पेरू :- 

जमीन :- 

पाण्याचा निचरा होणारी , मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन 

जाती :- 
सरदार ( एल - ४९ ) 

अभिवृधीचा प्रकार :- 

दाब कलम 

६० * ६० * ६०  सेमी आकाराचे खड्ड्डे घेऊन २ कि . सिंगाल्पूर फोस्फेट  खत  टाकावे . ५ टक्के मलथिओन ( ५० - ६० ग्राम ) पावडर मिसळावी . दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ * ६ मीटर प्रती हेक्टरी झाडांची संख्या २७७ घन लागवडीसाठी ३ * २ मी . अंतर ठेवावे . 

खते :- 

पूर्ण वाढ झालेल्या झाडास ग्राम नत्र, ३०० ग्राम स्फुरद व ३०० ग्राम पालाश , झाडाला बहार धरण्याचे वेळी द्यावीत पैकी निम्मा नत्र बहराच्या वेळी व उरलेला नत्र फळधारनेनंतर द्यावा त्र स्फुरद व पालाश एकाच हप्त्यात बहराच्या वेळी द्यावा . 

उत्पादन :- 

७०० ते १५०० फळे प्रत्येकी कलमी झाडापासून मिळतात . 

कीड व रोग नियंत्रण :- 

पिठ्या ढेकुण :- 

पिठ्या ढेकुनाच्या नियंत्रणासाठी जैविक व्हरटीसिलीयाम लेकांनी ( फुले बर्गासाइड ) - ४० ग्राम १०० मिली दुधात मिसळून १० लिटर पाण्यात फवारावे . 

फळमाशी :- 

फळमाशीचे नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा   पावडर (१०० ग्राम / झाड ) शेणखतात मातीत टाकावे किंवा बोर्डो मिश्रण (१ टक्के ) द्रावणाची मातीतजीरावणी करावी . 

फळावरील दागांसाठी बाविस्टीन ( ०.१ टक्के ) + मॅनकोझेब ( ०.२ टक्के ) ची फवारणी करावी . 

इतर महत्वाचे :- 

बागेत फांद्याची दाटी झाल्यानंतर भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी तसेच यंत्राने मशागत करण्यासाठी हलकी छाटणी केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते . उन्हाळ्यात फळांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी २-४-५ टी ७० पीपीएम या संजीवकाची फवारणी करावी .