चंदन :- 

चंदन रोपांची लागवड करताना सुरु , मॅझीअम , जांभूळ , डाळिंब , पेरू , करवंद , निम , मेलिया दुबिया उपयुक्त सहयोगी वनस्पतींची लागवड करावी . 

सुरुवातीच्या काळामध्ये चंदनाचा रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत . सुरुवातीची तीन वर्षे चांगली निगा ग्यावी रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते . 

चंदन रोपांची लागवड ४ मीटर बाय ४ मीटर अंतराने करावी . चंदनाला सहयोगी वृक्षाची गरज असल्याने दोन चंदनाच्या मध्य भागामध्ये एक वृक्ष प्रजाती लावावी . जेनेकरून त्याला कायमस्वरूपी आधार मिळेल . 

उपयुक्त सहयोगी झाडांचा विचार करता चंदनाच्या बरोबरीने सुरु मॅझियम , जांभूळ , डाळिंब , पेरू , करवंद , निम , मेलिया , दुबिया इत्यादी वनस्पतीची लागवड करावी सुरुवातिच्या काळामध्ये चंदनाच्या रोपांभोवती ५ ते १० तुरीची रोपे लावावीत . 

सुरुवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी . चंदनाच्या रोपांची मुले वृक्षाच्या मुळाशी जोडली गेल्यानंतर तूर काढावीत . रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते . जास्त पावसाच्या प्रदेशात रोपांची लागवड ऑगष्ट महिन्यामध्ये करावी . 

चंदनाची खोड निर्मिती ७ ते १० वर्षानंतर होते . व्यावसायिक काढणीचा काळ १५ वर्षांचा असतो . 

चंदन लागवड करताना :-
खासगी जमिनीमध्ये चंदनाची लागवड करण्यासाठी परवानगी लागत नाही . परंतु प्रजाती तोडण्यासाठी विभागीय वन अधिकार्याकडे परवानगी घेणे गरजेचे आहे . 

चंदन एक संरक्षित वन प्रजाती आहे . त्याच्या तोडणीस आणि विक्रीस वनरक्षक कायदा १९५६ अंतर्गत पुरवठा परवानगी घेणे आवश्यक आहे . 

लागवड केल्यानंतर जमिनीच्या सातबारा नमुन्यामध्ये नोंद करून घ्यावी . जमल्यास संबधित वन अधिकाऱ्याचा आपल्या प्रक्षेत्रावर चंदन लागवड असल्याचा दाखला प्रप्त६ करून घ्यावा . 

श्वेत चंदनाचे महत्व :- 
शास्त्रीय नाव - santalum album 

चंदन तेलाचे व्यावसायिक नाव - east indian sandalwood oil 

नैसर्गिकरित्या चंदनाचा आढळ हा इंडोनेशियापासून न्यूझीलंडपर्यंत आहे . 

वृक्ष सदापर्णी असून नैसर्गिकरित्या भारतात सर्वत्र आढळतो , कर्नाटक , आंद्र्प्रदेश , केरळ व तामिळनाडू राज्यात चंदन मोठ्या प्रमाणात दिसते . 

हा वृक्ष ४२ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमान शान करू शकतो . परंतु हिवाळ्यात पडणारे दव , धुके यास सहन होत नाही . 

चंदनाच्या खोडापासून उर्ध्वपतनद्वारे तेल काढले जाते . तेलाचा उपयोग अगरबत्ती , सौदर्यवर्धक उत्पादने , सुगंधी द्रव्ये आणि साबनामध्ये होतो . 

चंदन तेलाचा उपयोग अत्तर आणि औषधनिर्मितीमध्ये होतो . 

रक्त चंदनाचे महत्व :- 

शास्त्रीय नाव - pterocarpus santalinus 

याचा नैसर्गिकरीत्या आढळ सुक्या पानझाडीत वनामध्ये असतो . हि प्रजाती समुद्रसपाटीपासून १५० - ९०० मी . उंचीवर आढळते . 

लाल , काळी , आणि निचरा होणाऱ्या जमिनीत रक्त चंदनाची चांगली वाढ होते . याच्या वाढीसाठी ८८० ते १०५० मी .मी पाउस व उष्ण - कोरडे हवामान लागते . 

आंध्र प्रदेश , तामिळनाडू आणि कर्नाटकात रक्त चंदनाची लागवड दिसून येते . 

 लाकडाचा उपयोग फर्निचर , वाद्यानिर्मिती तसेच औषध निर्मितीमध्ये होतो . 

याची लागवड मराठवाडा , विदर्भात करता येते . कोकनमधील अति पावसाच्या भागात रक्तचंदनाची शेती करता येणार नाही ; तयार लाकडाच्या विक्रीसाठी सुलभ कायदेशीर बाजार नसल्याने त्याची लागवड करण्यास अजूनही प्रोत्साहन मिळत नाही 

रक्तचंदनाचा तुलनेत६ श्वेत चंदनाची लागवड केल्यास त्याचा उपयोग तेलनिर्मिती , हस्तकलेसाठी होतो . 

अर्ज सादर करताना लागणारी कागदपत्रे :- 

वृक्ष तोडीचा नमुना नं . १ 

लागवड असलेल्या जमिनीचा सात बारा 

लागवड असलेल्या जमिनीचा ८ अ 

 लागवड असलेल्या जमिनीचा नकाशा 

लागवड असलेल्या जमिनीचा चतुसीमा 

१२ हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्याचे प्रमाणपत्र 

उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र 

पुनः वृक्ष लागवड करणार असल्याचे हमी पत्र ( १०० रुपयांचा बॉंड पेपर )