प्रस्तावना :-

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप,रब्बी आणि उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मीक्षपिक म्हणूनही वांग्याची लागवड करतात.आहारात वांग्याचा भाजी,भरीत,वांग्याची भजी,इत्यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्या रोग्यांना गुणकारी असतात. वांग्यांमध्ये खनिजे अ ब क हि जीवनसत्वे तसेच लोह प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात या पिकाखाली अंदाजे २८ , `११३ हेक्टरी क्षेत्र लागवडीखाली आहे . 

हवामान :- 

कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते . ढगाळ हवामान व एकसारखा पाउस वांगी ब्पिकला मानवत नाही . सरासरी १३ ते २१ सेल्सिअस तपमनाला वांग्याचे पिक चांगले येते . 

जमीन :- 

सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी ब्जामिनीत वांग्याचे पिक घेता येते परंतु सुपीक चांगला पाण्याचा निचरा होणार्या मध्यम काळ्या जमिनीमध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते . जमिनीचा सामू ६ ते ७ असल्यास पिकाची वाढ चांगली होते . नदीकाठच्या गालवट जमिनीत वांग्याचे उत्पादन चांगले येते . 

पूर्वमशागत :- 

मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापुवी जमीन उभी आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी . कुलावाक ह्या शेवटच्या पालीसोबत दर हेक्टरी ३० - ५० गाड्या शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्यावे . 

लागवडीचा हंगाम :- 

वांग्याची लागवड तिन्ही हंगामात करता येते . खरीप बियांची पेरणी जूनच्या दुसर्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलाई , ऑगष्ट मध्ये केली जाते . रब्बी किंवा हिवाळी हंगाम - बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोंबर - नोव्हेंबर मध्ये लावतात . उन्हाळी हंगाम - बी जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात पेरून रोपांची लागवड फेब्रुवारीत करतात . 

वान :- 

माजरी गोटा :- 

या जातीचे झाड बुटके आणि पसरत असून पाने लहान ते मध्यम आकाराची असतात . खोड पाने लहान ते मध्यम आकाराची असतात . फळांचा आकार  मध्याम्हिण्यात ते गोल असतो . या जत५इचि फळे चवीला रुचकर असून काधानिनात्र ४ ते ५ दिवस टिकतात . हेक्टरी सरासरी उत्पादन ३०० ते ४०० क्विंटल . 

वैशाली :- 

या जातीचे झाड बुटके आणि पसरत असून पाने खोड आणि फळांच्या देठावर काटे असतात. फळे आणि फुले झुबाक्यांनी येतात . फळे मद्यं आकाराची अंडाकृती असतात . सरासरी हेक्टरी उत्पादन ३०० क्विंटल 

प्रगती :- 

या जातीचे झाड उंच आणि कटक असून पाने गडद हिरव्या रंगाची असतात . पाने फळे आणि फांद्यावर काटे असतात . फळे अंडाकृती आकाराची असून फळांच्या रंग आकर्षक जांभळा असून पांढर्या रंगाचे पत्ते असतात . पिकांच्या कालावधी १७५ दिवस असून १२ ते १५ तोंडे मिळतात . हेक्टरी सरासरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल . 

अरुणा :- 

या  जातीची झाडे मध्यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्यात लागतात . फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो . हेक्टरी सरासरी उत्पादन ३०० ते ३५० क्विंटल वांग्याच्या वरील जाती शिवाय कृष्ण एम एच बी १० या अधिक उत्पादन देणाऱ्या संकारीत्य जाती आहेत . 

बियांचे प्रमाण :- 

५०० ग्राम / हेक्टर सुधारित जातींसाठी १५० ग्राम / हेक्टर  संकरीत जातीसाठी 

लागवड :- 

वांग्याची रोपे गाडीफात्याव्र तयार करतात . गादीवाफे ३ बाय १ मीटर आकाराचे आणि १० ते १५ सेमी उंचीचे करावेत . गाडीवाफ्याभोवती पाणी देण्यासाठी अशा १५ ते २० वाफ्यातील रोपे पुरेशी होतात . वांग्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी ४०० ते ५०० ग्राम बी पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत . म्हणजे काही व्रोप ण जगल्यास हि रोप नंगे भरण्यासाठी वापरता येतंय . 

गादी   वाफ्यातील रोपे १२ ते १५ सेन्तीमितर उंचीची झा;ल्यावर म्हणजे ६ ते ८ पानावर आल्यावर लावणीस तयार होतात . बियांची उगवण होईपर्यंत वाफ्य्यांना सुरुवातीला झारीने आणि नंतर वाफ्याच्या भोवती असलेल्या सारीमधून गरजेनुसार पाणी द्यावे . 

कीड व रोग :- 

अ ) रोग :- 

बोकड्या किंवा पर्णगुच्छ या रोगामुळे पानाची वाढ खुनाटते . टी लहान आणि बोकाद्ल्यासारखी दिसतात . याचा प्रसार तुडतुद्यामुळे होतो . 

उपाय :- 

बी पेरताना दोन ओळींत फोरेट हेक्टरी दाणेदार औषध प्रती वाफ्यास २५ ग्राम या प्रमाणात द्यावे . रोपे लावण्यापुर्व्बी मोनोक्रोटोफोस  ३६ द्ब्बल्ये . एस . सी . १५ मिली व    १० लिटर पाणी 

मर :- हा बुरशीजन्य रोग नसून जमिनीत असणार्या नावाच्या बुरशीमुळे होतो . या रोगामुळे  झाडांची पाने प्रथमता पिवळी पडतात . शिरेम्धील ब्पानाव्र खाकी रंगाचे दिसतात . झाडांचे खोड मधून कापल्यास आतील पेशी कळपात दिसतात . झाडांची वाढ खुंटते व शेवटी झाड मारते . 

उपाय :- 

रोगास बळी ण पडणाऱ्या जातींची लागवड करावी . पिकांची फेरपालट करावी . नियमितपणे झाडावर बुरशीनाशकाचा फवारा करावा पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्राम प्रतिकिलो थायरम  बियाण्यास चोळावे .

ब ) कीड :- 

शेंडा आणि फळे पोखरणारी अळी :- 
या किडीमुळे वांगी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुक नुकसान होते. चिकट पांढर्या रंगाच्या आल्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात . आणि त्यामुळे झाडाची वाढ फळे लहान असताना अळी देथार्जवळून फालत शिरून फळाचे नुकसान करते . 

उपाय : - 

कीड लागलेले शेंडे अळी सक्त नष्ट करावेत . ४० ग्राम कार्बारील किंवा १४ मिली ३६ टक्के किंवा २.४ मिली सायाफारमेठीन , २५ टक्के १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा १० टक्के कार्बारील भुकटी दर हेक्टरी २० किलो या प्रामनात झाडांवर धुरळावी 

तुडतुडे :- 

हिरवत रंगाची कीड असून पानातील रस शोषून घेते त्यामुळे पाने आकास्ल्यासारखी दिसतात . तसेच या किदिमार्फात बोकड्या या विषाणू रोगाचा प्रसार होतो . 

उपाय :- 

रोपांच्या  पुनर्लाग्वादिनान्त्र २ आठवड्यानी १२ मिली एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही किंवा २० मिली मेलोथीओंण ५० टाख़्ख़४ प्रवाही १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . 

मावा :- 

हि अतिशय लहान आकाराची कीड पानाच्या पेशीमध्ये सोंड खुपसून पानातील रस शोषून घेते . 

उपाय :- 

२० मिलेथोन ५० टक्के प्रवाही १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . 

काढणी व उत्पादन :- 

रोप  लावानिनान्त्र १० ते १२ आठवड्यानी फळे तयार होतात . फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी . फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनास घट व्येते . तसेच जून फळे गीर्हेकांच्या पसंतींत उतरत नाहीत . ४ ते ५ दिवसांच्या अंतराने १० ते १२ वेळा वांग्याची तोडणी करता येते . वांग्याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते .