पपई :-
पपई हे सतत हिरवे राहणारे फळझाड आहे . भारतात ते सोळाव्या शतकात आणले गेले . हल्ली त्याची लागवड हवाई बेटे , श्रीलंका , दक्षिण आफ्रिका , मलेशिया , ऑस्ट्रेलिया , फिलीपिंस बेटे आणि भारत या प्रदेशात होते .
भारताच्या कोरड्या तसेच पावसाळी हवामानाच्या व समुद्रसपाटीपासून १,३०० मी उंचीपर्यंतच्या प्रदेशात पपई वाढू शकते .
उपलब्ध माहितीप्रमाणे भारतातील पपईच्या लागवडीचे एकून क्षेत्र १० , ८४८ हे असून सर्वात जास्त क्षेत्र (३ , ८८० हे .) बिहार राज्यात आहे . आसाममध्ये २ , ०४१ हे मध्य प्रदेशात २, ००० हे आणि महाराष्ट्रात व गुजरात मिळून १, २३६ हे . क्षेत्र आहे आणि इतर राज्यात १, ४१७ हे . क्षेत्र आहे .
हवामान :-
कोरड्या उष्ण हवामानात आणि योग्य पाणीपुरवठा असेल अशा ठिकाणी पपईची वाढ चांगली होते . २ से . च्या खालील तापमान पपई ला मानवत नाही . थंड हवामानात तयार झालेली फळे बेचव असतात .
जमीन :-
पपईच्या लागवडीला मोकळी , पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थाचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते . गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळ्या जमिनीत पपई चांगली वाढते .
खडकाळ चुनखडीच्या व जैव पदार्थाचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत परीची वाढ चांगली होत नाही . या पिकाच्या बाबतीत पाण्याच्या निचरयाला फार महत्व आहे . पाण्याच्या निचर्याला फार महत्व आहे . पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास रोगामुळे खोड बुंध्याशी कुजते .
लागवड :-
रोपे लावून लागवड करतात . नांगरणी , भरखत घालणे , कुळवणी वगैरे मशागत केलेल्या जमिनीत कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्यात सुरुवातीला व जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्यात अखेरीला रोपे लावतात .
रोपे तयार करणे :-
चांगल्या जातीवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुवून स्वछ करून व सावलीत वाळऊन साठवून ठेवतात . रोपे करण्याकरिता ताजे बी नेहमी चांगले असते . लागवडीच्या वेळेच्या आधी सु . दोन महिने रोपांसाठी बी पेरतात .
एक हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावयाला २५० ग्रा . बी पुरेसे होते . बी सामान्यतः गादी वाफ्यात लावतात . रोपे ९ - १२ सेमी . उंचीची झाल्यावर ती वाफ्यातून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात . दोन खड्ड्यांमध्ये २ - ३ मी . हमचौरस अंतर ठेवून रोपे लावतात .
रोपाच्या अवस्थेत नर आणि मादी असा भेद ओळखता येत नाही . त्यामुळे लावलेल्या रोपामधून ४० -६० टक्केच मादीची झाडे निघतात . बाकीची नरझाडे असतात . नरझाडाला फळे येत नाही म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी येते .
हे टाळण्यासाठी एकेका आळ्यात ( खड्यात ) दोन - तीन रोपे लावतात . रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असा भेद ओळखता येतो .
तेव्हा संबध बागेत दोन - चार नराची झाडे ठेवून बाकीची नराची झाडे तोडून टाकतात . त्यामुळे त्या लागवडीस कमीत कमी निम्म्यापेक्षा अधिक मादी झाडे मिळतात .