कुळीथ :- 

हलकी व मध्यम माळरानाची , पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते . पाणथळ , चोपण , क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी . 

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट  करावी . 

हेक्टरी ५ टन शेणखत कंपोष्ट खत द्यावे मृगाचा पाउस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात . 

हेक्टरी अंतर : दोन ओळीत ३० सेमी व दोन रोपात १० सेमी ठेवावे . 

बीजप्रक्रिया -१ किलो बियाण्यास २ ग्राम थायरम + २ ग्राम  कार्बेन्डेझिम चोळावे यानंतर २५० ग्राम रायझोबियम जीवाणू संवर्धन १० ट १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे . 

१२ ते १५ किलो नत्र आणि २५ -३० किलो स्फुरद याप्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी . म्हणजेच ७५ किलो डीएपी प्रती हेक्टर प्रमाणे पेरणी करताना खत द्यावे . 

पिक २० - २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी . 

पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पिक तणविरहित ठेवावे .