स्ट्रोबेरी :- 

स्ट्रोबेरी हे थंड हवामानात येणारे  पिक आहे . स्ट्रोबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक ठिकाणीच होत असे , पण अलीकडे या पिकाची इतर ठिकाणीही होऊ लागली आहे . 

महाराष्ट्रात स्ट्रोबेरीच्या फालाभोवती आकर्षणाचे वलय निर्माण झाले आहे , कारण फळाचे नाविन्य , या फळातील  पोषणमुल्ये आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली मागणी यामुळे भारतामध्ये नोव्हेंबर घेता येते . 

त्यामुळे स्ट्रोबेरी ताज्या फळाना युरोपीय देशांत निर्यातासाठी भरपूर वाव आहे . याचा वापर आईस्क्रीम , जाम , , जेली , साबण , धूप , औषध तसेच सौंदर्य प्रसाधने मध्ये केला जातो . 

स्ट्रोबेरीसाठी उपयुक्त हवामान :- 
समशीतोष्ण हवामानास हे पिक चांगला प्रतिसाद देते . 

स्ट्रोबेरीच्या उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि १० -२५ अंश से. तापमान पोषक ठरते . प्रदेशातून आयात केलेल्या ( कॅलोफोर्निया ) जातींना सरासरी ३० ते ३७ अंश से . तापमान , ६०  ते ७० टक्के हवेतील आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश असे  हवामान चांगले मानवते .

स्ट्रोबेरीसाठी जमिनीची निवड :- 

स्ट्रोबेरीच्या उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी हलकी , मध्यम काळी , वालुकामय पोयटा , गाळाची जमीन असावी . जमिनीचा आम्ल - विम्ल निर्देशांक ५.५ ते ६.५ या दरम्यान योग्य असतो . भुसभुशीत - वालुकामय जमिनीत स्ट्रोबेरीच्या रोपांची मुले जोमाने वाढतात . 

स्ट्रोबेरीच्या विविध जाती :- 

महाराष्ट्रात प्रामुख्याने सेल्वा , चॅन्डलर , स्वीट चार्ली , कॅमारोझा , रागीय , डग्लस , फेस्टिवल , ओसो ग्रंडी , विंटर दोन , केलाजंत , पाजारो इत्यादी कॅलीफोर्नियन  जातींची आयात केली जाते . 

पिकाच्या विविध जाती दिवस व रात्रीच्या कालावधीस विशेष प्रतिसाद लक्षात घेता स्ट्रोबेरीमध्ये शोर्ट डे जाती व डे  न्युट्रल जाती अशा दोन प्रकारच्या जाती आढळतात . 

शॉर्ट डे जाती :- 

या जातींना दिवस लहान व रात्र मोठी असताना फुले येतात . सुयाप्रकाशाचा कालावधीत ठराविक कालावधीपेक्षा ( १० तास ) जास्त असल्यास या जातींना फुले येत नाही . उदा . डग्लस , चॅडलर , पाजारो , ओसो ग्रडी इ . 

डे न्युट्रल जाती :- 

या जातींना दिवस  कितीही लहान असो किंवा मोठा असला तरी वाढीवर व फुलधारणेवर परिणाम होत नाही . अशा जातींना वर्षभर व फुलधार्नेवर परिणाम होत नाही . अशा  जातींना वर्षभर फुले येतात . उदा . सेल्वा , फर्न , आयर्विन इ . भारतीय कृषी संशोधन परिषद , नवी दिल्ली यांनी विकसित केलेली पुसा अर्ली ड्वार्फ हि जात न्युट्रल प्रकारची आहे . 

पूर्वमशागत :- 
उन्हाळ्यात जमिनीची उभी - आडवी खोलवर नांगरत करून , तव्याच्या कुळवाणे ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी . 

तनाचे व जुन्या पिकाचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत .

हिरवळीच्या खतासाठी  धेंचा किंवा तागासारखे पिक जमिनीत घ्यावे . 

शक्यतो स्ट्रोबेरी लागवडीच्या अगोदर घेतल्या जाणारया पिकास शेणखत अथवा कम्पोष्ट खत एकरी ८ ते १० टन दिलेले असावे . 

गादीवाफे . :- 

स्ट्रोबेरीच्या मुळे मातीच्या वरच्या १५ ते २० सेमी पर्यंतच्या थरातच वाढतात . स्ट्रोबेरीच्या चांगल्या मउ आणि भुसभुशीत गादी वाफे तयार करावेत . 

गादी वाफ्यावर स्ट्रोबेरीची लागवड दोन ओळी तीन अथवा चार ओळी पद्धतीनेसुद्धा केली जाते . त्यानुसार योग्य आकाराचे तयार करावेत .

दोन ओळी पद्धतीमुळे ९० - सेमी रुंद व ३० ते ४५ सेमी उंच असलेल्या गादीवाफ्यावर दोन रोपांतील अंतर ३० सेमी व दोन ओळीतील अंतर ६० सेमी असावे . दोन ओळी पद्धतीत प्रती एकर २२ ते २५ हजार रोपे लागवडीसाठी लागतात . 

तीन ओळी पद्द्ध्तीसाठी १२०  सेमी रुंद व ३० ते ४५ सेमी उंची गादी वाफे करावेत . 

चार ओळी पद्धतीनेही लागवड होत असली तरी आंतरमशागत , फळ तोडणी , गाडीवाफ्यास प्लास्टिक मल्चिंग करणे यामध्ये अडचणी येत असल्याने प्रामुख्याने दोन ओळी पद्धतीने लागवड सोयीस्कर ठरते . 

रोपे अशी असवित :-

रोपे एकसारख्या समान वाढीची , ४ ते ५ पाने असलेली असावीत . 

रोपांची पाने निरोगी व गर्द हिरव्या रंगाची असावीत . 

तसेच रोपांना फुलधारणा झालेली नसावी .

रोपांची मुळे लांब , पांढरया रंगाची असावीत . 

रोपे किडी व रोगापासून मुक्त असल्याची खत्र५इ करावी . 

खात्रीशीर रोपवाटिकेत व शक्यतो प्लास्टिक पिशवीत वाढवलेली रोपे लागवडीसाठी निवडावीत . 

रोपे जमिनीतून खोडून काढताना मुळाना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी कुजलेली मुळे आढळल्यास अशी रोपे काढून टाकावीत . रोपांच्या मुळाना लागलेली माती स्वछ धुवून रोपे मेटॅलॅक्झील १ ग्राम प्रती लिटर पाणी या द्रावणात १५ ते २० मिनिटे पानांसहित बुडवून ठेवावीत . 

रोपांची गादीवाफ्यावर लागवड :- 
स्ट्रोबेरीची लागवड उन्हाळा , हिवाळा , व पावसाळा या तिन्ही हंगामात करता येते ; परंतु महाराष्ट्रातील ऑक्टोंबर ते मार्च या कालावधीत हवामान पोषक आहे . 

पश्चिम घाटातील डोंगराळ प्रदेशात स्ट्रोबेरीची लागवड पाउस थांबतच म्हणजे ऑक्टोंबर - नोव्हेंबर महिन्यात करणे योग्य ठरते . 

तयार केलेल्या गादीवाफ्यावर दोन ओळी पद्धतीने लागवड करण्यासाठी दोन ओळी पद्धतीने लागवड करण्यासाठी १ फुट * १ ग्राम चांगले कुजलेले शेणखत , ५ ग्राम मिथाइल पॅराथीओंन  पावडर  किंवा चिमुटभर फोरेट ( १० जी ) आणि आवश्यक रासायनिक खतांची मात्र टाकून ते व्यवस्थित मिसळावे . त्या मिश्रणात मध्यभागी मुठभर माती टाकून त्यात रोप लावावे . प्लास्टिक पिशवीतील रोप असल्यास टी पिशवी काढून त्याच्या बुडातील थोडी माती मोकळी करून ते रोप लावावे . 

रोपाचा सुरवा ( कोंब ) जमिनीत गाडला जाणार नाही याची काळजी घेऊन बाहेरील मातीने मुळे पूर्णपणे झाकावीत . 

पूर्वी स्ट्रोबेरी या फळपिकाची लागवड होत असे . 

मात्र केवळ महाराष्ट्रातच महाबळेश्वर , पाचगणी , वी , मेढा , गोरेगाव ( जी सातारा ) , चंडीगड (जी कोल्हापूर ) , पुणे , लोणावळा ( जी पुणे ), नाशिक , इगतपुरी ब, सुरगाणा (जी नाशिक ) व नागपुकडील लागवड वाढली आहे . त्याचे एकत्रित क्षेत्र ९०० हेक्टरच्या नाधिक आहे . 

परदेशी जातींची लागवड :- 

भारतामध्ये स्ट्रोबेरीच्या काही देशी जाती उपलब्ध होत्या . मात्र सन १९९० -९१ मध्ये कालीफोर्निया येथून सेल्वा , चॅन्द्दलर  व पाजारो या जाती लागवडीसाठी  आयात करण्यात आल्या . 

या नवीन जातींच्या लागवडीमुळे प्रती हेक्टरी उत्पादकता २.५ टनापासून ७.० टनापर्यंत वाढलेली  दिसून  येते . 

प्रत्यक्ष कॅलिफोर्निया जातींची प्रती हेक्टरी उत्पादनक्षमता ३०.० टणापासून  ५०.० टनापर्यंत आहे . म्हणजेच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे शक्य आहे . 

स्ट्रोबेरी :- 
१ ) पाणी - ८७.८ % 

२ ) प्रथिने - ०.७ % 

३ ) स्निग्ध पदार्थ - ०.२ % 

४ ) खनिजे - ०.४ % 

५ ) तंतुमय पदार्थ - १.१ % 

६ ) कर्बोदके - ९.८ % 

७ ) फोस्फरस - ०.०८ % 

८ ) लोह - १.८ % 

९ ) उर्जा मूल्य (१००ग्रम ) - ४४ मी. ग्राम 

१० ) जीवनसत्व ब १-३० मी . ग्राम 

११ ) जीवनसत्व क -५२ मी . ग्राम