सोयाबीन -जमीन:-

मध्यम काळी पोयट्याची ,चांगली निचरा होणारी .

पूर्वमशागत :-

एक नांगरट,दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

सुधारित वाण:-

जे.एस.३३५,एम.ए.सी.एस.११८८,फुले कल्याणी ,जे .एस.९३०५ ,के.एस.१०३,फुले अग्रणी 

पेरणी व लागवडीचे अंतर :-

पेरणी खर्पात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. पेरणी ४५ *०.५ से.मी.किंवा ३०*१०से .मी.अंतरावर करावी.

बियाणे :-

सलग पेरणीसाठी ७५-८० किलो प्रती हेक्टर तर टोकन पेरणीसाठी ४५-५० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया :-

बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण

करण्यासाठी प्रती किलो बियाण्यास २.५ ग्रम कार्बेन्डेझिम किंवा ५ ग्रम ट्रायाकोडर्मा चोळावे.तसेच नत्र स्थिरिकारणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम २५० ग्राम अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू २५० ग्राम प्रती १०  किलो बियाण्यास चोळावे . 

आंतरपिके :-

सोयाबीन अधिक तूर (३:१) या प्रमाणात घ्यावे.

खत मात्रा:-

भरखते :

चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाड्या वापरावे.

 वरखते :-

सोयाबीन पिकास हेक्टरी ५.० किलो नत्र  आणि ७५ किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.

आंतरमशागत :-

तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीच्या वेळी प्रती हेक्टरी पेंडीमेथॅलीन १.० ते १.५ किलो क्रियाशील घटक ६०० ते ७०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे.पिक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक  कोळपणी व नंतर खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे अथवा पिक उगवनी नंतर २१ दिवसांनी प्रती हेक्टरी इमॉजिथॅपर क्रियाशील घटक ०.१ ते ०.१५ किलो ५०० ते ६०० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणांवर फवारावे.

पाणी व्यवस्थापन :-

पिकालाफांद्या फुटताना ,फुलोऱ्यातअसतांना पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पिक संरक्षण:-

महाराष्ट्रात सोयाबीन पिकास पाने खाणाऱ्याअळ्या,खोड माशी या किडींचा व तंबोरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.खोडमाशीच्या प्रादुर्भाव झाल्यास बलावस्थेत रोपाचे एखादे पण कडेने वाळू लागतेआणि एखादी फांदी सुकलेले आढळते.बर्याचदा ग्रासित रोपांवर जमिनीपासून काही अंतरावर छीद्रेही आढळतात आणि त्यामुळे उत्पादनात १५ टक्केपर्यंत नुकसान संभवते.

पाने खाणारी स्पोडोप्तोरा किडीची अंडी समुहात घेतली जातात.अळ्या सुरुवातीस समूहानेच पानावर उपजीविका करतात .या अवस्थेत पानाचा पापुद्र शाबूत ठेऊन केवळ त्यातील हरितद्रव संपूष्टात आणतात त्यामुळे हिरवी दिसणारी पाने पांढरटपडून पारदर्शक होताना दिसतात तिसरी कात टाकल्यानंतर अळ्यास्वतंत्र रित्या उपजीविका करण्यासाठी शेतभर परसतात. वाढलेले शरीर,वजन व त्यामुळे वाढलेली प्रचंड भूक यामुळे अळ्या आधाशासारख्या पानावर तुटून पडतात व शेंगेतील दाणेही खाऊ लागतात किडीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलुरचा वापर करण्यातालेले फेरोमेन संपले नियंत्रणासाठी अंडी समूहांचा तसेच समूहाने आढळणाऱ्या आल्याचा वेळीच नायनाट केल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळता येतो.

रोग:-

तंबोरा या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके येतात व अपने तपकिरी पडतात .आद्रतायुक्त हवामान,वारा,रोपांची जास्त संख्या यामुळे पिकात हवा खेळण्याचे कमी झालेले प्रमाण या बाबी रोगास आमंत्रित करतात .या रोगाने शेंगा पिवळसर तपकिरी तपकिरी पडतात व.बऱ्याचवेळा अकाली पानगळ होते.दाण्यांचा वजनात लक्षनिय घात होतोव हेक्टरी उत्पादन घटते.तंबोरा प्रभावित भागात पेरणी श्यकतो .१५ मी ते २५ जूनच्या दरम्यान करावी.फुले अग्रणी कल्याणी सारख्या या रोगास बळी न पडणाऱ्या जातीचा वापर करावा .प्रोपिकोनझॉल यापैकी एखादे बुरशीनाशकाची फवारणी १ लिटरला १ मिली या प्रमाणत करावी.

काढणी:-

सोयाबीन शेंगाचा रंग पिवळत तांबूस झाल्यानंतर ,जातीच्या पक्वतेचा ९० ते ११० दिवसांत काढणी करावी.पिक काढणीस उशीर झाल्यास शेंग फुटण्यास सुरुवात होते .

त्पादन:-

सोयाबीन पिकाचे उत्पादन २० ते २५ क्विंटल प्रती हेक्टरी  मिळते.