प्रस्तावना :- 

मसाले पिकास लवंग हे एक पिक अतिशय महत्वाचे महत्वाचे स्थान असलेले किमती पिक आहे . भारतात प्रामुख्याने हे पिक केरळ , तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते . लवंगचा उपयोग अन्न पदार्थांना स्वाद व चव देण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या औधोगिक उत्पादनात लवंग तेलाचा उपयोग होतो . टूथपेष्ट , दातदुखी वरील औषधे , पोटावरील विकारांवर औषधे तसेच उत्तम प्रतीची अत्तरे सुवासिक साबण व व्हानीला तयार करण्यासाठी लवंग तेलाचा उपयोग होतो . लावण्गापासून १५ ते १७ टक्के तेल मिळते . 

हवामातील साधर्म्यामुळे केरळ प्रमाणेच महाराष्ट्रातील कोकण विभागात लवंग लागवडीस चांगलास वाव आहे . कोकण कृषी  विद्यापीठात विद्यापीठांतर्गत असणार्या विविध संशोधन केंद्रावर लवंगेची लागवड केली जाते . आणि त्यामध्ये पिकांची वाढ व उत्पन्न समाधानकारक असल्याचे दाखवून दिले आहे . त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठबरोबर कोकणातील जिल्हा परिषदा शेतकर्यांना लवंग लागवडीसाठी प्रोजेक्ट देत आहेत . आणि त्यासाठी लवंग रोपांचे वाटप केले जात आहे . 

आपण मसाल्यात वापरतो ती  लवंग  म्हणजे लवंगाच्या झाडावरची काळी होय . पूर्ण वाढलेल्या काळ्या काढून उन्हात वळविल्या कि , लवंग तयार होते . परंतु त्या तशाच वाढू दिल्यास त्यांचे फुलामध्ये रुपांतर होते आणि नंतर फालत म्हणजेच एकाकळीपासून एक लवंग किंवा एक फळ तयार होते . 

हवामान व जमीन :- 

लवंग हे उष्ण कटिबंधातील झाड असून त्यास उष्ण दमट हवामान लागते . समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत ते येऊ शकते . २० ते ३० अंश से . ग्रे . तापमान १५०० ते २५०० मिमी पाउस आणि ६० ते ९५ टक्के आर्द्रता या पिकास चांगली मानवते . प्रखरसुयाचा उष्णतेमुळे पाने व खोडावर करपण्याची क्रिया होऊन झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो . म्हणून या पिकास सावलीची आवश्यकता असते लवन्गक़्चे पिक बहुतेक सर्व प्रकर्च्य६अ जमिनीत येत असले तरी अधिक खोलीच्या उत्तम निचर्याच्या आणि सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे अशा जमिनी अधिक मानवतात . 

भारतात लवंगाची  लागवड ज्या भागात मोठ्या प्रमणात झालेली आहे तेथे जवळजवळ प्रत्येक महिन्यात पाउस पडतो आणि तापमान सौम्य असते . त्यामुळे तेथे लवंगाची लागवड उघड्यावर केली जाते आणि पाणीपुरवठ्याची गरज भासत नाही . याउलट आपल्याकडे परिस्थिती आहे . त्यामुळे लव झाडास उन व वार्यापासून संरक्षण मिळू शकेल असे आदर्श ठिकाणी म्हणजे नारळ किंवा सुपारीची बंग , पूर्वेश उतार असलेल्या डोर उतारावर तसेच दोन डोंगराच्या दरीतील प्रदेशात पाणीपुरवठ्याची सोय असल्यास उघड्यावर देखील लवंगाची लागवड यशस्वी होते . 

नारळ किंवा सुपारीच्या बागेत लवंगेची लागवड करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे . ते म्हणजे नारळ आणि सुपारीच्या झाडांमधील अंतर योग्य अंतरावर सुपारीची लागवड असेल अशा ठिकाणी हे आंतरपीक म्हणून घेता येते आणि चांगले उत्पन्न मिळते . 

पूर्वमशागत :- 

योग्य अंतर ठेवलेल्या नारळ किंवा सुपारीच्या बागेत लागवड करावयाची असल्यास चार नारळ किंवा सुपारीच्या मध्यभागी लवंगेचे रोप लावावे . सुपारी बागेमध्ये मात्र नंतरचे रोप दोन चौकोन मोकळे सोडून तिसर्या लावावे . दोन डोंगराच्या दरीतील लागवड ६ * ६ मीटर अंतरावर करावी . 

निवडलेल्या जागी ४५ सेमी लांब रुंद व खोल खड्डे उन्हाळ्यात खोदावे . खड्ड्याच्या मातीतील दगड वेचून काढून मातीमध्ये २ ते ३ टोपल्या  शेणखत मिसळावे आणि खड्डा भरावा . खड्डा जमिनीपेक्षा थोडा अधिक उंच भरावा . समुद्रकिनार्यावरील रेताड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या मातीत अर्धी तांबडी माती किंवा शक्य असेल तर गालाची माती वापरावी . 

लागवड :-

लवंगची लागवड कोणत्याही हंगामात केली तरी चालते . जोरदार पाउस संपल्यानंतर लागवड करण्याचे फायद्याचे ठरते . लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप वापरावे . अगोदरच भरून ठेवलेल्या खाद्याच्या मध्यभागी रोपाच्या पिशवीच्या आकाराचा खड्डा उकरावा . रोप असलेल्या प्लास्टिक पिशवी , मातीत हुंडी फुटणार नाही अशा पद्धतीने काढून तयार केलेल्या खड्ड्यात रोप लावून भोवतालची माती दाबून घ्यावी . 

खते :- 
लवंगच्या झाडास पहिल्या वर्षी १० किलो शेणखत / काम्पोष्ट २० ग्राम नत्र ( ४० ग्राम युरिया ) १८ ग्राम स्फुरद ( ११० ग्राम सुपर फोस्फेट ) ५० ग्राम पालाश ( १०० ग्राम म्युरेट ऑफ पोटाश ) द्याव . हि खताची मात्रा दरवर्षी अशाच प्रमाणात वाढवावी . व १५ वर्षानंतर प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत / काम्पोष्ट ३०० ग्राम नत्र ( ६०० ग्राम युरिया ) , २५० ग्राम स्फुरद ( १५०० किलो म्युरेट ऑफ पोटाश ) द्यावे . हि खते दोन हप्यात द्यावी . लागवड केल्यानंतर तिसर्या महिन्यात खताचा पहिला हप्ता व दुसरा त्यानंतर सहा महिन्यांनी द्यावा . त्यापुढील वर्षापासून पहिला हप्ता पावसाळ्याच्या शेवटी द्यावा . 

आंतरमशागत  व निगा :- 

 पहिल्या वर्षी लवंगच्या रोपांना सावलीची व्यवस्था करणे जरुरीचे आहे . लवंगेच्या झाडाला पाणीपुरवठा करताना जमीन सतत ओलसर राहील मात्र दलदल होणार नाही याची दक्षता घ्यावी . दलदलीमुळे मररोग येण्याची शक्यता असल्यामुळे ते टाळण्यासाठी एकाचवेळी खूप पाणी देण्यापेक्षा थोडे थोडे पाणी अनेक वेळा द्यावेत . जमिनींत ओलावा टिकून राहण्यासाठी रोपाभोवती ४५ ते ६० सेमी पर्यंत पालापाचोळ्याचे  आच्छादन करावे . 

काढणी व उत्पन्न :- 

लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप उपयोगात आणलेले असल्यास लागवड केल्यानंतर ४ ते ५ वर्षात लवंगच्या झाडास फुले येऊ लागतात . फुले दोन हंगामात येतात . फेब्रुवारी मार्क ह च्या दरम्यान पक़्हिले व प्रमुख उत्पन्न मिळते तर सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात दुसरे व अल्प प्रमाणात उत्पन्न मिळते नवीन पालवीवर लवंगाच्या काळ्या येतात . कळीचा अंकुर दिसायला लागल्यापासून ५ ते ६ महिन्यात कली काढण्यासाठी तयार होते . कळ्यांचा घुमत पूर्ण वाढल्यानंतर त्यांना फिकट नारिंगी रंग प्राप्त होतो . अशाच काळ्याची काढणी करावी आणि त्या उन्हात वाळवाव्यात . साधारणपणे ४ ते ५ दिवसात  कळ्या वाळतात . लवंगच्या १५ ते २० वर्षाच्या झाडापासून २ ते ३ किलो वाळलेल्या लवंगा मिळतात . 

रोग :- 
पाने कुजणे : रोपांना तसेच पूर्ण वाढलेल्या झाडांना या रोगाचा प्रादुर्भाव होतो . सुरुवातीस पानांच्या टोकावर व कडावर काळसा ठिपके किंवा चट्टे दिसून येतात . कालांतराने टोकाकडील भाग काळसर होतो किंवा पूर्ण पानच काळसर होते . अशी पाने अकाली गळून पडतात . 

टिक्का : या रोगामुळे कोवळ्या पाण्याच्या दोन्ही बाजूंवर तांबूस काळसर ठिपके निर्माण होतात . ठिपके पसरत जाऊन आकाराने मोठे होतात . पण पिवळे होते आणि कालांतराने गळून व्पाडते . 

डायबॅक : रेताड व निकस तसेच कमी निच्र्याच्या जमिनीत लागवड केलेल्या झाडांना हा रोग प्रामुख्याने होतो . तसेच पाणीपुरवठा अनियमितपणा झाला तरि देखील हा रोग उद्भवतो . या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील फांद्या शेंड्याकडून जमिनीकडे वळते . या रोगावर पुढील प्रमणे उपाय योजना करावी . 

झाडावर रोग होऊ नये म्हणून १ टक्का बोडो मिश्रणाच्या नवर्शातून फवारण्या करव्यात रोगाच्या प्रादुर्भाव झालेली पाने वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात . 

डायबॅकझालेल्या झाडांच्या आळ्यात वयोमानाप्रमाणे ५ ते १० लिटर पाण्यात १ टक्का बोर्डोमिश्रण ओतावे ब्व १५ दिवसाच्या अंतराने १ टक्का बोर्डोमिश्रनाच्या तीन फवारण्या करव्यात .

किडी :- 

पाने खाणारी अळी - ज्यावेळी झाडास नवीन पालवी येते त्यावेळी पाने खक़्नरि अळीचा उपद्रव आढळून येतो . कोरड्या हंगामात या किडीचा उपद्रव अधिक होतो . त्यामुळे नवीन पालवीचे अंकुर दिसू लागताच फवारणी करावी . 

खोडअळी - अखंड काळ्या रंगाची वव पिवळत पत्ते असलेली केसाळ अळी फांद्या तसेच खोडांना भोके पडून आत शिरते  . त्यामुळे फांद्या व झाडे वाळतात .