प्रस्तावना :-
कोरडवाहू क्षेत्रामध्ये हरभरा हे रबी हंगामातील महत्वाचे पिक आहे . महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिकांपैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रमुख कडधान्य पिकांपैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरभरा या पिकाखाली ३.०१ लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन २.५१ लाख टन होते . हे राज्याच्या या पिकाखाली क्षेत्र च्या सुमारे २७ टक्के इतके आहे .
जमीन :-
पिकासाठी मध्यम ते काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी , हलक्या अथवा भरद , पाणथळ , चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभर्यासाठी निवडू नये . जमिनीचा सामू ५.५ ते ८.६ असावा .
पूर्वमशागत :-
खरीपाचे पिक निघाल्यानंतर खोल द्याव्यात . काडीकचरा वेचून जमीन स्वच्ह करावी खरिपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे . या प्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे .
सुधारित वान :-
१ - विजय
१०५ ते ११० दिवस
जिरायत : १४ - १५ बागायत : ३५ - ४० उशिरा
पर : १६ - १८
अधिक उत्पादनक्षम , मररोग प्रतिकारक , जिरायत , बागायत तसेच उशिरा प्रतिकारक , जिरायत , बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य अवर्षण प्रतीकारक्षम प्रसारित
२ - विशाल
११० - ११५ जिरायत : १४ - १५ बागायत : ३० - ३५
आकर्षक पिवळे टपोरे दाणे , अधिक उत्पादनक्षमता , मररोग प्रतिकारक , अधिक बाजारभाव , महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
३ - दिग्विजय :-
१०५ -११०
जिरायत : १४ - १५ बागायत : ३५ - ४० उशिरा
पर : २० - २२
पिवळसर तांबूस , टपोरे ब्दाने , मररोग प्रतिकारक , जिरायत बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य , महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
४ - विराट :-
११० - ११५
जिरायत : १० - १२ बागायत : ३० - ३२
काकली वान , अधिक टपोरे दाणे , मररोग प्रतिकारक , महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
५ - कृपा :-
१०५ - ११०
सरासरी उत्पन्न बागायत : १६ - १८ जिरायत : ३० - ३२
जास्त टपोरे दाणे असलेला काबुली वान , दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे , सर्वाधिक बाजारभाव , महाराष्ट्र , मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांकरिता प्रसारित ( १०० दाण्यांचे वजन ५९ . ४ ग्राम )
६ - साकी ९५१६ :-
१०५ - ११०
सरासरी उत्पन्न १८ - २०
मररोग प्रतिकारक्षम , बागायत क्षेत्रासाठी योग्य
७ - पिकेव्ही :-
१०० - १०५
सरासरी उत्पन्न १२ - १५
अधिक टपोरे दाणे , अधिक बाजारभाव , मररोग प्रतिकारक्षम
८ - पिकेव्ही ४ :-
१०० - ११०
सरासरी उत्पन्न १२ - १५
अधिक टपोरे दाणे , अधिक बाजारभाव , मररोग प्रतिकारक्षम
पेरणीची वेळ :-
हरभरा हे रबी हंगामाचे पिक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते . कोरडवाहू क्षेत्रामध्ये २५ सप्टेंबरनंतर जमिनीची ओळ उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी . यासाठी प्रामुख्याने विजय हा वान वापरावा . बागायती हरभरा २० ऑक्टोंबर ते १० ऑक्टोंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते .
पेरणीची पद्धत आणि बियाणाचे प्रमाण
सामान्यतः देशी हरभर्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करावी . पेरणी अंतर ३० * १० सेमी ठेवावे .
लहान दाण्याच्या वानाकरिता ( उदा . फुले जी - १२ ) - ६० ते ६५ किलो / हे .,
मध्यम दाण्याच्या वाना करीता ( विजय ) - ६५ ते ७० किलो / हे .
टपोऱ्या दाण्याच्या वानाक्रिता ( विश्वास , दिग्विजय , विराट ) - १०० किलो / हे
हरभरा सरी वरम्ब्यावरही चांगला येतो . भारी जमिनीत ९० सेमी रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सेमी अंतरावर १ ते २ दाणे टोकावे .
बीजप्रक्रिया :-
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ग्राम थायरम + २ ग्राम बाविस्टीन किंवा ५ ग्राम रायझोबियम आणि पी . एस .बी गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे .
खतमात्रा :-
हभरयाला हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरदाची आवश्यकता असते . घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये २ टक्के युरियाची फवारणी करावी .
आंतरमशागत :-
पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून टन विरहित ठेवावे . पिक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी . कोळपणीनंतर एक खुरपणी करावी . उगवणीपूर्वी तणनाशकाचा वापर करायचा असल्यास पेंडीमिथीलीन ५ लिटर ( स्टोम ३० इ . सी ) किंवा अँलाक्लोर ( लासो ५० इ . सी ) ३ लिटर एक हेक्टर क्षेत्राकरिता ५०० लिटर पाण्यामध्ये मिसळून अंकुर जमिनीच्या पृष्ठभागावर येण्याआधी फवारावे .
पाणी व्यवस्थापन :-
हरभरा पिक पाण्यास अतिशय संवेदनशील असे पिक आहे . हरभरा पिकला साधारणपणे २५ सेमी पाणी ६५ - ७० दिवसांनी द्यावे . जमिनीच्या मगदुरानुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे .
पिक संरक्षक :-
हरभरा पिकाचे घाटेअळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते . पिक ३ आठवड्याचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात . पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले असतात . यावेळी लीम्बोलीच्या ५ टक्के द्रावणाची एक फवारणी घ्यावी . त्यामुळे अळीची भूक मंदावते . आणि त्या मरतात . पुढे १० ते १५ दिवसांनी हेलीओकील ५०० मिली प्रती हेक्टर या विशानुजन्य कीटकनाशकाची व्फावारणी करावी . या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते . त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्राम ज्वारी , १०० ग्राम मोहरी आणि २ किलो धने शेतामध्ये पेरावे . या पिकांच्या मित्रकिडीच्या आकर्षणासाठी उपयोग होतो त्यामुळे घाटे अळीचे नियंत्रण होते . पक्षांना बसायला जागोजागी तुरात्याची मचाणे लावावीत त्यावर कोळसा , चिमण्या , साळुंक्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात . हेक्टरी ५ फोरोमाचे सापळे लावावेत .
काढणी :-
१०० ते ११० दिवसांमध्ये पिक चांगले तयार होते . पिक ओलसर असताना काढणी करू नये . घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभरयाची काढणी करून मळणी करावी . यानंतर धान्यास ५ -६ दिवस कडक उन द्यावे . हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा . त्यामध्ये कडूलिंबाचा पाला ( ५ टक्के ) घालावा . त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही .
उत्पादन :-
अशाप्रकारे हरभऱ्याची शेती केल्यास सरासरी २५ ते ३० क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळू शकते .