सुर्यफुल :-

जमीन :- 

 सुर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी . आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे ब्पिक चांगले येत नाही . 

पूर्वमशागत :- 

जमिनीची खोल नांगरट करून त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात . शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे . 

पेरणी हंगाम :- 
खरीप - जुलाई पहिला पंधरवाडा उन्हाळी - फेब्रुवारी पहिला पंधरवडा . 

पेरणीचे अंतर :- 
कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते . बियाणे ५ सेमी पेक्षा जास्त खोल पेरू नये . बागायती पिकाची लागवड सारी वरंब्यावर टोकन पद्धतीने करावी . 

बियाणे :- 

सूर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणांचे ८ - १० किलो बियाणे आणि संकरीत वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे . 

बीजप्रक्रिया :- 

मर रोगाच्या प्रतिबंधासाठी २ ते २.५ ग्राम थायरम किंवा ब्रासिकोल प्रतिकिलो बियाण्यास चोळावे . केवडा रोग टाळण्यासाठी ६ ग्राम अप्रोन ३५ एस . डी . प्रती किलो बियाण्यास चोळावे . तसेच विषाणू जन्य ( नॅक्रोसीस )  रोगाच्या प्रतिबंधासाठी इमीडॅक्लोप्रीड ७० डब्लू . ए . गाउचा ५ ग्राम प्रती किलो बियाण्यास लावावे . त्यानंतर अॅझोटोबाक्टोर हे जीवाणू खत २५ ग्राम प्रती किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावी . 

आंतरपीक :- 
आंतरपीक पद्धतीत सुर्यफुल अधिक तूर ( २ : १ किंवा २ : २ ) या प्रमाणात ओळीने पेरणी केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते . 

रासायनिक खते :- 
कोरडवाहू विकास प्रती हेक्टरी २ . ५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र , २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे . बागायती पिकास प्रती हेक्टरी ६० किलो नत्र अधिक ३० किलो स्फुरद अधिक ३० किलो पालाश द्यावे . यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद  आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावी व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी . गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रती हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे . 

आंतरमशागत :

पेरणीनंतर १५ - २० दिवसांनी दोन रोपातील अंतर ३० सेमी ठेऊन विरळणी करावी . पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी पेरणीनंतर २० दिवसांनी व दुसरी कोळपणी ३५ ते ४० दिवसांनी करावी . 

पाणी व्यवस्थापन :- 

सूर्यफुलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे . सूर्यफुलाच्या संवेदनक्षम अवस्था १ ) रोप अवस्था २ ) फुलकळी अवस्था व संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये . फुलकळी अवस्था ते दाने भरण्याच्या  अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घात येते . 

पिक संरक्षण :- 
विशानुजन्य रोग हा रस शोषनाऱ्या फुलकिड्यामार्फत होतो . त्यांच्या नियंत्रणासाठी इमीडॉक्लोप्रीड २०० एस . एल . २ मिली / १० लिटर पाणी या प्रमाणात   पेरणीनंतर १५ दिवसांच्या अंतरीने तीन वेळा फवारण्या कराव्यात . मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी डायमीथोएट ३० प्रवाही ०.०३ टक्के फवारावे घाटे अळीच्या नियंत्रणासाठी क्विनोलफोस २५  टक्के प्रवाही १००० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी वापरावे . केवळ अळीच्या नियंत्रणासाठी अळ्याचे पुंजके वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा . 

जैविक कीड नियंत्रण :- 
सुर्याफुलाव्रील पाने खाणारी अळी , घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एच . एन . पी . व्ही . या विषाणूची फवारणी करावी . 

काढणी :- 
सूर्यफुलाची पाने , देठ व फुलाची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी . कणसे चांगली वळवून नंतर मळणी करावी . 

उत्पादन :- 

कोरडवाहू पिकापासून प्रती हेक्टरी ८ ते १० क्विंटल , संकरीत वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती / संकरित वाणापासून प्रती हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळते . 

विशेष बाब :- 

पिक फुलोऱ्यात असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळुवार हात फिरवावा म्हणजे कृत्रीम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते ब. सूर्यफुलाचे फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी २ ग्राम बोराक्स प्रती लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी . त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते . परागीभवन होण्यासाठी प्रती हेक्टरी ४ - ५ मधमाश्यांच्या पेट्या ठेवावेत . सुर्यफुल पिकाची फेरपालट करावी . सुराय्फुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात . दरवर्षी त्याच जमिनीत वारंवार हे पिक घेतल्यास जमिनीचा पोट बिघडून उत्पादन क्षमता कमी होते . तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढतो . त्यासाठी कमीत कमी तीन वर्षे तरी त्याच जमिनीत  सूर्यफुलाचे पिक घेऊ नये . पिक फुलोऱ्यात असताना  कीटकनाशकाची फवारणी करू नये . अगदीच आवश्यकता असेल तर कीटकनाशकाची फवारणी करावी .