जमीन :- 

करडईच्या पिकास मध्यम ते भारी (खोल ) जमीन वापरावी . ४५  सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जमिनीत पिक चांगले येते . त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी . पाणी साठवून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो . थोड्याफार चोपण जमिनीतही हे पिक येवू शकते . 

पूर्वमशागत :- 

भारी जमिनीत तीन वर्षातून आकडा खोल नांगरट करावी व हेक्टरी ५ टन शेणखत ( शेतकर्याकडे उपलब्ध असल्यास ) टाकावे . दोन ते तीन कुळवाच्या प पाळ्या (उभ्या आणि आडव्या ) देवून जमीन भुसभुशीत करावी . पेरणीची वेळ 

करडइची पेरणी योग्य वेळी करणे फार महत्वाचे आहे . लवकर पेरणी ( सप्टेंबर पहिला पंधरवाडा ) केल्यास पिकाचे पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे फार नुकसान होते आणि पर्यायाने उत्पादनांत घात येते . या उलट उशिरा पेरणी केल्यास ( ऑक्टोंबर दुसरा  आठवड्यानंतर ) पिक वाढीची अवस्था थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रदुभाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घात येते . त्यासाठी करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसर्या पंधरवाडा ते  ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे . बागाईत करडईची पेरणी ऑक्टोंबर अखेरपर्यंत करावी . 

पेरणीचे अंतर :- 

कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळीतील अंतर ४५ सेमी आणि दोन रोपातील अंतर २० सेमी ठेवावे . 

पेरणी पद्धत :- 

करडई या तेलबिया पिकाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी . 

बियाणे :- 
प्रती हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते . 

बीजप्रक्रिया :- 

थायरम किंवा कॅप्टन किंवा बाविस्टीन २.५ ग्राम प्रती किलो बियाण्यास चोळावे म्हणजे उगवणीनंतर करडईचे पिक बुरशीजन्य रोगास बळी पडणार नाही तसेच अॅझोस्पिरीलीअम  २५० ग्राम अधिक पी . एस . बी . २५० ग्राम प्रती १० ते १५ किलो बियाण्यास वापरल्यास हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादकतेत वाढ होते . 

आंतरपीक पद्धत :- 
सोलापूर येथील अखिल भारतीय तेलबिया करडीइ संशोधन प्रकल्पांतर्गत केलेल्या संशोधनावरून  हरभरा अधिक करडई ( ६ : ३ ) आणि जवस अधिक करडीइ ( ४ : २ ) या आंतरपीक पद्धती फायद्याच्या असल्याचे दिसून आले . 

रासायनिक खत मात्रा :- 
करडई हे पिक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते . ५० किलो नत्र ( ११० किलो युरिया ) आणि २५ किलो स्फुरद ( १५६ किलो सिंगल सुपर फोस्फेट ) प्रती हेक्टरी देणे आवश्यक आहे . हि खते पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत . बागायती करडई पिकास ६० किलो नत्र अधिक ३० किलो स्फुरद प्रती हेक्टरी द्यावे . 

आंतरमशागत :- 
उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी या पिकाची विरळणी करणे आवश्यक आहे . विरळणी करताना चांगली जोमदार रोपे ठेवावी . दोन रोपांमधील अंतर २० सेमी ठेवावे . रब्बी हंगामात गरज असल्यास एखादी खुरपणी करावी . दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे . पहिली कोळपणी ३ या आठवड्यात फातीच्या कोळप्याने व तिसरी कोळपणी ८ व्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी . 

पाणी व्यवस्थापन :- 

करडई हे पिक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते . मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या  पिकास पेरणी नंतर पाणी देण्याची गरज भासत नाही . कालांतराने ओलावा कमी झाला आणि दुसरे पाणी पिक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे . पिकास पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये . तसेच भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते . जास्त पाण्यामुळे पिक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडते . म्हणून करडई पिकास हलके पाणी द्यावे . 

पिक सरंक्षक :- 

करडई पिकास  मुख्यतः मावा या किदिच्सा प्रादुर्भाव दिसून येतो करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसर्या पंधरवड्यात केली असता या किडीचा प्रादुर्भाव बराच कमी होतो . या किडीचा प्रादुर्भाव बराच कमी होतो . या किडीच्या नियंत्रणासाठी मावा दिसून आल्यानंतर डायमेथाएट ( रोगर ) ३० टक्के प्रवाही ७२५ मिली . ५०० लिटर पाण्यात मिअस्ळून प्रती हेक्टरी फवारणी करावी . सर्कोस्पोरा व अल्टरनेरीया या बुरशीमुळे होणाऱ्या पानावरील ठीपाक्यासाठी डायथेन एम - ४५ , १२५० ग्राम किंवा कॉपर ओक्झीकलोराइड  १५०० ग्राम ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे . 

काढणी :- 

साधारणपणे १३० ते १३५ दिवसात करडईचे पिक पक्व होते . पाने व बोंडे पिवळी पडतात . पिकाची काढणी सकाळी करावी . हवेत आर्द्रता जास्त असल्याने दाणे गालात नाही व हाताला काटे टोचत नाही . काढणी गव्हाच्या एकत्रित काढणी व मळणी यंत्राने काढणी अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळात करता येते व त्यापासून स्वच्ह माल मिळतो . करडई काढणीसाठी एकत्रित काढणी यंत्राचा प्राधान्याने वापर करून खर्च व वेळ वाचवता येतो . 

उत्पादन :- 
मध्यम जमिनीत वरील सूत्रांचा अवलंब करून लागवड केल्यास प्रती हेक्टरी १२ ते १४ क्विंटल आणि खोल जमिनीत १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते . बागायती पिकापासून २० ते २५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते . 

विशेष बाब :- 
करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमान  इतर   तेलापेक्षा  बरेच कमी असल्याने हृदय रोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असते . या तेलाच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्तेरोलाची मात्रा प्रमाणाबाहेर वाढत नाही . वैद्यक शास्त्रात औषधोपाचार म्हणून करडईच्या पाकळ्यांना उपयोग केला जातो . मानवी शरीरातील राक्त्भिस्र्ण्याच्च्या कार्यक्षमतेवर करडईच्या पाकाल्याच्या इष्ट  परिणाम होतो . हृदयरोगाच्या इलाजात करडई पाकळीयुक्त औषधांचा वापरामुळे रक्तातील कोलेस्तेरोलाचे प्रमाण कमी होते . मणक्याचे विकार , मानदुखी , पाठदुखी इत्यादींवर आयुर्वेदिक उपचारात करडइ पाकळ्या इतर औशाधासोबत वापरल्यास आराम मिळतो . करडई  पाकळ्यांचा दररोज काढा पिल्यास वरील रोगापासून बर्याच प्रमाणात फायदा होतो . करडईची फुले उमल्ण्यास सुरुवात होताच सायकोसील या वाढ प्रतीरोधाची १००० पी . पी. एम . तीव्रतेच्या ( १००० मिली . ५०० लिटर पाण्यात ) या द्रावणाची फवारणी केल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे प्रयोगांती दिसून आलेले आहे .