चिकू:-
हवामान:-
उष्ण व दमट.जास्त पावसाचा प्रदेश
जमीन :-
उत्तम निचऱ्याची ,खोल मध्यम काळी जमीन
सुधारित जाती:-
कालीपत्ती:-
या जातीच्या झाडाची पाने हिरवी व फळे गोल अंडाकृती असतात. फळाची साल पातळ असून गार गोड असतो. फळ भरपूर लागतात
क्रिकेट बॉल:-
फळे मोठी गोलाकार असतात. गार कणीदार असून गोडी मात्र कमी असते.फळे भरपूर लागतात.
छत्री :-
या झाडांच्या फांद्यांची ठेवण छात्रीसारखी असते. पाने फिकट हिरव्या रंगाची असतात फळाचा आकार कालीपात्तीच्या फळांप्रमाणे असतात परंतु गोडी कमी असते.
अभिवृद्धीचा प्रकार:-
खिरानिखुंत वापरून तयार केलेले भेट कलम किंवा शेंडा कलम
लागवडीची अंतर :-
दोन झाडातील व ओळीतील अंतर १० *१० मी,प्रती हेक्टरी झाडांची संख्या १००
खाते:-
१*१*१ मी आकाराचे खडे घेऊन त्यात च्नागली माती,३-४ घामेलि शेणखत आणि २.५ किलो सिंगल सुपर फॉस्पेट यांच्या मिक्षणाने भरावेत वळवांचा उपद्रव टाळण्यासाठी रिकाम्या खड्यात १०० ग्रॅम २ टक्के मिथिल पॅसटीगॉन किंवा ५ टक्के कार्बारील भुकटी मिसळावी . पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास एक घमेले शेणखत ,३०० ग्राम युरिया ,२०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्पेट ,व १०० ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश समप्रमाणात ऑगष्ट,जानेवारी मध्ये विभागून द्यावे.
दुसर्या वर्षी पहिल्या वर्षाच्या मात्रेनदुप्पट तिसऱ्यावर्षी तिप्पट या प्रमाणे खताचे प्रमाण २० वर्षापर्यंत वाढवीत जावे.त्यानंतर दरवर्षी २० घमेली शेणखत ६ किलो युरिया १८ किलो सिंगल सुपर फॉस्पेट आणि ६ किलो MOPहि खतेचारातून बांगडी पद्धतीने प्रती झाडास द्यावीत.
पाणी व व्यवस्थापण:-
हिवाळ्यात ८ व उन्हाळ्यात ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
काढणी व उत्पन्न :-
फलधारणेपासून फळे तयार होण्यास १५० ते १६० दिवस लागतत . पाचव्या वर्षी प्रत्येक झाडापासून १०० ,१० व्या वर्षी ५०० , १५ व्या वर्षी १५०० आणि २० वर्षे व पुढील वयात २००० ते ३००० फळे मिळतात फळे काढण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'अतुल ' झेल्याचा वापर करावा.
कीड व रोग नियंत्रण
किडी
पाने आणि कळ्या खाणारी अळी-
अळी पानांचीजाळीकरून पानांवर उपजीविका करते. तसेच कळ्यांना छिद्र पडून आतील भाग खाते .नियंत्रणासाठी पाण्यात विर्घल्णारी ५० टक्के कार्बारील भुकटी१० लिटर पाण्यात २० ग्राम मिसळून फवारणी करावी.
खोड पोखरणारी अळी -
अळी साली खालील पेशीवर उपजीविका करते.खोडावरील छिद्रातून बाहेर पडणाऱ्याचोठ्यावरून या किडीचे अस्तित्व समजते.अळीचानयनात करावा .किद्ग्रस्त६ फांद्या काढून जाळून टाकाव्यात खोडावरील/फांद्यांवरील छिद्रे केरोसिंमध्ये बुडलेल्या कापसाच्या बोळ्याने बंद केल्यास अळी गुदमरून मारणे शक्य होते.
फळातील बी पोखरणारी अळी-
अळीदेठाच्या भागाच्या कळीच्या पाकळ्या खून फळात प्रवेश करते.फळाच्या गरातून थेट बी मध्ये प्रवेश करते.अळी सुक्ष्म असल्याने तिने पाडलेले प्रवेश छिद्र फळाच्या वाढाबरोबर भरून निघते मात्र बी मध्ये शिरलेली अळी बिजदलेखून त्यावर उपजीविका करते. पूर्ण वाढलेली अळी बीचे कठीण कवच पोखरून छिद्र पडून ती फळातून सरळ बाहेर पडते. नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता राखून झाडांची योग्य छाटणी करून बागेत पुरेसा सूर्य प्रकाश येईल असे पाहावे.किडग्रस्त तसेच गळलेली सर्व फळे व पालापाचोरा गोळा करून जाळून नसत करावा झाड फुलोऱ्यावर असताना किंवा फळे लहान असताना ५०,००० पी.पी.एम निमॅझॉन ०.००४ टक्के (८ मिली/१० लीपाण्यात ),१०,००० पी.पी.एम एकोनिमप्लास(४० मिली/१० लीपाण्यात ) किंवा ५० टक्के प्रवाही मॅलॉथिऑन०.१ टक्के (२० मिली/१० ळी पाण्यात )यापैकी कोणत्याही एका किटकनाशाकाची १५ दिवसांनी आलटून पालटून फवारणी करावी
फुलकळीपोखरणारी अळी-
अळी,कळी पोखरून कहते. एका कळीतील सर्व भाग पोखरून खाल्यानंतर त्यामुळे फलधारणा कमी प्रमाणात होऊन उत्पन्नात घात येते.
या किडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि मे - जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात दिसून येतो किडीच्या नियंत्रणासाठी ५०,००० पी .पी . एम. निमझॉंल ०.००४ टक्के ( ८ मिली / १० ळी पाण्यात ), १०,००० पी . पी . एम . एकोणीमाप्ल्स ( ४० मिली / १० पाण्यात ) ०.१ टक्के ( २० मिली / १० ळी पाण्यात ) यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची १५ दिवसांनी आलटून पालटून फवारणी करावी .
रोग :-
पानांवरील ठिपके :-
पानांवर लहान गोल तपकिरी ठिपके दिसतात . ठीपाक्यांवरील मध्यभाग पांढर्या राखेसारख्या दिसतो . खालच्या फांद्यावरील फळे मउ ोऊन कुजतात . नियंत्रणासाठी रोगट फांद्या कापून नष्ट कराव्यात . कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी . पावसाल्यागोदर एक व नंतर दोन अशा १ टक्के बोर्डोमिश्रणाचा फवारण्या कराव्यात .
फळांची गळ :-
पावसाळ्यात बुरशीजन्य रोगाने फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते . या रोगाचे नियंत्रणासाठी रोगट फांद्या कापून त्या जागी बोर्डोपेस्ट लावावी . पावसाळ्यात फळ गळ होऊ नये , म्हणून पावसाळ्यात अगोदर १ टक्के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी आणखी दोन फवारण्या १५ ते २० दिवसांच्या अंतराने कराव्यात . पावसात द्रावण चिकटून राहण्यासाठी बिरोडा / सांडोपीट या चीकटनार्या पदार्थाचा वापर करावा .