मटकी :- 

हलकी व मध्यम माल्रणाची , पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते . पाणथळ , चोपण , क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी . 

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट  करावी . 

हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोष्ट खत द्यावे मृगाचा पाउस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या घ्याव्यात . 

हेक्टरी बियाणे प्रमाण : १२ ते १५ किलो . 

पेरणी अंतर : दोन ओळीत ३० सेमी व दोन रोपात १० सेमी ठेवावे . 

बीजप्रक्रिया २ ग्राम थायरम + २ ग्राम कार्बेन्डेझिम जीवाणू संवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे . 

१२ - १५ किलो नत्र आणि २५ - ३० किलो स्फुरद याप्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी . म्हणजेच ७५ किलो डीएपी प्रती हेक्टर प्रमाणे पेरणी करताना खत द्यावे .

पिक २० -२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी .

पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पिक तणविरहित  ठेवावे .