प्रस्तावना :- 

खरीप  हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मुग आणि उडीद हि महत्वाची पिके गणली जाजत . उडीद हि ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याश्या पावसाचा देखील लाभ उठवू शकतात . दुबार तसेच मिश्र पिक पद्धतीसाठी हि दोन्ही पिके अतिशय महत्वाची आहेत . 

जमीन :- 
मुग आणि उडीदाला मध्यम,म ते भारी , चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते . पाणी साचून राहणारी क्षारपड , चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी . 

पूर्वमशागत :- 
उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी . टी चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरु होतातच कुळवाच्या पाळ्या मारून सपाट करावी . धसकटेवेचून घ्यावीत . याच वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे . 

पेरणीचा कालावधी :- 

पिकांची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यादरम्यान करावी पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येते . 

मुगाच्या सुधारित जाती :- 
१ - कोपरगाव :- 
कालावधी ६५ ते ७० दिवस , मर व करपा , पिवळा केवडा रोग प्रतिकारक्षम , उत्पादन ३ - १० क्विंटल / हे 

२ बीएम ४ :- 
कालावधी ६५ ते ६७ दिवस , करपा व भुरी रोगास प्रतिकारक , मध्य भारतासाठी शिफारस , उत्पादन ३ ते ११ क्विंटल / हे 

३ - बीपीएमआर १४५ :-

कालावधी ६० ते ६५ दिवस , भुरी , करपा व पिवळा केवडा रोगास प्रतिकारक , उत्पादन ७ ते ८ क्विंटल / हे 

४ - बीएम २००२ - १ :- 
कालावधी ६५ ते ७० दिवस , भुरी रोगास प्रतिकारक , उत्पादनात ६ ते ९ क्विंटल /हे , सर्वात जास्त प्रथिने ( २३ : ९० टक्के ) 

५  - बीएम २००३ - २ :- 

कालावधी ६५ ते ७० दिवस , उत्पादनात ८ ते १० क्विंटल / हे , शेंगा लांब असून मोठ्या आकाराचे , चमकदार दाने .

६ - पी के व्ही एफे एम - ४ :- 
कालावधी ७० - ७५ दिवस , उत्पादन १० ते ११ क्विंटल / हे 

७ - पी के व्ही . ग्रीन गोल्ड :- 
कालावधी ७० -७५ दिवस , उत्पादन १० ते ११ क्विंटल एकाच वेळी पक्वता येणारा वान 

८ - वैभव :- 
कालावधी ७० ते ७५ दिवस , भुरी रोगास प्रतिकारक , टपोरे हिरवे दाने , उत्पादन १४ - १५ क्विंटल / हे 

बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया :- 
हेक्टरी १० ते १५ किलो बियाणे पुरेसे आहे पेरणीपूर्वी बियाण्यास प्रती किलो बाविस्टीन १ ग्राम किंवा थायरम २ ग्राम चोळावे . तसेच ट्रायकोर्दमा ४ ग्राम किलो बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून पिकाचे नुकसान होत नाही . त्याचबरोबर १० किलो बियाण्यास जीवाणू संवर्धक रायझोबियम व पीएसबी प्रती २५० ग्राम लावून पेरणी करावी . 

पेरणीचे अंतर :- 
- ४५ * १० सेमी 

खतांची मात्रा ;- 
जमिनीची मशागत करताना जमिनीत शेणखत व्यवस्थित पसरावे . पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद प्रती हेक्टरी द्यावे . 

आंतरमशागत ;- 
पेरानिनंतर सुरुवातीच्या एक महिन्यात तण नियंत्रणासाठी एक खुरपणी व दोन कोळपण्या कराव्यात . 

आंतरपीक पद्धतीचा वापर - या पिकांच्या कालावधीमुळे हि दोन्ही पिके तूर , ज्वारी , कपाशित आंतरपीक म्हणून घेता येतात . 

रोग - कीड नियंत्रण :- 
भुरी :- 

मुग पिकावर विशेतः भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो . भुरी रोग फुलांच्या पूर्वी अथवा पिक फुलोऱ्यात असताना आल्यास जास्त प्रमाणात होते. नियंत्रणासाठी सल्फेक्स ०.३० % किंवा २० - २२ ग्राम पाण्यात विरघळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे . तसेच ३० पोटाची गंधकाची भुकटी २० किलो हेक्टरी धुरळावी करावी . 

शेंगा पोखरणारी अळी  -
या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी किनोलफोस ३५ ईसी ०.०७ % , २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून  कीटकनाशकाची फवारणी करावी . 

पिक काढणी :- 
पिकांच्या बहुतांश शेंगा पक्व झाल्यास पावसाचा अंदाज पाहून काढणी त्वरित करून तोडणी केलेल्या शेंगा व्यवस्थित पसराव्यात . तोडणी केलेल्या शेंगा उन्हात वळवून काठीने बडवून किंवा ट्राकटरने मळणी करून खेळत्या हवेच्या वातावरणात  साठवाव्यात उत्पादन १० - १२ क्विंटल / हेक्टर