प्रस्तावना :- 

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मुग आणि उडीद हि महत्वाची पिके गणली जातात .  उडीद हि ७० ते ७५ दिवसात येणारी  पिके असल्यामुळे थोडाश्या पावसाचा देखील लाभ उठवू शकतात . दुबार तसेच मिश्र पिक पद्धतीसाठी हि दोन्ही पिके अतिशय महत्वाची आहेत . 

जमीन :- 

मुग आणि उडीदाला मध्यम ते भारी , चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते . पाणी साचून राहणारी क्षारपड , चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी . 

पूर्वमशागत :- 

उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी . टी चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरु होताच कुळवाच्या पाळ्या मारून सपाट करावी . धसकटे वेचून घ्यावीत . याच वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे . 

सुधारित वान :- 
मुगाच्या सुधारित जाती १ - कोपरगाव 

कालावधी ६५ ते ७० दिवस , मर व करपा पिवळा केवडा रोग प्रतिकारक्षम ,उत्पादन ३ - १० क्विंटल / हे 

२ - बीएम  ४ 

कालावधी ६५ ते ६७ दिवस , करपा व भुरी रोगास प्रतिकारक , मध्य भारतासाठी शिफारस , उत्पादन ३ ते ११ क्विंटल / हे 

३ - बिपीएमआर १४५ 

कालावधी ६० ते ६५ दिवस , भुरी , करपा व पिवळा केवडा रोगास प्रतिकारक , उत्पादन ७ ते ८ क्विंटल /हे 

४ - बीएम २००२ - १ 

कालावधी ६५ - ७० दिवस , भुरी रोगास प्रतिकारक उत्पादन ७ ते ९ क्विंटल / हे , सर्वात जास्त प्रथिने ( २३ : ९० टक्के ) 

५ - बीएम २००३ - २ 

कालावधी ६५ ते ७० दिवस , उत्पादन ८ ते १० क्विंटल / हे , शेंगा लांब असून मोठ्या आकाराचे , चमकदार दाने 

६ - पी के व्ही एफे ए म - ४ 

कालावधी ७० - ७५ दिवस , उत्पादन १० ते ११ क्विंटल / हे 

७ - पी . के . व्ही . ग्रीन गोल्ड 

कालावधी ७० - ७५ दिवस , उत्पादन १० ते ११ क्विंटल / हे  एकाच वेळी पक्वता येणारा वान 

८ - वैभव 

कालावधी ७० ते ७५ दिवस , भुरी रोगास प्रतिकारक , टपोरे हिरवे दाणे , उत्पादन १४ - १५ क्विंटल / हे 

पेरणीचा कालावधी :- 

पिकांची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यादरम्यान करावी पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येते . 

बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया :- 

हेक्टरी १० ते १५ किलो बियाणे पुरसे आहे पेरणीपूर्वी बियाण्यास प्रती किलो बाविस्टीन १ ग्राम किंवा थायरम २ ग्राम चोळावे . तसेच ट्रायकोडर्मा  ४ ग्राम किलो बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून पिकाचे नुकसान होत नाही . त्याचबरोबर १० किलो बियाण्यास जीवाणू संवर्धक रायझोबियम व पीएसबी प्रती २५० ग्राम लावून पेरणी करावी . 

पेरणीचे अंतर - ४५ * १० सेमी 

खतांची मात्रा - जमिनीची मशागत करताना जमिनीत शेणखत व्यवस्थित पसरावे . पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद प्रती हेक्टरी द्यावे . 

आंतरमशागत - पेरणीनंतर सुरुवातीच्या एक महिन्यात तण नियंत्रणासाठी एक खुरपणी व दोन कोळपण्या कराव्यात . 

आतार्पिक पद्धतीचा वापर - या  पिकांच्या कालावधीमुळे हि दोन्ही पिके तूर , ज्वारी , कापाशित आंतरपीक म्हणून घेता येतात . 

रोग - कीड  नियंत्रण :- 
भुरी :- 

मुग पिकावर विशेषतः भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो . भुरी रोग फुलांच्या पूर्वी अथवा पिक फुलोऱ्यात असताना आल्यास जास्त प्रमाणात होते . नियंत्रणासाठी सल्फेक्स ०.३० % किंवा २० - २२ ग्राम पाण्यात विरघळनारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे . तसेच ३० पोटाची गंधकाची भुकटी २० किलो हेक्टरी धुरळावी करावी . शेंगा पोखरणारी अळी - या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी किनोलफोस ३५ ईसी ०.०७ % , २०  मिली १० लिटर पाण्यात मिसळून  कीटकनाशकाची फवारणी करावी . पिक  काढणी - पिकांच्या बहुतांश शेंगा पक्व झाल्यास पावसाचा अंदाज पाहून काढणी त्वरित करून तोडणी केलेल्या शेंगा व्यवस्थित पसराव्यात . तोडणी केलेल्या शेंगा व्यवस्थित पसराव्यात केलेल्या शेंगा उन्हात वळवून काठीने बडवून किंवा  ट्राकटरने मळणी करून खेळत्या हवेच्या वातावरणात साठवाव्यात उत्पादन १० - १२ क्विंटल / हेक्टर