मुळा:-

मुळा हे क्षुप ब्रॅसिकेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव रॅफॅनस सटायव्हस आहे. मोहरी व कोबी या वनस्पतीही ब्रॅसिकेसी कुलातील आहेत. मुळा वनस्पतीचे मूलस्थान पश्‍चिम आशिया असावे, कारण वन्य अवस्थेतील मुळा वनस्पती तेथे आढळते. तिच्या खाद्य मुळांसाठी तसेच पाल्यासाठी तिची लागवड जगात सर्वत्र केली जाते. मुळांच्या रंगांनुसार ती ओळखली जाते.

मुळा हे क्षुप वर्षायू किंवा द्विवर्षायू असून ते १०-४५ सेंमी. उंच वाढते. त्याची पाने जमिनीलगत झुपक्याने येत असून ती मोठी, हिरवी व खंडित असून टोकाचा भाग मोठा व अर्धगोलाकार असतो. मुळे फुगीर व गोलाकार असून ५-१० सेंमी लांब व टोकाला निमुळती होत गेलेली असतात. फुले मंजिरीत येतात. ती निळसर ते पांढरी व २ सेंमी. लांब असून निदलपुंजात चार हिरवी मुक्त दले असतात. दलपुंजात चार मुक्त दले असून त्यांची रचना क्रुसासारखी असते. पुमांगात सहा पुंकेसर असून त्यांपैकी चार लांब व दोन लहान असतात. जायांग संयुक्त, ऊर्ध्वस्थ व दोन दलांचे असून बीजांडे आतील कडांवर रचलेली असतात. फळे टोकदार व चोचयुक्त असून अनियमितपणे संकुचित असतात. कुटपटिक फळांना शेंगा किंवा डिंगरी म्हणतात. फळांत २-८ गोलाकार बिया असतात. या वनस्पतीची मुळे वेगवेगळ्या रंगांची तसेच आकारांची असतात. पांढरा मुळा ६-१५ सेंमी. लांब असतो. तो खोडाजवळ मोठा असून खाली निमुळता होत गेलेला असतो. त्याचा आकार घोट्याप्रमाणे असतो. तांबूस-गुलाबी मुळा लहान, ५-१० सेंमी. लांब असतो. तो खोडाजवळ अधिक फुगीर व गोलाकार असून टोकाकडे एकदम निमुळता असमुळा या वनस्पतीमध्ये -जीवनसत्त्व, फॉलिक आम्ल आणि पोटॅशियमयुक्त खनिजे इ. मुख्य घटक असतात. यांखेरीज त्यात ब-समूह जीवनसत्त्वे असून मॅग्नेशियम, तांबे आणि कॅल्शियम इ.ची खनिजे असतात. मुळा कच्चा किंवा भाजी करून खातात. कच्चा मुळा भूक वाढवितो व पचन सुधारतो. मुळा चवीला तिखट असून त्याची तिखट चव सल्फोरॅफेन आणि इंडॉल-३ या संयुगांमुळे असते. ही दोन्ही संयुगे कर्करोग प्रतिबंधक आहेत. लघवीचे विकार, मूळव्याध, यकृताचे विकार, कावीळ व वाढलेली प्लीहा यांवर मुळा गुणकारी आहे. मुळा जीवाणुरोधी, शामक, धमनी विस्तारक, मूत्रल व हृदयबलकारी आहे. लघवी साफ होण्यासाठी पानांचा रस व बी घेतात. बियांतील तेल साबण तयार करण्यासाठी वापरतात.ल्याने त्याचा आकार भोवऱ्याप्रमाणे असतो.


मुळा या वनस्पतीमध्ये -जीवनसत्त्व, फॉलिक आम्ल आणि पोटॅशियमयुक्त खनिजे इ. मुख्य घटक असतात. यांखेरीज त्यात ब-समूह जीवनसत्त्वे असून मॅग्नेशियम, तांबे आणि कॅल्शियम इ.ची खनिजे असतात. मुळा कच्चा किंवा भाजी करून खातात. कच्चा मुळा भूक वाढवितो व पचन सुधारतो. मुळा चवीला तिखट असून त्याची तिखट चव सल्फोरॅफेन आणि इंडॉल-३ या संयुगांमुळे असते. ही दोन्ही संयुगे कर्करोग प्रतिबंधक आहेत. लघवीचे विकार, मूळव्याध, यकृताचे विकार, कावीळ व वाढलेली प्लीहा यांवर मुळा गुणकारी आहे. मुळा जीवाणुरोधी, शामक, धमनी विस्तारक, मूत्रल व हृदयबलकारी आहे. लघवी साफ होण्यासाठी पानांचा रस व बी घेतात. बियांतील तेल साबण तयार करण्यासाठी वापरतात.