चवळी :- 

मध्यम ते भारी , पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते , पाणथळ , चोपण , क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी . 

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी . 

हेक्टरी ५ टन शेणखत / कॅम्पोष्ट खत द्यावे मृगाचा पाउस झाल्यावर कुळवाच्या  दोन पाळ्या घ्याव्यात . 

जूनच्या दुसर्या पंधरवड्यात पेरणी योग्य पाउस होताच वाफसा आल्यावर पेरणी करावी . 

हेक्टरी बियाने प्रमाण : १५ ते २० किलो . 

पेरणी अंतर : दोन ओळीत ४५ सेमी . व दोन रोपात १० सेमी . ठेवावे . 

बीजप्रक्रिया - १ किलो बियाण्यास २ ग्राम थायरम + २ ग्राम कार्बोन्डेझिम चोळावे . यानंतर २५० ग्राम रायझोबियम जीवाणू संवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे . 

चवळी : २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्र घ्यावी म्हणजेच १२५ किलो डीएपी प्रती हेक्टर प्रमाणे पेरणी करताना कहत द्यावे . 

पिक : २० -२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसाचे  असताना दुसरी कोळपणी करावी . 

पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पिक ताणविरहित ठेवावे .