प्रस्तावना :-
जायफळ हे १० ते २० मीटर उंच वाढणारे सदापर्णी झाड आहे . जायफळामध्ये पपई व कोकम या प्रमाणेच नर व मादी झाडे वेगवेगळी असतात . जायफळ बागेमध्ये सुमारे ५० टक्के झाडे मादी ४५ टक्के नर व ५ टक्के संयुक्त फुले असणारे झाडे निघतात . नराच्या झाडास गुच्छाने फुले लागतात . तर मादी झाडास एक एकटी फुले लागतात . जायफळाची फळे चिकूच्या आकाराची पण गुळगुळीत व पिवळसर रंगाची असतात .फळांच्या टरफळांच्या आतील अंगास गुलाबी रंगाची जाळी असते . या जाळीस जायपत्री म्हणतात . फळांच्या टरफळांचा उपयोग लोणचे , चटणी , मुरबा इत्यादी साठी करतात जायफळाचा उपयोग मिठाई स्वादिष्ट करण्यासाठी तसेच ब्जाय्फळ व जायपत्रीचा उपयोग मसाल्यात केला जातो . जायफळातील तेलाचा उपयोग औषध , साबण , टूथपेष्ट चोक्लेत इत्यादी उत्पादनात केला जातो .
हवामान व जमीन :-
जायफळ हे उष्ण कटिबंधातील पिक असून या पिकास दमात हवामान व २५०० ते ४००० मिमी पर्यंत पाउस चांगलास मानवतो पावसाची व्यवस्थित विभागणी असेल अशा १५०० ते ३००० मिमी पर्यंत पाउस पडणार्या प्रदेशातही हे पिक येते . अति थंड म्हणजे १० से . ग्रे . किंवा त्याखाली तसेच अतिउष्ण म्हणजेच ४० से ब. ग्रे . पेक्षा अधिक तापमान या पिकास मानवत नाही . समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंची पर्यंत हे पिक घेतले जाते .
किनारी पट्टीतील रेटल ब, गालमिश्रित रेताड , वरकम अशा विविध प्रकारच्या परंतु उत्तम निच्र्याच्या जमिनीत जायफळाची लागवड होऊ शकते . पोयात्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन अधिक मनक़्व्ते . या झाडाला देखील सावलीची आवश्यकता असल्यामुळे आंतरपीक म्हणून घेतले जाते .
नारळ - सुपारीच्या बागेत या झाडास आवश्यक असणारी सावली तसेच पश्चिमी वार्यापासून आवश्य६अक असणारे संरक्षक मिळते .
पूर्वमशागत :-
नारळाची लागवड ७.५ * ७.५ मीटर अंतरावर असल्यास पावसाळ्यापूर्वी प्रत्येक दोन नारळाच्या मध्यभागी व सुपारीच्या बागेत चार सुपारीच्या झाडांच्या चौफुल्लीवर ९० सेमी लांबी रुंदी व खोलीचे खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात ५० किलो शेणखत / काम्पोष्ट खत घालावे .
अभिवृद्धी :-
जायफळाची अभिवृद्धी बी पासून तसेच कलमे करून हि करता येते . परंतु प्रामुख्याने जायफळाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून हि केली जाते . बिया पासून तयार केलेले रोपे हे नराचे आणि किंवा मादीचे हे काळात नाही रोप लावल्यानंतर त्याला जवळजवळ ६ ते ७ वर्षनंतर फुले येऊ लागतात . त्यानंतर ते झाड नराचे आहे किंवा मादीचे ते कळते . फक्त मादी झाडास फळे धरतात .
रोपे तयार करण्यासाठी जायफळाचे ताजे बी वापरावे लागते . बी रुजविण्यासाठी १५ सेमी उंच १ ते १.५ मीटर रुंद व आवश्यक त्या लांबीच गादीवाफे तयार करावेत . गादी वाफे तयार करण्यासाठी माती व वाळू यांचे योग्य मिश्रण वापरावे . तयार केलेल्या गादी वाफ्यावर जायफळाचे बी रुजण्यास सुरुवात होते . सुमारे १० ते १५ दिवसांनी रोपे प्लास्टिकच्या पिशव्या लावण्यास योग्य होतात . सुमारे १ वर्षांनी रोपे लागवडी योग्य असतात .
जायफळाची अभिवृद्धी कलमे करून देखील करता येते . भेट कलम , मृद्काष्ट कलम अशा कलमाच्या पद्धती वापरून आपल्याला जाय फळाची कलमे लावल्यामुळे बरेच फायदे होऊ शकतात सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी मादीची आणि नराची झाडे लावता येतात . मादी झाडाची कडी वापरून बांधलेल्या कालमपासून नराचे झाड मिळते . दुसरा महत्वाचा न्फायदा म्हणजे कलमाला फुले लवकर उत्पन्न मिळते . ज्या मादी झाडाच्या कड्या कलमे बांधण्यासाठी वापरलेल्या असतात . त्या झाडांसारखीस तयार केलेली कलमे उत्पादनाला असतात . थोडक्यात जायफळाची अभीवृद्धी कलमाने केल्यास आपणास पाहिजे त्या गुणधर्माचे झाड निर्माण करता येते .
जायफळाची कलमे जरी लावून आपण लागवड केली तरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बागेतील नर आणि मादी झाडाचे प्रमाण दर दहा मादी झाडांच्या कलमामागे कमीत कमी एक नराचे कलम असणे आवश्यक कलमे लावली तर फक्त फुले येतील पण नर झाड नसल्याने फलधारणा होणार नाही .
लागवड :-
जून महिन्यात तयार केलेल्या खड्यांच्या मध्यभागी जोमाने वाढणारे रोप / कलम लावून त्याच्या भोवतालची माती पायाने न्दाबून घटत करावी . रोपाची लागवड करावयाची झाल्यास रोपे निरोगी , सशक्त तसेच १ ते २ वर्ष वयाचे असावे . कलम लागवडीत कलामांच्या जोड व्यवस्थित असून कलम बांधलेली प्लास्टिक पट्टी अगर सुतळी सोडून टाकली आहे .याची खात्री करावी . तसेच कलमाच्या जोड जमिनीवर राहील याची दक्षता ग्यावी .
खते :-
जायफळाच्या झाडास पहिल्या वर्षी १० किलो शेणखत / काम्पोष्ट , २० ग्राम , नत्र ( ४५ ग्राम युरिया ) १० ग्राम स्फुरद ( ६५ ग्राम सुपर फोस्फेट ) आणि ५० ग्राम पालाश ( ८५ ग्राम म्युरेट ऑफ पोटाश ) द्यावे . हि खताची मात्रा दरवर्षी अशाच प्रमाणात वाढवावी . मात्र ८ ते १० वर्षानंतर प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत / कंपोष्ट ५०० ग्राम नत्र ( १ किलो युरिया ) २५० ग्राम स्फुरद ( ६४० ग्राम सिंगल सुपर फोस्फेट ) १ किलो पालाश १.६ किलो म्युरेट बोफ्फ पोटाश द्यावे .
आंतरमशागत व निगा :-
जायफळ हे बागायती पिक आहे म्हणूनच जमिनीचा प्रकार आणि हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात . जमीन खडखडीत कोरडी होणार नाही आणि अति पाणी दिल्याने दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी . रेताड जमिनीत उन्हाळ्यात प्रत्येक दोन दिवसाआड पाणी द्यावे . गरज भासल्यास पावसाळ्यात बागेतील पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी पाणी द्यावे . आवश्यकता भासल्यास दोन ते तीन वर्ष तरी जायफळ रोपांना / कलामना सावली करणे हितावह ठरते .
काढणी व उत्पादन :-
जायफळाला फुले आल्यानंतर फळधारणा ते काढणी केली जाते . पूर्ण पक्व झालेल्या फळांचा रंग पिवळा होतो . तसेच टरफळास देठाच्या विरुध्द बाजूस तडा जातो . अशी फळे काढावी किंवा पडल्यानंतर गोळा करावीत कि , टरफळे वेगळी करून जाय पत्री अलगद काढावी . जायपत्री व बिया उन्हात वाळवाव्यात . परंतु बरीचशी जायफळे पावसाळ्यात तयार होत असल्याने उन्हात वाळविता येत नाही . अशा वेळी बिया व जायपत्री मंद उष्णतेवर वाळवाव्यात . जायपत्री ६ ते ८ दिवसात तर जायफळे १५ दिवसात वळतात .
पूर्ण वाढीच्या मादी झाडापासून ५०० ते ८०० फळे मिळतात . पंचवीस वर्षापर्यंत उत्पन्न वाढत जाते . पंचवीस वर्षाच्या झाडापासून दोन ते तीन हजार फळे मिळतात . ६० ते ७० वर्ष या झाडापासून किफायतशीर उत्पन्न मिळते .
रोग व कीड :-
या झाडास रोग व किडीपासून फारसा उपद्रव होत नाही . क्वचीत फळ कुजणे हा रोग आढळून येतो अशावेळी १ टक्का बोर्डो मिश्रनाची फवारणी करून या रोगावर नियंत्रण घालता येते .