भुईमुग:-
भुईमुग हे तेलबिया पिकामध्ये महत्वाचे पिक असून खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र असून त्यापासून २.५७ लाख तन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ कि./हे एवढी मिळाली . उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रवर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख तन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ कि./हे अशी होती.
जमीन:-
मध्यम भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
पूर्व मशागत :-
एक नांगरत व दोन-तीन कुलवच्या पाळ्या द्याव्यात.
पेरणीची वेळ:-
खरीप-१५ जून ते १५ जुलै
उन्हाळी-१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पेरणीचे वेळी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा
त्यापेक्षा जास्त असावे.
बियाणे:-
भुईमुगाचे वाणनिहन बियाणे प्रती हेकॅत्री खालीलप्रमाणे वापरावे.
१०० किलो:एसबी -११,टीएजी -२४ टीजी-२६,जेएल -५०१,फुले ६०२१,१२० ते १२५ किलो फुले प्रगती,फुले व्यास ,तीपिजी-४१,फुले उनाप ,फुले उन्नती
बीजप्रक्रिया :-
बियाण्यापासून प्रदुभाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षणकरण्यासाठी पेरणीपूर्वी प[राती किलो बियाण्यास ५ ग्राम थायरम किंवा २ ग्रम कार्बन्डेझिम किंवा ३ ग्राम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रम ट्रायाकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे.नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धन चोळावे बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकून पेरावे.
पेरणी नंतर :-
दोन ओळीतील अंतर ३० से.मी व दोन रोपातील अंतर १० से. मी. ठेवावे .उन्हाळी हंगामात जमीन ओलावून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकन पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागून उगवण चांगली होते .
आंतरपिके:-
खरीप भुईमुग पिकात सोयाबीन सुर्यफुल ,तीळ,मुग,,उडीद ,तूर,हि आंतरपिके ६:२ या प्रमाणातभुईमुग अधिक ज्वारी १:१ तर कपाशी १:१ या प्रमाणत घ्यावी.आंतरपिकांमुळेअआधिक आर्थिक होत असल्याने प्रयोगाअंती दिसून आलेले आहे.भुईमुग अधिक सोयाबीन (४:१) आणि कडेने एरंडीची लागवड केल्यास प[पाने खाणारी अळीचे नियंत्रणास मदत होते.सुरु उसात उपट्या भुईमुग वाणाची आंतरपीक म्हणून लागवड करण्यासाठी ९० से.मी.अंतरावर सऱ्या पडून उसाची लागवड केल्यानंतर एक आठवड्याने १० से.मी.अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस उन्हाळी भुईमुगाची लागवड करावी.
खत मात्रा:-
पूर्व मशागतिच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रती हेक्टरी २० गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद द्यावे. खतव्यवस्थापन भुईमुगाच्या आधिक उत्पादनासाठी रासायनिक खतमात्रे सोबत जिप्सम ४०० क्वी/हे जमिनीत मिसळून द्यावे.उन्हाळी भुईमुगासाठी नत्र व स्फुरद बरोबर २५० किलो जिप्सम १.२५ किलो पेरणी वेळी व १२५ किलो आऱ्यासुटण्याच्या द्यावे.
आंतरमशागत :-
पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत.१० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपन्या कराव्यात व २ निंदन्या घ्याव्या .शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करू नये. भुइमुगतिल कार्यक्षम तण व्यावाथापनाकरिता पेरणीनंतर लगेच पेंडीमीथॉलिन१.०० किलो क्रि.हा प्रती हेकॅत्री ५०० लिटर पाण्यातून ओलीवरफवारणी करावी.तसेच पेरनिनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २०-२५ दिवसांनी इमॅझिथायपर १० टक्के एस एल ०.०७५ कि.क्रि.हा/हे.५०० लिटर पाण्यातून द्यावे.
यपर १० टक्के एस एल ०.०७५ कि.क्रि.हा/हे.५०० लिटर पाण्यातून द्यावे.
पाणी संरक्षन :-
फुलकिडे ,तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी १० मिली किंवा ८ मिली ,डीमॅटोन १५ टक्के प्रवाही करावी आणि पाने खाणारी आळी व पाने गुंडाळणारी आळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २० इ.सी ४ मिली किंवा डेकामेथ्रीन २८ इ.सीय१० मिली किंवा किनॉसफॉस २५ इ.सी.२० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे. टिक्का व तंबोरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास २५ ग्रममॅन्कोझेब१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी व उत्पादन:-
पिक तयार झाले म्हणजे पानेपिवळी पडू लागतात .शेंगाचे टरफल टणकबनते व शेंगाच्या तर्फालाची आतील बाजू काळी दिसू लागते.आशा प्रकारे पिक तयर झाल्यावर काढणी वरील तंत्रज्ञानाच वापर केल्यास खरीपात सरासरी १८ ते २० क्विंटल /हेक्टर तर उन्हाळी भुईमुगाचे २५ ते ३० क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळू शकते .