प्रस्तावना :-
झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपीक आहे.या फुलांचा उपयोग पुलंच्या माळा करणे,व्यासपीठ साम्ज्विणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात. याशिवाय निरनिराळ्या पुष्प रचनेमध्ये बगीच्यांमध्ये रस्त्यालगत ,तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पिक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला जातो.
जमीन व हवामान :-
झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. ठाण हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो.वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी ,हिवाळी,उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जैलीच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि पुलंच्या दर्जावर चांगला परिणाम होतो.त्यामुळे जुलै च्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या झेंडू पासून मिळते .
झेंडूची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. झेंडू साठी सुपीक,पाणी धरून ठेवणारी परंतु पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते . ज्या जमिनीचा सामू ७.० ते ७.६ इतका आहे त्या जमिनीत झेंडूचे पिक चांगले येते झेंडू या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे.सावली मध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले येत नाहीत.
जाती:-
अ)आफ्रिकन झेंडू:-
या प्रकरची झेंडूची झुडुपे उंच वाढतात झुडूप काटक असते.पावसाळी हवामानात झुडुपे १०० ते १५० से.मी पर्यंत उंच वाढतात फुलांचा रंग पिवळा ,फिकट पिवळा नारंगी असतो.या प्रकारांमध्ये पुढीलप्रमाणे जातींचा समावेश होतो.जयांटडबल ,आफ्रिकन यलो अर्ली यलो,अर्ली ऑरेंज , गियाना गोल्ड बंगलोर लोकल ,दिशी सनशाईन ,आफ्रिकन टॉल डबल ,यलो सुप्रीम ,हवाई ,अलास्का ,इत्यादी
ब) फ्रेंच झेंडू :-
या प्रकारातल झेंडूची झुडुपे उंचीला कमी असतात व झुडुपासारखी वाढतात झुडुपांची उन्हाची ३० ते ४० से.मी.असते.फुलांचा आकार लहान मध्यम असून अनेक रंगाची फुले असतात या प्रकारातील जाती कुंडीत,बागेत रस्त्याच्या दुतर्फा,तसेच फुलांचा गालीचा तयार करण्यासाठी ,हिरवळीचा कडा सुशोभीकरणासाठी लावतात . या प्रकारामध्ये पुढीलप्रमाणे जातींचा समावेश होतो.यलो बॉल,हार्मोनी बॉल लिटल डेव्हिल बायकलर स्प्रे ,लेमन ड्वाफ यलो ,रेड मारीटा हार्मोनी,सोफिया , इत्यादी .
सुधारित व संकरीत जाती:-
पुसा नारंगी :-
या जातीस लागवडीनंतर १२३-१३६ दिवसानंतरफुले येतात झुडूप ७३ से.मी.उंची वाढते व वाढ देखील जोमदार असते.फुले नारंगी रंगाची ७ ते ८ से.मी. व्यासाची असतात हेक्टरी उत्पादन ३५ मे.टन/हेक्टरी या प्रमाणे येते.
पुसा बसंती :-
याजातीस १३५ ते १४५ दिवसात फुले येतात .झुडूप ५९ से.मी.उंच वव जोमदार वाढते.फुले पिवळ्या रंगाची असून ६ ते ९ से.मी.व्यासाची असतात प्रत्येक झुडूप सरासरी ५८ फुले देते.कुंड्यात लागवड करण्यासाठी हि जात जास्त योग्य आहे.
एम.डी.यु.१:-
झुडुपे मध्यम उंचीची असतात.उंची ६५ से.मी.पर्यंत वाढते या झुडूपास सरासरी ९७ फुले येतात व ४१ ते ४५ मे.टनप्रती हेक्टार या प्रमाणे उत्पादन येते.फुलांचा रंग नारंगी असतो व ७ से.मी.व्यासाची असतात.
लागवड पूर्व तयारी :-
लागवड पूर्व जमिनीची २ ते ३ वेळा खोलवर नांगरट,२ ते ३ वेळा फणणी करून धसकटे व हरळीच्या काशावेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून ५० किलो नत्र,२०० किलो स्फुरद व २००किलो व २०० किलो पालाश लागवडी पूर्वीच जमिनीची पूर्णपणे मिसळून घयवे.व नंतर ६० से.मी.अंतरावर सरी वरंबे तयार करून घ्यावेत व त्यानंतर सऱ्याची नाके तोडून पाणी पुरवठ्याच्या सोयी प्रमाणे वाफे करून घ्यावीत .
लागवड :-
झेंडूची लागवड करताना ५० से.मी.अंतरावर घेतलेल्या सरीच्या मध्यभागी ३० से.मी.इतके दोन रोपांमधील अंतर ठेऊन लागवड करावी.६० *३० से.मी अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४०,००० रोपे लागतात .लागवड करतांना भरपूर पाण्यामध्ये व सायंकाळी ४ नंतर लागवड करावी.म्हणजे रोपांची मर होत नाही.
आंतरमशागत :-
लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी.त्यावेळी नत्र खताचा दुसरा हप्ता ५० किलो प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा .लागवड केलेल्या वारंबा फोडून दुसऱ्यावाराम्ब्यास माती लावावी व झाड मध्यभागी घ्यावे.त्याचवेळी रोपाचा शेंडा खुडावा म्हणजे झेंडूच्या रोपास भरपूर फांद्या फुटतात व उत्पादन चांगले येते.
खते:-
आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे.टन प्रतीहेक्टार या प्रमाणे तसेच १०० किलो नत्र,२०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश या प्रमाणे खाते द्यावी .संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रती हेक्टर नत्र २५० किलो ,स्फुरद ४०० किलो या प्रमाणे लागवडी पूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खाते द्यावीत .
रोपवाटिका :-
रोपवाटिका करण्यापूर्वी ३ *१ मी.या आकारमानाचे व २० से.मी उंचीचे २० गादीवाफे करावेत.त्यामध्ये प्रत्येक वाफ्यात १९:१९:१९ हे ५० ग्रम व ८ ते १० किलो चाळलेलेशेणखत मिसळावे.त्यात ५ ग्रमप्रती चौ.मी.या प्रमाणे फोरेट मिसळून घ्यावे.१० से.मी.खोल करून घ्याव्यात त्यामध्ये दोन बियाण्यातील अंतर १ इंच ठेवून बियाणे पेरावे .हे बियाणे वस्त्रगाळ केलेली माती,शेणखत व वाळू यांचे ब२:१:१ या प्रमाणे मिश्रण करून या मिश्रणाचे बी झाकूनटाकावे.त्यावर रोज सकाळी व सांयकाळी पाण्याचा फरावा मारावा व बियाणे उगवेपर्यंत गादिवाफे ,गवतपालापाचोळा किंवा पाने झाकून घयवे.वाफे नेहमी ओलसर म्हणजे वापसा अवस्थेत ठेवावीत त्यापेक्षा जास्त पाणी देखील होऊ देऊ नये ,किंवा पाणी कमी देखील पडू देऊ नये.रोपे वापसा अवस्थेत असतानाच रोपे काढावीत बियाणे पेरणीपासून २५ ते ३० दिवसात रोपे लागवडीस तयार होतात .
पिक संरक्षन (रोपवाटिका ):-
सुदृढ रोपे मिळण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणीनंतर एका आठवड्याने कार्बन ड्रेझिम २० ग्राम किंवा कॅपटॉप २० ग्रम प्रति१० लिटर पाणी त्याचप्रमणे फवारणी करावी.त्याचप्रमाणे अंतरप्रवाही किटीकनाशके व बुरशीनाशक यांच्या आठ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्य द्याव्यात .
पाणी:-
हंगाम झेंडूचे पिक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे.काळ्या लागल्यापासून फुलांची काढणी हौइपर्यन्त पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
पिक संरक्षण :-
झेंडू या पिकावर मावा , तुडतुडे ,पांढरी माशी ,लाल कोळी ,नाग अळी, अळी कटवर्म या किडींचा व करपा ,मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.त्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक कीटक नाशक /बुरशीनाशक फवारावे फवारणी करतांना प्रत्येक फवारणी मध्ये ५ मी.ली.प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे.
उत्पादन:-
झेंडूच्या फुलांचे हेकॅत्री १२ ते १५ टन उत्पादन मिळते.संकरीत जातींची लागवड केल्यास प्रती हेक्टरी १८ ते २० टन उत्पादन मिळते.
हे लक्षात ठेवा:-
बाजार पेठेत सतत फुलांचा पुरवठा होण्यासाठी १५ दिसांच्या अंतराने लागवड करा.
रोपे तयार करतांना जास्त काळजी घ्या सुधृद रोपांचीच लागवडी साठी निवड करा
ज्या जमिनीत सुत्कृमिंचा प्रादुर्भाव जास्त आहे,त्या ठिकाणी झेंडूची लागवड करा.
पाणथळ जमिनिओत झेदुंची लागवड केऊ नका.