प्रस्तावना:-

निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून,त्याची लागवड महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे करता येते व हे पिक राज्यात उत्कृष्ट रित्या उत्पादन देते. निशिगंधाची फुले हारामध्ये वापरली जातात शिवाय विविध प्रकारच्या पुष्प्रचानेमध्ये देखील या फुलांचे वेगळे स्थान आहे.यामध्ये सिंगल व डबल या प्रमाणे फुलांमधील पाकळ्यांचा राचेप्रमाणे प्रकार पडतात .

सिंगल प्रकारच्या निशिगाब्धची फुले अधिक जास्त सुवासिक असतात व त्यांचा वापर हारांमध्ये व गजरयामध्ये केला जातो.डबल प्रकारच्या निशिगंधाच्या फुलदांड्याच्या वापर पुष्प रचणे मध्ये व बुकेमध्ये केला जातो . या फुलांचा वापर सुगंधी द्रव्ये निर्माण करण्यासाठी देखील केला जतो.

जमीन व हवामान:-

 निशिगंधाची लागवड कोणत्याही हवामानात केली जाते या साठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार जमीन चांगली मानवते.पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंद सडतात व झाड मरते.त्यामुळे दलदलीची व निचरा न होणारी जमीन या पिकासाठी निवडू नये.

अभिवृद्धीचा प्रकार:-

निशिगंधाची लागवड कंदापासून करतात . एका कंदापासून दुसऱ्या वर्षी ५ ते ६ कंद विकसित होतात.त्यातील प्रत्येक कंद मुख्य कंदापासून विलग

करून त्याची लागवड करतात .निशिगंधाची लागवड एप्रिल , में किंवा सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात करावी.

लागवड:-

निशिगंधाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफ्यामुळे किंवा सारी-वरंब्यावर केली जाते.हलकी ते मध्यम व उत्तम निचऱ्याचीअसेल तर ३ मी.*२मि .आकारमानाच्या सपाट वाफ्यात ३०*२० से.मी.अंतरावर ४ ते ५ से.मी.खोल लागवड केली जाते. जमीन जर काही कसदार असेल तर ४५*३० से.मी खोल लागवड वर्बाच्या मध्यभागी ५ ते ६ से.मी खोल कंदाची लागवड केली जाते.निशिघांधाची हेकॅत्री १ लाख ते १.५ लाख कंद लागतात .लागवड पूर्ण झाल्यावर ताबडतोब पाणी द्यावे.

लागवड पूर्व तयारी :-

ज्या ठिकाणी निशिगंधाची लागवड करावयाची आहे.टी जमीन मार्च एप्रिल महिन्यात खोल नागरणी करावी.त्यानंतर दोन ते तीन वेळा फाननी करून धसकटे,हरलीच्या कशा वेच्याव्यात व जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी त्यानंतर हेक्टरी २५ ते ३० टन चांगले  कुजलेले शेणखत पसरावे व हेकॅत्री ७५ किलो नात्र ३०० किलो स्फुरद , व ३०० किलो पालाश लागवडी पूर्वीच जमिनीत मिसळून द्यावे.

वरील सर्व सेंद्रिय व रासायनिक खाते जमिनीत चांगले मिसळून घ्यावीत व नंतर जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफे आठवा सार्या पडून रान बांधणी करावी.

खते:-

लागवडीनंतर ४५ दिसांनी हेक्टरी ६५ किलो नात्र व ९०  दिवसांनी ६० किलो नात्र द्यावे. निशिगंधास प्रती वर्षी २०० किलो नात्र,३०० किलो स्फुरद व ३०० किलो पालाश या प्रमाणे खाते आवश्यक आहेत .

पाणी:-

निशिगंधाच्या पिकास हंगाम निहाय व जमिनीच्या मागादुराप्रम्ने ८ ते १० दिवसांनी पानाच्या पाळ्या द्याव्यात.निशिगंधास तुषार सिंचानाद्याव्रे पाणी पुरवठा केल्यास उत्पादनास चांगली वाढ होऊ शकते .

आंतरमशागत:-

मिशिगंध हे कंद वर्गीय पिक असल्याने वेळचे वेळी गवताची खुरपणी करून लागवडीचे क्षेत्र स्वच्छ व भुसभुशीत ठेवणे आवश्यक आहे. सारी वारांब्या वरील लागवडीमध्ये जर वारंवार पाणी दिल्याने कंद उघडे पडू लागळे तर दर ३ महिन्यांनी पिकाची खंडणी करून मातीचा भर देणे आवश्यक आहे. प्रत्येक खांदणीच्या वेळी खाते दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते 

जाती:-

डबल :-सुहासिनी 

सिंगल :-शृंगार 

सिंगल:-रजत,रेखा 

व्हेरीगेतेड:-सुवर्ण रेखा 

पिक संरक्षन :-

निशिगंधास मावा,फुलकिडे व अळी या किडींचा व फुल दांड्याची कुज व पानांवरील ठिपक्या रोगांचा मुख्यत्वेकरून पावसाळी व्प्रदुर्भाव दिसून येतो. त्यासाठी कोणत्याही एका कीटक नाशकाची / बुरशीनाशकाची फवारणी करावी.

कुज व पानावरील ठिपके:-

प्रत्येक फवारणी मध्ये ५ मिली / १० लिटर पाणी या प्रमाणे स्टिकर्स मिसळावे म्हणजे किडी व रोगांचे चांगले नियंत्रण मिळते.

उत्पादन:-

निशिगंधापासून प्रती हेक्टर प्रतिवर्ष ५० क्विंटल (५मि.टन)सुती फुले अथवा सुमरे २.५ लाख फुलदांडे या प्रमाणे उत्पादन मिळते.

हे लक्षात ठेवा:-

कंदाची लागवड हलक्या जमिनीत १५ ते १७.५ से.मी.व भारी जमिनीत १० ते १२ से.मी. खोल करावी.

लागवडी नंतर ४५ ते ९० दिवसांनी नत्र युक्त खाते दिल्यास झाडांची वाढ चांगली होवून उत्पादन चंगळे मिळते .

कंदाची उगवण सुरु असल्यास जास्त पाणी देणे टाळावे .