कोबी:-
कोबी व फुलकोबी हि थंड हवामनात येणारी पिके आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये कोबी पिकाखाली अंदाजे ७२०३ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे ७००० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. या पिकांमध्ये फाॅस्फरस ,पाेटॅशियम,सल्फर, चुना, सोदिम, लोह हि खनिजे द्यावे असून अ ब क हि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे या भाजीपाला पिकांना आहारात महत्व आहे.
हवामान:-
या पिकांना हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारण पाने १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक असते. फुलकोबीच्या जतिओ तापमानाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असल्यामुळे गरजेनुसार करावी.
जमीन:-
रेताड ते मध्यम काळी निचर्याची जमीन या पिकास लागवडीस योग्य आहे. जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ च्या दरम्यान असावा.
पूर्वमशागत:-
जमिनीची उभी आडवी नांगरट करून कुलाव्याच्या पाळ्या देऊन देकले फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत २० ते ३० तन हेक्टरी या प्रमाणत शेणखत मिसळावे. जमिनी सपाट करून या भाज्यांच्या लवकर व उशिरा येणाऱ्या जातींच्या लागवडीस अनुसरून अनुक्रमे ४५ ते ६० सेमी अंतरावर सार्या तयार घ्याव्यात. कोबी या पिकाची लागवड सपाट वाफ्यावर सुद्धा केली जाते. त्या करिता जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतावर वाफे तयार करावेत .
लागवडीचा हंगाम:-
या पिकांची ;लागवड सप्टेंबर , ऑक्टोंबर महिन्यात करतात.
बियाण्याचे प्रमाण:-
हेक्टरी ०.६०० ते ०.७५० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बी गरम पाण्यात ५० अंश सेल्सिअस तपमानस अर्धा तास किवा स्टेप्टोसायकलीन च्या १०० पीपीएम द्रावणात २ तास बुडवावे. व नंतर बी सावलीत सुकावावी.
लागवड:-
या पिकाची रोपे गादी वाफ्यावर तयार करतात. वाफ्याच्या रुंदीस समांतर १२ ते १५ अंतरावर रेषा ओढून बियाणे पातळ पेरावे व बियाणे मातीने अलगद झाकावे.,
बियांची उगवण होईपर्यंत झारने पाणी द्यावे. बी पेरल्यापासून ४ ते ५ आठवड्यातरोपे लागवडीस तयार होतात.लाडविपुर्वी सारी वरंबे अथवा वाफे यांना खतांचा मात्र द्यावी. लवकर येणाऱ्या जातींकरिता ४५ बाय ४५ सेमी वर तर उशिरा येणाऱ्या जातींना ४५ बाय ६० सेमी किवा६० बाय ६० सेमी अंतरावर लागवड करावी. रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपे १० लिटर पाण्यात ३६ इसी मोनोक्रोटोफॉस टाकून या द्रावणात बुडवून द्यावी.
खते व पाणी व्यवस्थापन :-
कोबी पिकास लागवडीपूर्व ८० किलो नत्र८० किलो स्फुरद व ८० किलो पालाशद्यावे व लागवडीनंतर १ मिहीण्याने ८० किलोचा नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसेच फुलकोबीसाठी ७५ किलो नत्र ७५ किलो स्फुरद आणी ७५ किलो पालाश द्यावे. लागविनंतर १ मिहीण्याचे ७५ किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
लागवडीनंतर तिसर्यादिवाशीआणि नंतर पुरेसा ओलावा/. राहील अशा अंतराने जमिनीचा मागद्य्र पाहून पाण्याचा पाळ्या द्याव्यात. कोबिओ व फुलकोबीचे गड्डे निघे लागल्यापासून गाद्द्च्यंची वाढ होईपार्य्नात भरपूर पाणी द्यावे व नंतर हलकेसे पाणी द्यावे.
आंतरमशागत:-
शेत २ ते ३ खुरपणी करणा रोपांच्या बुंध्याशी मातीचा आधार द्यावा. महणजे रोपे कोलमडत नाही व रोपांची वाढ चांगली होते. फुलकोबीच्या गाद्यांची पंढरी शुभ्र प्रतीक्षा तयार होण्याकरिता गड्डे काढणीपुर्वी १ आठवडाभर गाद्द्यच्या आतील पानांची झाकून द्यावे. त्यामुळे सुर्यप्रकश्यामुळे होणारी हानी तलाली जाते.
कीड व रोग:-
कोबी वर्गीय भाज्यंना मावा तुडतुडे फुलकिडे कोबीवरील आली केबाज बटर फलाय असे विविध किडींचा तसेच ब्लॅक लेग ,क्लब ऋत , घाण्या रोग ,रोपे कोलमडणे ,लीफ स्पॉट या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
किडीच्या बंदोबस्तासाठी रोपवाटीकेतील रोपांपासून ते लागण झालेल्या भाजांवर एन्डोमिडॉन ३५ सी सी २९० मिली किवा फाॅस्फोमिडॉन ८५ डब्लूएस सी ६० मिली किवा मॅलेथिआँन ५० सी सी २५० मिली २५० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे. किडी व रोगाचे एकत्रितरीत्यानियंत्रण मॅलॅथिआँन ५० सी सी ५०० मिली आधिक कॉपरआँक्झक्लोराईड ५० डब्लू पी १०५० ग्राम किवा डायथम एम ४५,५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. वरील कीटक नाशकांच्या २ ते ३ फावर्ण्य्ता १० ते १२ दिवसांच्या अंतराने कराव्यात .
काढणी व उत्पादन :-
जतिपरत्वे कोबी २ ते ३ महिन्यात तयार होईतो. तयार गड्डा हातस टणकलागतो. तयार गड्डा जादाकाळ तसाच टेवला तर पाणी दिल्याव्ब्र टो फुटून नुकसान होण्याच्या संभव असतो. म्हणून टो वेळीच काढून घ्यावा. फुलकोबी चा गड्डा पिवळसर पडण्यापूर्वी काढावा.
कोबीचे २०० ते २५० किव्न्तल तर फुलकोबीचे १०० ते २०० किंटल हेक्टरी उत्पादन घेता येते.