अस्टर : -

प्रस्तावना :-

   अस्टर हे  हंगामी फुलपीक असून त्यामध्ये पांढऱ्या  , लाल , गुलाबी , जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात . अस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात  मोठमोठ्या शहरांच्या भोवती केली जाते . अस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारामध्ये वापरली जातात . अस्टरची फुले व कट फ्लॉवर म्हणून तसेच विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये वापरली जातात . बागीच्याम्ध्ये रस्त्यालगत तसेच कुन्द्याम्ध्ये अस्टरची लागवड केली जाते . 

हवामान व जमीन :- 
अस्टर हे मुख्यत्वे करून थंड हवामानाचे पिक असून त्याची लागवड वर्षातील तिन्ही हंगामात केली जाते . थंड हवामानात अस्टरची वाढ चांगली होते व फुलांचा दर्जा देखील चांगला असतो . या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो . उन्हाळी हंगामात जास्त तापमान वाढल्यास वाजवीपेक्षा जास्त दांडा निपजतो व फुलांचा दर्जा देखील चांगला नसतो . जास्तीत जास्त दर्जेदार फुले मिळण्यासाठी बियाण्याची रोपासाठी पेरणी सप्टेंबर / ऑक्टोंबर महिन्यात करावी . 

अस्टरची लागवड निरनिराळ्या जमिनीमध्ये करतात . परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास चांगली मानवते . काळी कसदार भारी व पाण्याचा निचरा ण होणाऱ्या जमिनीत रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होते . निकास आणि हलक्या जमिनीत पिकाची वाढ खुंटते . 

जाती :- 
अस्टरच्या पिकाची वर्गवारी हि झाडाची वाढीची सवय , फुलांचा आकार पाकळ्यांची संख्या व पाकळ्यांची ठेवण यानुसार केली जाते . अस्टरच्या वाढीनुसार त्यांचे उंच वाढणार्या (७० ते ९० सेमी ) मध्यम उंचीच्या ( ४० ते ६० सेमी ) व बुटक्या याप्रमाणे प्रकार पडतात . 

अ )बँगलोर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था ( आय . आय . एच . आर ) यांनी विकसित केलेल्या जाती :- १ ० कामिनी २ ) पौर्णिमा ३ ० शशांक ४ ) व्हायलेट  कुशन 

ब ) प्रादेशिक  फळसंशोधन केंद्र , गणेशखिंड यांनी विकसित केलेल्या जाती :- १ ) फुले गणेश पिंक २ ) फुले गणेश व्हाईट 

क ) परदेशी जाती :- १ ) ड्वाफक्वीन २ ) पिन चिओ ३ ) अमेरिकन ब्युटी ४ ) स्तर डस्ट ५ ) जायंत ऑफ कॅलिफोर्निया ६ ) सुपर प्रिन्सेस 

लागवड :- 
अस्टरया पिकाची बियाद्वारे करण्यात येते . बियाण्याची पेरणी केल्यानंतर येते . बियाण्याची पेरणी केल्यानंतर ७ ते ८ दिवसात  बियाण्याची उगवण सुरु होते . बियाण्याच्या उत्कृष उगवणीसाठी सुमारे २० ते ३० से . इतक्या तापमानाची आवश्यकता असते . अस्टरच्या बियाण्यास विश्रांती कालावधी नसल्याने बियाणे फुलातून काढल्यानंतर ताबडतोब पेरले तरी उगवते .

लागवडीपूर्व तयारी :- 
लागवडीपूर्वी जमिनीची २ वेळा खोल नांगरट करावी व २ ते ३ वेळा फणणी करावी . धसकटे व हरळीच्या काशा वेचून घेऊन जमीन स्वच्ह करावी . हेक्टरी २० ते २५ मे टन शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे . शेंखताबरोबरच प्रती हेक्टरी ९० कि . नत्र , १२० कि . स्फुरद व ६० कि . पालाश जमिनीत चांगले मिसळून घ्यावे व नंतर ६० सेमी अंतरावर सारी वरंबे तयार करावेत . त्यानंतर सऱ्यांची  नाके तोडून पाणी पुरवठ्याच्या सोयीनुसार वाफे करून घाय्वेत . 

लागवड :- 
महाराष्ट्रात जमिनी चांगल्या मध्यम / भारी असल्यामुळे सरी वरम्ब्यावरच लागवड करावी . अस्टरची लागवड ६० * ३० सेमी किंवा ४५ * ३० सेमी . अंतरावर करतात . सारी वरंबा पद्धतीने लागवड करताना वरंबयाच्या म्द्याभागी लागवड करावी . रोपाची लागवड सायंकाळी ४ वाजेनंतर व भरपूर पाण्यात करावी , म्हणजे रोपांची मर होणार नाही . 

पाणी :- 
अस्टर पिकास करावयाचा पाणीपुरवठा मुख्यत्वे जमिनीचा प्रकार , वातावरण व हंगाम यावर अवलंबून असतो . अस्टर पिकाच्या मूळ्या जास्त नसल्यामुळे लागवड केलेले वरंबे नेहमी वापसा अवस्थेत राहतील याची काळजी घेणे जरुरी आहे . साधारणपणे अस्टर पिकास ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे . अन्यथा फुलांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो . 

पिक संरक्षक :- 
अस्टर या पिकावर मुख्यत्वे मावा , नागअळी , काळी पोखरणारी अळी या किडीचा व मर , मुळ कुजवा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो . वरील किद्ल व रोगापासून अस्टर या पिकाचे संरक्षक करण्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक किटकनाशक / बुरशीनाशक घेऊन त्यात १५ मिली . / १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे व वारा शांत असताना शक्यतो सकाळी १० .०० नंतर फवारणी करावी . 

फुलांची काढणी व उत्पादन :- 

अस्टरची लागवड केल्यानंतर १० ते १२ आठवड्यांनी फुले तोडणीसाठी तयार होतात . अस्टरच्या फुलाची तोडणी दोन प्रकारे केली जाते . एक प्रकार म्हणजे पूजेसाठी किंवा सजावटीसाठी पूर्ण उमललेली फुले तोडली जातात व दुसरा प्रकार म्हणजे काही प्रमाणात फुले उमलल्यानंतर पर्ण झाडच वर छाटले जाते . 

फक्त फुलांची तोडणी  करावयास झाल्यास सकाळी लवकर तोडणी करावी व पूर्ण झाड फुलदंड्यासाठी वापरायचे असल्यास सायंकाळी झाड छाटून ताबडतोब स्वच्ह पाण्यामध्ये ठेवावे . 

अस्टरची लागवड करताना शिफारशीनुसार सर्व लागवड पद्धतीची अंमलबजावणी केल्यास १२ ते १५ मी . टन प्रती हेक्टर याप्रमाणे उत्पादन मिळते . 

हे लक्षात ठेवा :- 
रोपे तयार करताना पाण्याचा निचरा होणाऱ्या जागीच गादी वाफ्यावर रोपे तयार करा व सुदृढ रोपेच लागवडीसाठी निवडा . 

पाण्याचा निचरा ण होणारी जमीन अस्टर लागवडीसाठी निवडू नका . 

कळी  लागल्यापासून फुले येईपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नका .