डाळिंब :- 

डाळिंबाची लागवड फार प्राचीन  काळापासून म्हणजे इ.स . पूर्व ३५०० वर्षापूर्वी झाल्याचा उल्लेख आढळून येतो ; डाळींबाचे उगमस्थान इराण असून इ . स . २००० वर्षापासून डाळीम्बाची लागवड केली जात होती असे आढळते . इराण प्रमाणेच स्पेन , इजिप्त , अफगाणिस्तान , मोरक्को , ब्लुचीस्थान , पाकीस्थान , इराक , ब्रह्मदेश , चीन , जपान , अमेरिका , रशिया , भारत , या देशामध्ये , लागवड केली जाते , 

रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड सुरु होण्यापूर्वी सन १९८९ - ९० मध्ये डाळिंब पिकाखाली ७७०० हेक्टर क्षेत्र होते . डाळिंब पिकाची लागवड अहमदनगर , पुणे , सांगली सोलापूर , वाशीम या जिल्ह्यात प्रामुख्याने होत असून इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे . सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये डाळिंब पिकाखाली ७३०२७ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी सुमारे ४१००० हेक्टर  क्षेत्र उत्पादनाखाली आहे . त्यापासून ४१०००० मेट्रिक टन इतके उत्पादन व ३२८ कोटी रुपये उत्पन्न मिळते . 

डाळींबाच्या रसात १० ते १६ टक्के साखरेचे प्रमाण असते . हि साखर पचनास हलकी असते . कुश्त्रोगावर  डाळींबचा रस गुणकारी आहे . त्याचप्रमाणे फळांची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे . कापड रंगविण्यासाठी फळांच्या सालीचा उपयोग केला जातो . अवर्षण प्रवण भागामध्ये हलक्या जमिनीत व कमी पावसावर तग धरणारे हे झाड आहे . त्यामुळे या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ होत आहे . 

हवामान :- 

डाळींबचे पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त आहे . उन्हाळ्यातील कडक उन आणि कोरडी हवा तसेच हिवाळ्यातील कडक थंडी डाळींबाच्या वाढीस योग्य असते . अशा हवामानात चांगल्या प्रतीची फळे तयार होतात परंतु अशा प्रकारच्या हवामानात जरी थोडा फार फरक झाला तरी सुद्धा डाळींबचे उत्पन्न चांगले येते . फुले लागल्यापासून फळे होईपर्यंतच्या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्यास चांगल्या प्रकारची गोड फळे तयार होतात . कमी पावसाच्या प्रदेशात जेथे थोडीफार ओलिताची सोय आहे तेथे डाळींबाच्या लागवडीस भरपूर वाव आहे . 

जमीन :- 

डाळींबाच्या पिक कोणत्याही जमिनीत घेण्यास येते . अगदी निकास , निकृष्ठ जमिनीपासून भारी , मध्यम काळी व सुपीक जमीन डाळींबाच्या लागवडीसाठी चांगली असते . मात्र पाण्याचा चांगला निचरा होणारी गालाची किंवा पोयट्याची जमीन निवडल्यास उत्पन्न चांगले मिळते . त्याचप्रमाणे हलक्या , मुरमाड माळरान किंवा डोंगर उताराच्या जमिनिसुद्धा या पिकला चालतात . मात्र जमिनीत पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे . चुनखडी आणि थोड्या विम्लायुक्त ( अल्कलाइन ) जमिनीतहि  डाळींबाचे पिक येऊ शकते . 

डाळींबाच्या जाती 

गणेश :- 

सध्या लागवडीखाली असलेले बहुतांश क्षेत्र हे या वनाखाली असून बहुतांश क्षेत्र हे या वानाखाली असून हा वन गणेशखिंड , फळसंशोधन केंद्र ,  पुणे या वानाखाली असून हा वन गणेशखिंड , फळसंशोधन केंद्र , पुणे या ठिकाणी डॉ. जी . एस . चिमा यांच्या प्रयत्नाने शोधून काढण्यास आलेला आहे . या वनांचे वैश्य असे कि , बिया मउ असून दाण्याचा रंग फिक्कट गुलाबी असतो फळात साखरेचे प्रमाण चांगले आहे . व या वाणापासून उत्पादन चांगले मिळते . 

मस्कत :- 

या जातीच्या फळाचा आकार मोठा असतो . फळांची साल फिक्कट हिरवी ते लाल रंगाची असून दान पांढरक ते फिक्कट  गुलाबी असतात . शेतक यांनी रोपापासून बागा लावल्यामुळे झाडांच्या वाढीत व फळांच्या गुणधर्मात विविधता आढळते . चवीस हा वन चांगला असून उत्पादनही भरपूर मिळते . 

मृदुला , जी १३७ , फुले आरक्त , भगवा 

लागवड :- 

डाळिंब लागवडीकरिता निवडलेली जमीन उन्हाळ्यामध्ये २ ते ३ वेळेत उभी आडवी नांगारटी करून कुळवून सपाट करावी . भारी जमिनीत ५ * ५ मीटर अंतरावर लागवड करावी . त्यासाठी ६० * ६० * ६०  सेमी आकाराचे खड्डे घ्यावेत . प्रत्येक खाद्द्याशी तळाशी वळलेला पालापाचोळा १५ ते २५ किलो शेणखत किंवा काम्पोष्ट खत  

१ किलो सिंगल सुपार्फोस्फेत यांच्या मिश्रणाने जमिनी बरोबर भरून घ्यावेत . सर्वसाधारणपणे पावसाळ्यात लागवड करावी . डाळींबची तयार केलेली कलमे प्रत्येक खाद्ययात  एक याप्रमाणे लागवड करावी . 

कलमाच्या आधारासाठी शेजारी काठी पुरून आधार द्यावा . कलम लावल्यानंतर सुरुवातीच्या काळात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे . ५ *५  मीटर अंतराने प्रती हेक्टर ४०० झाडे लावावीत . 

पाणी :- 

डाळींब पिकास फुले येण्यास सुरुवातीस झाल्यानंतर फळे उतरून घेइपर्यन्तच्या काळात नियमित व पुरेसे पाणी देणे महत्वाचे आहे . पाणी देण्यात अनियमितपणा झाल्यास फुलांची गळ होण्याची शक्यता असते . 

फळांची वाढ होत असताना पाण्याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्यास फळांना तडे पडतात व प्रसंगी अशी  ण पिकलेली फळे गळतात . 

पावसाळ्यात पाउस ण पडल्यास जरुरीप्रमाणे पाणी द्यावे व पुढे फळे निघेपर्यंत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याची पाली द्यावी . फळांची तोडणी संपल्यावर  बागांचे पाणी तोडावे . 

डाळींबचे फळ तयार होण्यास फुले लागल्यापासून साधारणता ६ महिने लागतात .  आंबिया बहराची फळे जून ते ओगस्ट मध्ये मृगबहराची फळे फेब्रुवारी ते एप्रिल मध्ये तयार होतात . 

फळांची साल पिवलर करड्या रंगाची झाली म्हणजे फळ तयार झाले असे समजावे व फळाची तोडणी करावी .