हवामानातील पिक असले तरीही महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते . अति थंडी पडल्यास टोमॅटोच्या झाडाची वाढ खुटते . तापमानातील चढउताराचा फळधारनेवर अनिष्ट परिणाम होतो . १३ ते ३८ सेल्सिअस  या तापमानास झाडाची वाढ चांगली होती . फुले आणि फळे चांगली लागतात . रात्रीचे तापमानात १८ ते २० सेल्सिअस दरम्यान राहिल्यास टोमॅटो ची फलधारणा चांगली होते . फलाना आकर्षक रंग आणणारे लायकोपीयान हेक्टरी रंगद्रव्य २६ ते ३२ सेंटीग्रेटला तापमान , ११ ते १२ तास स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ६० ते ७५ टक्के आर्द्रता असेल त्यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्पादन मिळते .

जमीन :- 

टोमॅटो  पिकासाठी मध्यम ते  भारी जमीन लागवडी योग्य असते . हलक्या जमिनीत फळे लवकर तयार होतात , पाण्याचा निचरा चांगला होतो. आणि पिकाची वाढ चांगली होते . परंतु अशा जमिनीत सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्याची सोय असावी लागते . जमिनीचा सामू मध्यम प्रतीचा  म्हणजे ६ ते ८ असावा . 

पूर्वमशागत :-

शेतास उभी आडवी नांगरणी देऊन नंतर ढेकळे फोडून वखरणी द्यावी . जमिनीत हेक्टरी ३० ते ४० गाड्या शेणखत मिसळावे लागवडीसाठी २ ओळींतील अंतर ६० ते ९० सेमी व दोन रोपातील अंतर ४५ ते ६० सेमी ठेवावे . खरीप व हिवाळी हंगामासाठी ९० बाय ४५ सेमी अंतरावर लागवड करावी . 


हंगाम :- 

खरीप -

जून , जुलाई महिन्यात बी पेरावे . 

रब्बी (हिवाळी हंगाम ) सप्टेंबर , ऑक्टोंबर मध्ये महिन्यात बी पेरावे . 

उन्हाळी हंगाम -

डिसेंबर , जानेवारी महिन्यात बी पेरावे 

बियाण्याचे प्रमाण :- 

हेक्टरी टोमॅटो पिकाचे ४०० ते ५०० ग्राम बी लागते . 

सुधारित वाण :-

महाराष्ट्रात लागवडीच्या दृष्टीने उपयुक्त टोमॅटोचे वाण खालीलप्रमाणे आहे . 

पुसा रुबी :- 

तीनही हंगामात घेता येते . लागवडीनंतर ४५ ते ९० दिवसांनी फळे काढणीस येतात . फळे मायं चपात्या आकाराची गर्द लाल रंगाची असतात . हेक्टर उत्पादन ३२५ क्विंटल 

पुसा गौरव :- 

हि जात झुडूप वजा वाढणारी आहे . फळे लांबट गोल पिकल्यावर पिवळसर लाल रंगाची होतात . वाहतुकीस योग्य आहे . हेक्टरी उत्पादन ४०० क्विंटल 

पुसा शीतल :- 

हिवाळी हंगामासाठी लागवडीस योग्य जात असून फळे चपाती गोल लाल रंगाची असतात . हेक्टरी उत्पादन ३५० क्विंटल 

अर्का गौरव :- 

फळ गडद लाल मांसल व टिकावू असतात . हेक्टरी उत्पादन ३५० क्विंटल पर्यंत 

रोमा :- 

झाडे लहान व झाडपाळ असून फळे आकाराने लांबट व जड साल असल्याने वाहतुकीस योग्य आहे . हेक्टरी उत्पादन २५ टन . 

रुपाली , वैशाली , भाग्यश्री , अर्का विकास , पुसा अर्ली दवार्फ इ . जातीची लागवड केली जाते .

लागवड :- 

रोपे तयार करण्यासाठी बियांची पेरणी गादी वाफ्यावर करावी . गादी वाफा तयार करन्यापुर्वी जमिनीची खोल नांगरत करून कुलावाच्यास २, ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी . गादी वाफा हा १ मी . रुंद ३ मी लांब व १५ सेमी उंच असावा . गादी वाफ्यात १ घमेले शेणखत ५० ग्राम सुफला मिसळावे व  वाफा हाताने सपाट करावा . पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्राम थायरम बुरशीनाशक औषध चोळावे . बियांची पेरणी हि वाफ्याच्या रुंदीस समांतर बोटांनी रेघा ओढून त्यात पातळ पेरणी करून बी मातीने झाकून टाकावे . वाफ्यास झारीने पाणी द्यावे . बी उगवून आल्यानंतर १० ते १२ दिवसांनी दोन ओळींत काकरी पडून प्रती वाफ्यास १० ग्राम फोरेट द्यावे . वाफे हे ताणविरहित ठेवावेत . फुलीकडे व करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता १० लिटर पाण्यात १२ ते १५ मिली मोनीक्रोटोकॉस व २५ नगरम डायथेन एम ४५ मिसळून बी उगवल्यानंतर १५ दिवसांनी फवारावे . नंतरच्या दोन फवारण्या १० दिवसाच्या अंतराने कराव्यात . बी पेरणी पासून २५ ते ३० दिवसांनी म्हणजे साधारणता रोपे १२ ते १५ सेमी उंचीची झाल्यावर रोपांची सारी वरंब्यावर पूर्णलागवड करावी . रोपे उपताण्यापुर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे . त्यामुळे रोपांची पूर्णलागवड नेहमी संध्याकाळी किंवा उन कमी झाल्यावर करावी . 

रासायनिक खते :-  

सरळ वाणांसाठी २०० - १०० - १०० व संकरीत वाणांसाठी ३०० - १५० -१५० किलो नत्र , स्फुरद पालाश  या प्रमाणात खत द्यावे . अर्धा नत्र लागवडीच्या वेळी व उरलेला लागावादिनान्त्र ४० दिवसांनी द्यावे .

पाणी व्यवस्थापन :- 

रोपांच्या  लागवडीनंतर ३ ते४ दिवसांनी हलके पाणी द्यावे . जमिनीच्या मगदुराप्रमाणे पावसाळ्यात टोमॅटो पिकास ८ ते १० दिवसांच्या अंतराने त्र हिवाळी हंगामात ५ ते ७ दिवसांच्या अंतरानी व उन्हाळी हंगामात ३ ते४ दिवसांच्या अंतरांनी रोपांना पाणी द्यावे . भारी काळ्या जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे . पिक फुलावर असताना व  फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्वाचे आहे . अन्यथा फुलगळ , फळे तडकणे , या सारख्या नुकसानी संभवतात . उन्हाळ्यात टोमॅटो  पिकला पारंपारिक पद्धतीने पाणी दिल्यास ७७ हेक्टर सेमी पाणी लागते . तर ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास ५६ हेक्टर सेमी पाणी लागते . ठिबक सिंचनामुळे पाण्याची ५० ते ५५ टक्के बचत होऊन उत्पन्नात ४० टक्के वाढ होते . 

आंतरमशागत :- 

नियमित खुरपणी करून टन काढून टाकावेत . खुरपणी करताना मुळा न इजा होणार नाही याची काळजी घ्यावी . जेणेकरून त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो . 

बागेला वळण आणि आधार देणे :- 

टोमॅटो  पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात त्यामुळे त्यांना आधाराची आवश्यकता असते . आधार दिल्यामुळे झाडांची आणि फांद्याची वाढ चांगली होते . फळे भरपूर लागतात . फळे , पाने आणि फांद्या यांचा जमिनीची व पाण्याशी संपर्क येत नाही . त्यामुळे फळे साधण्याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते . खते देणे , फवारणी करणे , फळांची तोडणी करणे इ . कामे सुलभतेने करता येतात .  टोमॅटोच्या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो . १. प्रत्येक झाझादावर दीड ते दोन मीटर लांबीची व अडीच सेमी जाडीची काठी रोवून झाडाच्या वाधीप्रमाणे काठीला बांधत जावे . २. या प्रकारात तर आणि बांबू किंवा काथ्याचा वापर करून ताटी आणि बांबू किंवा काठ्यांचा वापर करून ताटी केली जाते . आणि तात्यांच्या आधारे झाडे वाढविली जातात . सरीच्या बाजूने प्रत्येक १० फुट अंतरावर पहारीने दर घेऊन त्यात दीड ते दोन मीटर उंचीच्या आणि अडीच सेमी जाडीच्या काठ्या घाटात बसाव्यात सरीच्या दोन्ही टोकांना जड लाकडी दम बांधाच्या दिशेने तिरपे रोवावेत . प्रत्येक दाम्बाच्या समोर जमिनीत जड खुंटी रोवून दम खुन्तीशी तारेच्या १६ गेज ची तर जमिनीपासून ४५ सेमी वर एका टोकाकडून बांधत जाऊन प्रत्येक काठीला वेध आणि  ताण देऊन दुसर्या टोकांपर्यंत ओढून घ्यावे अशा प्रकारे दुसरी ९० सेमी वर व तिसरी १२० सेमी अंतरावर बांधावी . या तारेंना रोपांच्या वाढणाऱ्या फांद्या सुटली किंवा नोयलंच्या दोरीने बांधाव्यात झाडाला वळण देणे आवश्यक करत असते . 

रोग व कीड :- 

रोग :- 

करपा :- 

हा रोग झाडाच्या वाढीच्या पाने देठ खोड यावर तपकिरी गुलाबी ठिपके पडतात . 

उपाय :- 

डायथेम एम ४५ , १० लिटर पाण्यात २५ ते ३० ग्राम या प्रमाणात मिसळून फवारावे . फवारणी दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी . 

भुरी :- 

पाण्याच्या खालच्या बाजूस पांढरे चट्टे पडतात . आणि पानाचा