आवळा :-
हलकी ते मध्यम
जाती :-
कृष्णा , कांचन , चकैय्या , व नीलम
लागवडीचे अंतर :-
७.० *७.० मीटर
खते :-
पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत , ५०० ग्राम नत्र ,२५० ग्राम स्फुरद व २५० ग्राम पालाश प्रती झाड वर्ष , नत्र , दोन हप्त्यांमध्ये , विभागून द्यावे .
आंतरपिके :-
आवळा पिकामध्ये डाळींब किंवा सीताफळ यासारखी आंतरपिके घेतल्यास प्रती हेक्टरी उत्पादनामध्ये वाढ होते . या शिवाय या पिकात स्टायलो हेमटा या चारा पिकाची लागवाद फायदेशीर दिसून आली आहे .
उत्पादन :-
७५ ते १२५ किलो / झाड ( ५ वर्षावरील झाड )
इतर महत्वाचे मुद्दे :-
लागवडीपूर्वी रोपांवर सुधारित वानाचे कलम केले असल्याची खात्री करून मगच लागवड करावी .
भरपूर उत्पादन आणि अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आवळ्याच्या लागवडीसाठी कांचन वानांबरोबर जास्त परागीभवनासाठी १० टक्के कृष्ण या वाणाची लागवड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे .
पावसाला लाब्ल्यास जून - जुलाई महिन्यात फळगळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे .
पावसाचे पाणी जमिनीत मुराविण्यासाठी उतरच्या विरुध्द दिशेने बंध घालावेत किंवा झाडाच्या खोडाभोवती इंग्रजी (v) आकाराचे बंध घालावेत .