गुलाब :- 

प्रस्तावना :- 

भारताप्रमाणे जागतिक बाजारपेठेत  गुलाबाचा प्रथम क्रमांक लागतो . दरवर्षी गुलाबाचे उत्पादन वाढतच आहे . विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे . पूर्व आफ्रिकेच्या अनुकूल हवामानामुळे तेथे अत्युच्य प्रतीच्या गुलाबाची निर्मिती होते . भारतात या पिकाखाली ३००० एकर क्षेत्र आहे . युरोपात या फुलास प्रचंड मागणी आहे . जवळ जवळ ८० टक्के फुले युरोपात विकली जातात . त्या खालोखाल १५ टक्के फुलास तर अवधी ५ टक्के फुले आशिया व ऑस्ट्रेलियात विकली जातात . सध्या जपानमध्ये फुलांना मागणी वाढत आहे . 

जागतिक बाजारपेठेत हायब्रिट टी ( लांब दांडा व मोठी फुले ) प्रकाशाबरोबर फ्लोरीबंदा ( आखूड दांडा व लहान फुले ) प्रकारच्या फुलांना मोठी मागणी आहे . हरितगृहात लांब दांड्याच्या ( ५० - १२० सेमी . ) मोठ्या फुलांचे १३५ - १५० फुले चौसेमी  एवढे उत्पन्न मिळते तर आखूड दांड्याच्या ( ३० -७० ) सेमी . छोट्या फुलाचे २०० - ३५० फुले / चौसेमी . अवधी  उत्पन्न मिळते . 

हवामान :-
गुलाबाच्या लागवडीकरिता कमीत कमी १५ अंश से . तर जास्ती जास्त २८ डिग्री से . तापमानाची आवश्यकता असते . रात्रीचे तापमान वाढत गेल्यास अधिक उत्पादन मिळते . पण फुलांची प्रतीवारी बिघडते . पाकळ्यांची संख्या कमी होते . फुले लवकर उमलतात व फुलाचे काधानितोत्तर आयुष्य कमी होते . 

गुलाबामध्ये  सूर्य प्रकाशापेक्षा तापमान जास्त ठरते . काही जातींना जास्त तापमान  लागते तर काहींना कमी , काही जाती कमी  तापमानात ब्लाइंड  शूट्स ( फुले ण येण्याचा प्रकार ) अजिबात निर्माण करत नाही . कमी तापनाबरोबर कमी आर्द्रता व पाण्याचा ताण सहन करू शकतात . 

ठिकाण व जागेची निवड :- 

हातीत्गृहातील गुलाबाच्या लागवडीसाठी जागेची निवड करणे फारच महत्वाचे ठरते . बँगलोर सारखे वर्षभर सम हवामान असणारे ठिकाण निवडल्यास हरितगृहातील तापमान नियंत्रण करण्याचा खर्च वाचू शकतो . जागेची निवड करताना आजूबाजूस मोठ्या इमारती व झाडे नसावीत . जेणेकरून , हरित गृहावरून सावली पडणार नाही . 

बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या लागवडीच्या ठिकाणापासून आपल्या लागवडीच्या ठिकाणापासून दूर असतो अशा वेळेत दुवर वाहतूक कारवाई लागते . वाहतुकीच्या काळात काढणीत्तोर तंत्राचा सुयोग्य वापर केल्यास इच्छित स्थळी फुले अगदी व्यवस्थित पाठविता येतात . 

जमीन :- 

गुलाबाची मुले जमिनीत खोलवर जात असल्याने जमीन भुसभुशीत व कमीत कमी ५० सेमी . खोल असावी निवडलेल्या जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा व्हावा . मध्यम प्रतीचा जमिनीत गुलाब चांगला येतो . कारण अशा जमिनीतून अन्नद्रव्यांचा योग्य प्रकारे वाढवता येतो  तसेच अशा जमिनीत सामू यापेक्षा जास्त असल्यामुळे डोलोमाइड वापरून टो योग्य त्या प्रमाणावर आणता येतो . १,७५ कि. ग्राम . डोलोमाइड प्रती घन मीटर वापरल्यास जमिनीची सामू ०.३ - ०.५ युनिटने वाढू शकतो . जमिनीचा सामू ७.० वरून ५.०  आणण्यासाठी सल्फर १.५ कि . ग्राम . अॅल्युमिनीअम सल्फेट ३.९  कि . ग्राम . चा वापर करावा . जमिनीत क्लोरीन व सोडीयमचे  प्रमाण १.५ मी /ली पेक्षा कमी असावे  . 

जमिनीची मशागत :- 

जमिनीच्या वरच्या ( ३० सेमी ) व खालच्या ( ३१ - ६० सेमी ) थरांचे रासायनिक पृथकारण करून घ्यावे म्हणजे जमिनीतील क्षारांचे प्रमाण व अन्न द्रव्यांची उपलब्धता लक्षात येईल . हलक्या जमिनीत शेणखत , पीट , मिसळून त्या जमिनीचा कस वाढवावा , असे करण्याने , अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते . तर भारी जमिनीतून पाण्याचा निचरा होतो . कोंबडी खत होर्न मिलचा वापर टाळावा . लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे . 

त्यासाठी फोर्मालीन ०.२ टक्के प्रमाणात वापरावे . 

वाफे तयार करणे व  लागवडीची पद्धत :- 

जमिनीच्या प्रकारानुसार वाफ्यांचा प्रकार बदलतो . जर जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होत असेल तर सपाट वाफे तयार करून त्यावर दोन रोपात २५ सेमी . तर दोन ओळीत ८० सेमी . अंतर ठेवून लागवड करावी . जर जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होत असेल तर गादी वाफे तयार करावेत . 

दोन गादी वाफ्यामध्ये ४० सेमी . खोल व ८ सेमिई रुंद वर काढावा म्हणजे पाण्याचा योग्य निचरा होईल सर्वसाधारणपणे ६ - ७ झाडे प्रती चौसेमी  लावावीत . वाफ्यांची रुंदी १ मीटर दर दोन वाफ्यात ६० सेमी अंतर ठेवावे . वाफ्यांची लांबी २५ ते ४० मीटर पर्यंत ठेवावे . 

लागवडीसाठी रोपे :- 

कॅह्न्गल्या प्रतीची रोपे लागवडीसाठी वापरावीत . गुलाबाची कलमे तयार करण्यासाठी रोझा इंडिका ओडाराटा हि जात खुंट म्हणून चांगली आहे . गुलाब लागवडीसाठी पोलीबॅग पद्धत वापरून रोपे तयार करतात . सदर रोपावर पाहिजे त्या जातीचे डोळे भरून अथवा कलाम करून ती रोपे लागवडीसाठी वापरतात . 

लागवडीची पद्धत :- 

गुलाबाची रोपे महागडी असल्यामुळे व टी एकाच जागी ५ -६ वर्षे राहणार असल्यामुळे सुरुवातीस लागवड करतना काळजी घ्यावी . लागवडीपूर्वी २४ तास अगोदर रोपांना पाणी द्यावे . जमिनीत रोपासाठी मुले दुमदु नयेत .डोळे भरलेला भाग जमिनींवर २ -३ सेमी राहील याची मुळ कुजव्या रोग होतो व रोपांची वाढ व्यवस्थित होत नाही . रोपांना दररोज व्यवस्थित पाणी द्यावे . प्रतिबंधक उपाय म्हणून बुरशीनाशकांच्या एक दोन फवारण्या कराव्यात . झाडांना वळण देणे वाढणार्या झाडाला जर लगेच फुले येऊ दिली तर झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो . झाडाचा आकार निट राहत नाही . 

झाडांच्या वाढीच्या काळात वाटाण्याच्या आकाराच्या कळ्या झाल्यावर त्या काढून टाकाव्यात , झाडांची वाढ व्यवस्थित झाल्यावर मग मोठ्या फांद्या जमिनीपासून २० -३० से .मी . अंतरावर छाटाव्यात मग त्यावर फुले घेण्यास सुरुवात करावी . फांद्या छाटन्याऐवजी आकारात जमिनीलगत वाकाविल्या तरी चालतात .  त्यामुळे झाडाला जास्तीचा अन्नपुरवठा मिळतो व फ़ुलेहि जास्त मिळतात . 

खते :- 

जवळजवळ भारतातील सर्वच जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता आहे . अधिक उत्पादन मिळविण्यासाठी खतांची आवश्यकता भासते . लागवडीपूर्वी व लागवडीनंतर माती परीक्षण खताच्या मात्रा घ्याव्यात . लागवडीच्या वेळेस २ किलो सुपर फोस्फेत १ किलो कॅल्शिअम अमोनियम नायट्रेड  आणि ५०० ग्राम म्युरेट ऑफ पोटाश प्रती चौमी . द्यावे . तसेच शेणखत व, पीत व भूसाही जमिनीत मिसळून द्यावा . एकाच वेळेस खते देण्याऐवजी वेगवेगळ्या हप्त्यांत ती विभागून द्यावीत . 

हरितगृहातील द्रवरूप खते पाण्यात मिसळून दिली जातात . प्रत्येकी २०० पीपीएम नत्र व पालाश पाण्यातून रोपांना दिले४ जाते . त्यासाठी ८५ ग्राम पोटाशियम नायट्रेट व ८० ग्राम अमोनियम नायट्रेट प्रथम प्रती लिटर पाण्यात मिसळून झ्डांना दिले जाते . 

पाणी देणे :- 

हरितगृहातील गुलाबातील  ठिबक संचातून पाणी दिले जाते . त्यामुळे रोपांना हवे तेवढेच पाणी देता येते . लागणारे पाणी हे तापमान , आर्द्रता व सूर्यप्रकाश यावर अवलंबून असते . 

उष्ण व कोरड्या हवामानाच्या काळात हवेत आर्द्रता  वाढवून तापमान कमी करता येते . त्यासाठी मिस्टरस व फोगर्स  वापर करून हवेत पाणी उडविले जाते व त्यामुळे तापमान कमी होते . 

फुलांची काळजी :- 

फुलांची काळजी शक्यतो सकाळच्या वेळी थंड वातावणात करावी म्हणजे फुले जास्त काळ फिल्ड हिट कमी करण्यासाठी शीतगृहात ठेवावी लागत नाहीत टो खर्च वाचतो . फुलांची काढणी धारदार कात्रीने करावी . झाडावर  १ ते २ पूर्ण  वाढ झालेली ( पाच पाने असणारी ) पाने ठेवावीत म्हणजे नंतर येणारी फुलेही चांगल्या व लांब दांड्याची राहतील ,जर पूर्ण वाढ झालेली पाने झाडावर ठेवली नाही तर मात्र फुल्दान्द्यांची लांबी कमी राहते . 

फुलाची काढणीत्तोर काळजी :- 

फुले  काढल्यानंतर पांढरा मिनिटात ग्रेडिंग हॉलमध्ये न्यावीत . प्रीझारवेतीव्ह म्हणून पाण्याअल्युमिनिंअम सल्फेट टाकावे . या द्रावणात ३ तास फुले ठेवावीत व पाकिंग हॉलचे तापमान १० सेमी च्या आसपास ठेवावे . नंतर प्रतवारी करावी व प्रतवारी नंतर फुले पुन्हा याच द्रावणात किंवा क्लोरीनच्या पाण्यात ठेवावीत . बादलीत ७ -१० सेमी पर्यंत द्रावण असावे . या द्रावणात फुले पाकिंग करेपर्यंत ठेवावीत . जर वरील प्रीझारवेतीव्ह उपलब्ध नसतील तर २०० लिटर पाण्यात ३ किलो साखर व ६ ग्राम सायट्रीट असिड मिसळून द्रावण तयार करावे व त्यामध्ये फुले ठेवावीत . 

प्रतवारी :- 
गुलाबाच्या फुलांची प्रतवारी फुलदांड्याच्या लांबीवरून फुलाची लांबी वगळून केली जाते . प्रत्येक ग्रेडमध्ये १० सेमी अंतर ठेवावे फुलांची ग्रेड ३० ते ९० सेमी ग्रेडमध्ये केली जाते . फुलदांड्याच्या लांबीबरोबरच दांड्याची जाडी , फुलाचा आकार , पाने व रोग व किताकानाशाकांच्या रेसेड्यूचाही विचार प्रतवारी करताना केला जातो . प्रतवारी केलेल्या एका ग्रेद्मधील सर्व फुले त्याच प्रतीची असावीत . अन्यथा  एखादे  खराब फुल सारीच प्रतवारी बिघडवून टाकते . ग्रेडिंग केल्यावर पुन्हा फुले प्रीझारवेटीव्ह द्रावणात ठेवावीत . 

पॅकिंग :- 

   २० ते २५ फुलाची एक जुडी याप्रमाणे जुड्या बांधाव्यात . त्यानंतर प्रत्येक जुडी याप्रमाणे जुड्या बांधाव्यात . त्यानंतर प्रत्येक जुडी पेपरमध्ये .गुंडाळलेले बंच कोरुगेटेड बॉक्समध्ये गरम हवा लागेलच बाहेर काढता येईल .

शीतगृहातील तापमान २ सेमी ग्रे . पर्यंत असावे बॉक्सचे तापमान शीतगृहाच्या तपमाना इतके होण्यास १० -१२ तास लागतात . शीतगृहात ९० टक्क्यांच्या आसपास आर्द्रता ठेवावी म्हणजे डी -हायड्रेशन होणार नाही .