तीळ :-
महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात या पिकाखाली ५२६०० हेक्टर क्षेत्र होते त्यापासून १८९०० टन इतके उत्पादन मिळाले व उत्पादकता ३६० किलो प्रती हेक्टरी होती . रब्बी हंगामात हे पिक २९०० हेक्टर क्षेत्रावर होते व त्यापासून ८०० टन उत्पादन मिळाले . तर २८५ किलो / हेक्टर इतकी उत्पादकता होती . तीळ हे पिक ८५ - ९० दिवसात ( कमी कालावधीत ) येत असल्यामुळे दुबार पिक पद्धतीसाठी योग्य आहे .
जमीन :-
तीळ या पिकास मध्यम ते भारी , पाण्याच्या चांगला निचरा असलेली जमीन निवडावी .
पूर्व मशागत :-
एक नांगरणी करून २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी . त्यानंतर मैद फिरवून जमीन सपाट करावी व दाबून घ्यावी . यामुळे पेरणी चांगली होऊन उगवन्सुद्धा चांगली होते .
पांढरा टपोरा दाना , मध्यम कालावधीत अधिक उत्पादनक्षम , तेलाचे प्रमाण जास्त ,हमखास पाउस पडणाऱ्या खानदेश व लगतच्या विदर्भ , मराठवाडा विभागातील क्षेत्राकरिता खरीप हंगामासाठी लागवडीसाठी य्प्ग्या .
बीजप्रक्रिया :-
बियाण्यापासून व जमिनीमधून उद्भवनारे बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून पॅरॉलॉजी किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास चोळावे त्यानंतर २५ ग्राम अॅझोटोबाक्टोर प्रती किलो बियाणे या प्रमाणात लावावे .
पेरणीची वेळ :-
मान्सूनचा पाउस झाल्यावर आणि योग्य वाफसा आल्यावर जूनच्या दुसर्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत .
पेरणीचे अंतर :-
४५ *१० सेमी किंवा ३० * १५ सेमी अंतरावर अनुक्रमे ४५ सेमी अंतराच्या पाभरीने पेरणी करावी . पाभरीने पेरणी बियाण्यास बियांना एवढेच बारीक वाळू अथवा चाळूण घेतलेले शेणखत मिसळावे . त्यामुळे बियाण्याचे वितरण प्रमाणशीर होते . पेरणी २.५ सेमी पेक्षा जास्त खोलीवर करू नये .
बियाणे :-
पेरणीसाठी हेक्टरी २.५ ते ३ किलो (एकरी १ किलो ) बियाणे वापरावे .
चर काढणे :-
भारी जमिनीत १२ ओळीनंतर लगेच ( बी झाकन्यापुर्वी ) दोन ओळींच्या मध्ये ( फटीत ) बळीराम नांगराचे सहाय्याने चर काढावेत . यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरेल . तसेच अतिरिक्त पाणी बाहेर निघून जाण्यास मदत होईल . मुरलेल्या पाण्याचा पावसाच्या ताणाचे वेळी पिकास फायदा होतो .
विशेष बाब :-
अधिक उत्पादनासाठी २ टक्के युरियाची फवारणी पिक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असताना करावी .
विरळणी :-
पेर्निनान्त्र तीन आठवड्यांच्या आत विरळणी करावी . ३० सेमी अंतराच्या पाभरीने पेरणी केली असल्यास दोन रोपातील अंतर १५ सेमी किंवा ४५ सेमी अंतराच्या पाभरीने पेरणी केली असल्यास दोन रोपातील अंतर १० सेमी राहील अशा बे४तने विरळणी करावी जेनेकरून रोपांची संख्या हेक्टरी २.२२ लाख राहील .
खते :-
पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रती हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे किंवा हेक्टरी एक टन ( एकरी ४ क्विंटल ) एरंडी किंवा निंबोळी पेंड पेरणी बरोबर द्यावी . अधिक २५ किलो नत्र प्रती हेक्टर पेरणीच्या वेळी व २५ किलो नत्र प्रती हेक्टरी पेरणीच्या तीन आठवड्यानी पेरून द्यावे . सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास पेरणीच्या वेळी २० किलो गंधक प्रती हेक्टरी द्यावे .
आंतरमशागत :-
रोपअवस्थेत पिक हळू वाढत असल्याने तनाबरोबर अन्नद्रव्य व ओलाव्यासाठी स्पर्धा करू शकत नसल्याने पेरणीनंतर ३० दिवसांनी दोन निंदनी व कोळपणी करावी .
पिक संरक्षण :-
पाने गुंडाळणारी अळी /पाने खानारी अळी / तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनोलफॉस २५ टक्के प्रवाही २५० मिली किंवा ५० टक्के कार्बेरील पावडर २ किलो प्रती ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . पानावरील ठिपके ( अल्टरनारीया / सरस्कोस्पोरा ) व अनुजीव करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास मन्कोझेब ७५ टक्के १.२५ किलो अधिक स्ट्रेप्तोसाय्क्लीन ५० ग्राम प्रती ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
काढणी :-
साधारणपणे ७५ टक्के पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पिक काढणीस योग्य झाले असे समजावे . साधारण ८० ते ९५ दिवसात पिक काढणीस येते . काढणी लवकर केल्यास बोंडातील तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी .
उत्पादन :-
पावसाचे वितरण चांगले असल्यास साधारणतः हेक्टरी ६ ते ७ क्विंटल जीरायातीखाली उत्पादन मिळते .