संत्री :- 

प्रस्तावना :- 

महाराष्ट्रातील संत्र्याची नागपूर संत्रा हि जात अप्रतिम  चवीमुळे जगप्रसिध्द आहे . मुख्यत्वेकरून विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते .  पश्चिम महाराष्ट्रातील आणि लागवड करण्यात वाव आहे . 

हवामान :- 

संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे . या तापमानाच्या कक्षेत उत्तमरीत्या होते . या पिकला उष्ण व किंचित दमट हवामान ,३७० मी . मी. पाउस आणि ५० ते ५३ टक्के हवेतील आद्रता चांगली मनवून झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते . 

जमीन :-  

मध्यम काळी १ ते १.५ मीटर खोलीची जमीन , खाली पाण्याचा निचरा होईल असा मातीमिश्रीत मुरूम अथवा थोडी चुनखडी किंवा वाळूमिश्रित मातीचा थर असलेली व ज्या जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असतो . अशी जमिनी लागवडीस उत्तम समजली जाते . 

भारी काळ्या जमिनी , ज्यात काळी माती १.५ ते ३.५ मीटर खोल असून खाली चोपण मातीचा थर असतो तेथे पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवण्याची क्षमता असल्याने झाडाच्या मूल्या सडून पुढे झाडे वळतात . त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत संत्र लागवड करू नये . 

पूर्वमशागत :- 

संत्र्याची बाग लावण्याकरिता जमिनीची निवड झाल्यावर जमिनीची खोल नांगरणी करून घ्यावी . नागर्माथा , हरली , कास - कुन्ध्याच्या मुळ्या वेचून घ्याव्या . वखराच्या पाळ्या देऊन जमीन  भुसभुशीत करावी . चढउतार असल्यास जमीन समतोल पातळीत आणावी . 

कलमांची निवड :-

कलमांची निवड :- 

डोळा भरून तयार केलेल्या  कलामांपासून संत्र्याची लागवड केली जाते . कलमांची निवड करतांना टी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली निरोगी , जातिवंत , जोमदार , वाढणारी , जम्बेरी , किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर डोळे भरलेली असावीत . संत्र्याची कलमे कृषी विद्यापीठ व शासकीय रोपवाटिका येथूनच घ्यावीत . 

जाती :- 

संत्र्याच्या नागपूर संत्र , किलो संत्र व न . १८२ या जाती आहेत .

लागवडीची तयारी :- 
या पिकाच्या लागवडीसाठी ६ * ६ मीटर अंतरावर ६० * ६० * ६०  सेमी . आकाराचे खड्डे घेऊन चौरस पद्धतीने लागवड करावी . लागवडीपूर्वी एक महिना अगोदर खड्डे खोदावेत . हे खड्डे पावसाळ्यापूर्वी २५ किलो चांगले कुजलेले४ शेणखत अधिक दोन किलो सिंगल सुपर फोस्फेट  अधिक १०० ग्राम टक्के क्लोरडेण / ओल्द्रीन पावडर व जमिनीच्या पृष्ठभागावरील चांगली माती अथवा गाळाची माती यांच्या केलेल्या मिश्रणाने करून घ्यावेत . 

निवड केलेली कलमे मान्सूनच्या ३ ते ४ वेळा पाउस पडून गेल्यानंतर व जमिनीत योग्य अशा ओल झाल्यावर लावावीत . कलमे मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना व खड्यात पुरेशी ओल असताना ;लावावीत . कलमांचा डोळा पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवावा . यामुळे जोराच्या वार्यामुळे डोळा खचण्याचा संभाव नसतो . कलम खड्ड्यात ठेवल्यानंतर मूळ स्वाभाविक अवस्थेत ठेवून माती हळूहळू खड्यात टाकावी . 

माती हलक्या हतीने दाबावी . जोरात मातीवर दाब दिल्यास तंत्मुळे तुटण्याची दाट  शक्यता असते . कलम पान्हेरीतून काढताना काही मूळ्या तुटतात . त्यामुळे क्लामावरील पानाचे शोषण होत नाही . अशा वेळी सर्व पाने ठेवल्यास कलम वळण्याची शक्यता असते . म्हणून लागवडीपूर्वी कलमाच्या खालच्या बाजूची अर्धी पाने काढून टाकावीत . खुंटावर आलेली फुट (कोंब ) जोमाने वाढतात . म्हणून ती  वरचेवर काढावी . कलमे लावल्यानंतर कलामना अंदाजे १ लिटर पाणी देणे योग्य राहील 

पाणी :- 

संत्रापिकास एका वर्षात साधारता २४ ते  २५ ओलिताच्या पाळ्या द्याव्या लागतात . हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने . उन्हाळ्यात ६ ते ७ दिवसांच्या अंतराने तर पावसाळ्यात गरजेप्रमाणे ओळीत करावे . ओळीत   देण्यासाठी रिंग पद्धतीने आले तयार करावेत व बाहेरील  आल्यात पाणी द्यावे . कारण झाडाची अन्न व पाणी घेणारी मुले झाडाच्या परीघाक्डील भागात पसरलेली असतात . या पद्धतीमुळे झाडाच्या खोडास पाणी लागत नाही . त्यामुळे दिन्कासारख्या रोगाला झाडे बळी पडून रोगांना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते .