कागदी लिंबू :-
जमीन :-
मध्यम काळी , हलकी , मुरमाड , पाण्याचा उत्तम निचरा होणारी , ६.५ - ८.० सामू , चुनखडी विरहित , क्षारांचे प्रमाण ०.१ टक्के पेक्षा कमी व चुन्याचे प्रमाण ७ - ८ टक्के पेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य आहे .
सुधारित जाती :-
साई शरबती , फुले शरबती .
लागवडीचे अंतर :-
६ * ६ मीटर , खड्ड्याचे आकारमान १ * १ * १ मीटर .
उत्पादन :-
७५ ते १२५ किलो / झाड ( ५ वर्षावरील झाड )
पाणी व्यवस्थापन झाडांना दुहेरी अळी ( अळी रिंग ) पद्धतीने जमिनीच्या मगदुराप्रमाणे उन्हाळ्यात १० - १५ दिवसांनी तर हिवाळ्यात अंतराने पाणी द्यावे .
आंतरपीक :-
सुरुवातीच्या ४ - ५ वर्षापर्यंत पत्ता पद्धतीने मुग , चावली , भुईमुग , उडीद , श्रावण घेच्दा , कांदा , लसून , कोबी , हरभरा , मेथी आंतरपीक म्हणून घ्यावे .
बहार व्यवस्थापन :-
कागदी लीम्बुच्या हस्त बहरतील अधिक उत्पादनासाठी जून महिन्यात जिब्रेलिक असिड ( जी . ओ . ३ ) १० पी . पी . एम . संजीवकाची व ऑक्टोंबर महिन्यात १ टक्का पोटाशींअम नायत्रेत द्रावणाची फवारणी करावी .
तण व्यवस्थापन :-
ग्लाय्फोसेट ( ग्लायसेल ) १०० -१२० मिली + १०० - १२० ग्राम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून तनाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर फवारणी करावी , त्यानंतरचा दोन फवारणी तानांची पूर्णउगवण ३० टक्के आढळून आल्यानंतर कराव्यात .
कीड व रोग नियंत्रण :-
पाने पोखरणारी अळी :-
अबामेफ्तीन ४ मिली किंवा नोहाळूरोन ५ मिली किंवा इमीडाकलोपरिद २.५ मिली किंवा थायडीकर्ब १० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
पाने खाणारी अळी :-
क्कीनोलफोस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
काळी माशी :
एसेटेफेट १५ ग्राम किंवा ट्रायझोफोस २० मिली १० लिटर पान्यात मिसळून फवारणी करावी
सिल्ला , मावा :-
अबामेक्तीण ४ मिली किंवा पोरपगाईड १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
पिठ्या ढेकुण :-
क्लोरपायरीफोस २५ मिली किंवा डायमिथोएट १५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
लाल कोळी :-
अबामेक्तीन ४ मिली किंवा पोपरगाईड १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कॅकर / खैया :-
रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी , छाटलेल्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे . पावसाळ्यातील महिन्यात ष्ट्रेप्तोसायक्लीन १ ग्राम + कॉपर ओक्सिक्लोराएड ३० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून ३ - ४ फवारणी कराव्यात . किंवा जून महिन्यातील छाटणीनंतर कॉपर ओक्सिक्लोराइड ( ३० ग्राम १० ली . पाणी ) ची एक फवारणी नंतर ३० दिवसाच्या अंतराने बोर्डो मिश्रण ( १ कि . मोरचूद + १ कि .चुना + १०० ली . पाणी ) च्या दोन फवारण्या व नंतर निंबोळी अर्क च्या दोन फवारण्या ( ५०० ग्राम १० ली . पाणी ) कराव्यात .
ट्रीस्टेझा :-
मावा या रोगावाहक किडींचे आंबा बहार , मृग बहार व हस्त बहरतील नवीन पालवीचे अंतरप्रवाही कीटकनाशक वापरून रोगाचा प्रसार नियंत्रित ठेवावे .
पायकुज व डीक्या :-
पावसाळ्यापूर्वी फोसेटाएल अल ( ३० ग्राम १० ली . पाणी ) ची फवारणी करावी आणि झाडाच्या खोडात ६० -९० सेमी उंचीपर्यंत पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट लावावे . किंवा मेटलक्झील अधिक माकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून खोदाशेजारील मातीत एक महिन्याच्या अंतराने दोनदा ओलेचिंब किंवा ड्रेचिंग करावी .
शेंडे मर :-
पावसाळ्यापूर्वी व नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे . कार्बनडेझिम १० ग्राम किंवा मान्कोझेब २० ग्राम कॉपर ओक्स्वीक्लोराइड ३० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून वार्ह्सातून ३ - ४ फवारण्या कराव्यात .