प्रस्तावना :- 

वाटाणा हे थंड हवामानातील पिक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते . वाटाण्याच्या उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो . वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात . वाटाण्याचे दाणे हवाबंद करून . गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात . हिरवे ओले वाटाणे वळवून त्यापासून डाळ बनविता येते . वाळविलेल्या अख्या  वाटण्याचे उपयोग भाजीसाठी करता येतो . वाटण्यामध्ये कार्बो प्रोटीन तसेच फोस्फारस , पोटाशींअम , माग्नेशिंअम हि खनिजे आणि अ ब , व , क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात . 

हवामान व जमीन :- 
वाटाणा हे थंड हवामान वाढणारे पिक आहे . सरासरी तापमान १० ते १८ सेल्सिअस असल्यास पिकाची वाढ चांगली घेता येत असले तरी हलक्या जमिनीत पिक लवकर तयार होते . तर मध्यम भारी पण भुसभुशीत , कसदार , रेतीमिश्रीत आणि ५.५ ते ६.७ सामू असलेली जमिन्जामीन  निवडावी .

पूर्वमशागत :- 

वाटाणा हे चांगले उत्पादणशील असल्यामुळे त्याची पूर्वमशागत योग्य रीतीने करून जमीन चांगली भुसभुशीत करावी . त्यामुळे मुळ्या चांगल्या वाढतात आणि भरपूर अन्नद्रव्ये शोषून घेऊन झाडाची वाढ व्यवस्थित करण्यास हातभार लावतात . त्यासाठी उभी आडवी नांगरट करून २ - ३  कुळवाच्या  पाळ्या द्याव्यात . ढेकळे व्यवस्थित फोडावीत व जमीन सपाट करावी .  पेरणीपूर्व पाणी देणे आवश्यक  समजावे व वापसा आल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगली भोते . 

लागवडीचा हंगाम :- 

महाराष्ट्रात हे पिक खरीप हंगामात जून जुलाई मध्ये तसेच हे पिक थंड हवामानात येणारे असल्यामुळे याची लागवड ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस करणे हितावह ठरते . 

बियाणे :- 
लागवडीसाठी पाभरीने पेरण्यास हेक्टरी ५० ते ७५ किलो लागते . पण जर टोकन पद्धतीने लागवड केली तर  हेक्टरी २० -२५ किलो बियाणे पुरेसे होते . पेरणीपूर्वी बियाण्यास प्रतिकिलो ३ ग्राम थायरमची बीज प्रक्रिया करावी . त्यामुळे मूळ  कुजव्या  टाळता येईल . त्याच प्रमाणे अनुजीवी खताचीही प्रक्रिया बियाण्यास आवश्यक आहे . रायझोबियम कल्चर  चोचाल्यामुळे उत्पादनात हमखास वाढ झालेली दिसून आलेली आहे . 

प्रकार व जाती :- 

लागवडीसाठी वाटाण्याचे दोन प्रकार आहेत . 

बागायती किंवा भाजीचा वाटाणा ( गार्डन पी ) जिरायती किंवा कडधान्याचा वाटाणा ( फिल्ड पी ) बागायती वाटाण्याचे दोन गट पडतात . 

गोल गुळगुळीत बिया असलेले - या जातीचा वाटणा सुकवीन्यासाठी करतात . सुरकुतलेल्या बियांचे प्रकार - या जातीचा वाटण्यात  साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे वाटणे गोड लागतात आणि पिठूळपना कमी असतो . या गटातील जाती हिरवे दाने डबाबंद करून विकण्यासाठी , गोथाव्ण्यासाठी किंवा हिरव्या शेंगासाठी वापरतात . वाटाणे गोड  लागतात आणि पीथूळपणा कमी असतो . या गटातील जाती हिरवे दाने डबाबंद करून विकण्यासाठी , गोथावाण्यासाठी किंवा हिरव्या शेंगासाठी वापरतात .

सुधारित वान ;- 

लवकर येणाऱ्या जाती - अर्ली बगर , अर्केल , असौजी , मितीओर 

मध्यम कालावधीत येणाऱ्या जाती - बोन्व्हीला , परफेशन न्यू लाईन 

उशिराया येणार्या जाती - एण . पी  - २९ , थोमस लॅक्सटण 

लागवड व खते :- 

लागवड एक तर सपाट वाफ्यात करतात . किंवा सारी व वरंब्यावर करता येते . त्यासाठी ६० सेमी अंतरावर सरी वरंबे करून सार्यांच्या दोन्ही अंगास बिया टोकून लागवड करावी . दोन रोपातील अंतर ५ ते ७.५ सेमी ठेवण्याची शिफारस केली आहे ण. एका ठिकाणी किमान दोन बिया तोकाव्यात . काही भागात परभारीने बी पेरून मग वाफे बांधले जातात . 

वाटाणा पिकास जमिनीचा मगदूर पाहूनच खताची शिफारस केली जाते . त्यासाठी हेक्टरी १५ ते २० टन शेणखत , २० ते ३० किलो नत्र , तर ५० ते ६० किलो स्फुरद आणि ५० ते ६० किलो पालाश देणे  जरुरीचे आहे . जमिनीची मशागत करीत असताना संपूर्ण शेणखत जमिनीत पसरून ते चांगले मिसळणे जरुरिच असते . त्याचप्रमाणे संपूर्ण पालाश आणि स्फ़ुरद  व अर्धे नत्र , बी पेरण्याचे अगोदर जमिनीत पेरावे किंवा मिसळावे . त्यातून राहिलेले नत्र ज्यावेळी पिक फुलावर येईल त्यावेळी द्यावे . 

पाणीपुरवठा :- 

खतांबरोबर पाण्याचेही व्यवस्थापन हि व्यवस्थित राखणे फार महत्वाचे आहे . बी पेरल्याबरोबर लगेच पाणी द्यावे 

कीड व रोग :- 
कीड 

वाटाणा पिकावर मावा , शेंगा पोखरणारी अळी या किडींचा तर भुरी , मर रोग या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो . 

मावा : हि कीड हिरव्या रंगाची अत्यंत लागण असते . ते पानातून रस शोषून घेतात . त्यामुळे झाडे निस्तेज बनतात .

शेंगा पोखरणारी अळी : हिरव्या रंगाची हि अळी प्रथम शेंगाची साल खाते व आत शिरते आणि दाणे पोखरून खाते . 

उपाय : यासाठी मॅलॅथीओन ५० ईसी , ५०० मिली किंवा फोस्फोमीडॉन ५० ईसी , ५०० मिली किंवा फोस्फोमीडॉन ८५ डब्ब्ल्यू ईसी , १०० मिली किंवा डायमेथोन ३० ईसी , ५०० मिली किंवा मिथिलडेमीटॉन  २५ ईसी , ४०० मिली , ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे . पेरानिनान्त्र ३ आठवड्यानी पहिली फवारणी करावी . 

रोग :- 

भुरी रोग - या रोगामुळे पिकाचे अतोनात नुकसान होते . या रोगात  प्रथम पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढरी  पावडरीसारखी बुरशी दिसून येते टी रोपाच्या सर्व हिरव्या भागावर जलद पसरते व झाडाची उत्पादन क्षमता त्यामुळे खालावते . 

उपाय : यासाठी माफोलीन २५० मिली किंवा पाण्यात मिसळणारे  गंधक ८० टक्के १२५० ग्राम किंवा डीनोकॅप ४० डब्ब्ल्यू  पी ५०० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे . किंवा गंधकाची भुकटी ३०० मेष प्रती हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी करावी . रोगास प्रतिबंधक अशा जातींचा करावा . 

मर रोग : या रोगाचा प्रसार जमिनीतील बुरशीमुळे होतो . रोगग्रस्त झाड पिवळे पडून वाळते . 

उपाय म्हणून पेरणीपूर्वी बियास थायरम हे बुरशीनाशक औषध प्रती किलोस ३ ग्राम या प्रमाणात चोळावे . 

काढणी व उत्पादन :-
लवकर येणार्या जातीचे हिरव्या शेंगाचे हेक्टरी उत्पादन २५ - ३७ क्विंटल तर मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन ६५ - ७५ क्विंटल आणि उशिरा येते . शेंगातील दाण्याचे प्रमाण ४० ते ४५ टक्के असते . 

भरघोस उत्पादनानंतर साठवणूक हा सुद्धा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे . नेहमीच्या तापमानात शेंगा जास्त दिवस साठवून ठेवता येत नाहित पण ० डिग्री से . ग्रे . तापमान व ८५ ते ९० टक्के आद्रता असल्यास हिरव्या शेंगा दोन आठवड्यापर्यंत साठवून ठेवता येतात .