प्रस्तावना:-

काळी मिरी मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणाऱ्या काळी मिरीस चांगला वास व उत्कृष्ट दर्जा असल्यामुळे जागतिक काळी मिरीच्या ९० टक्के निर्यात एकट्या भारतातून होते.तसेच भारतात विविध मसाले मसाले पिकांपासून मिळणाऱ्या एकून परकीय चालानापैकी ७० टक्के परकीय चलन एकट्या काळ्या मिरीपासून मिळते. मिरीला काळे सोने या नावाने ओळखले जाते  .

भारतात उत्पादन होणाऱ्या एकून एकूण काळी मिरीपैकी ९८ टक्के उत्पादन एकाट्या केरळ राज्यात होते. त्याखालोखाल कर्नाटक व तामिळनाडूचा क्रमांक लागतो.महाराष्ट्रातील कोकण बिभाग्त तुरळक मिरी लागवड आढळते कोकण किनारपट्टीतील हवामान या पिकाच्या लागवडीस अनुकूल असल्याने आणि काळी मिरीच्या वेलास आधाराची आवश्यकता आसल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या नारळ सुपारी झाडांवर वेळ चढवून मिरी लागवड करता येते परसबागेतील आंबा फणस या सारख्या कोणत्याही झाडावर वेल  चढवून मिरी लागवड करता येते,त्यामुळे घरातील सांडपाण्याचा योग्य उपयोगही केला जातो आणि घरातील काळी मिरीची गरज भागवून आपल्या काही प्रमाणत बाजारातही काळी मिरी विकता येईल आणि त्यातून  आर्थिक फायदासुद्धा होईल.

हवामान व जमीन ;-

उष्ण दमट व सम हवामानात या पिकाला अनुकूल आहे. कडक उन्हाळा किंवा अति थंड हवेत हे पिक येत नाही. हवेमध्ये आद्रतेचे प्रमाणब जास्त असल्यास ह्या वेलीची वाढ चांगली होऊन भरपूर पिक मिळते.

मध्यम ते भारी जमीन तसेच पाण्याच्या निचरा होणारी जमीन या पिकास मानवते . थोडक्यात ज्या हवामानात नारळ,सुपारी यासारख्या फळझाडांची लागवड होते. किंवा होऊ शकते. येथे मिरीची लागवड अगदी सहजरीत्या करता येते. मसाल्याच्या इतर पिकांप्रमाणे या पिकास सावलीची आवश्यकता असते. 

सुधारित जाती:-

केरळ राज्यातील पेयुर मिरी संशोधन केंद्राचे पेयुर-१ ते पेयुर -४ ह्या नवीन जाती विकसित  व प्रसारित केल्या आहेत .तसेच राष्ट्रीय मसाला पिक संशोधन केंद्र काली कात येथून शुभंकारा,श्रीकारा,पंचमी आणि पौर्णिमा या जाती विकसित व प्रसारित करण्यात आल्या आहेत . 

कोकण कृषी विद्यापीठाने पान्नीयुर संशोधन केंद्रातून पान्नीयुर -१ हि जात संकारीकरण करून तयार झालेली जात आणून कोकणच्या भौगोलिक परीस्थितीत त्या जातीचा निकष आजमावून सदर जात कोकणासाठी प्रसारित केली आहे  सदर जाती पूर्ण वाढीच्या वेक वेळापासून सरासरी  सात किलो हिरव्या मिरीचे उत्पन्न मिळते .पान्नीयुर-१ जात गावठी मिरिपेक्षा जवळजवळ ३ पट पिक देते.पान्नीयुर-२ ते पान्नीयुर -५ तसेच श्रीकरा ,शुभकार,पंचमी आणि पौर्णिमा या जाती अभ्यासही कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रावर चालू आहे. 

पूर्वमशागत :-

मिरीची लागवड परसबागेतील आंबा फणस यासारख्या झाडांवर स्वतंत्ररीत्या पंगा-यावर तसेच नारळ सुपारीच्या बागांमध्ये प्रत्येक झाडांवर दोन वेल चढवून करता येते. यासाठी प्रथम आधाराच्या झाडापासून ३० सेमी.अंतरावर ४५*४५*४५ सेमी आकाराचे खड्डे पूर्व व उत्तर दिशेला खोदावेत आणि ते चांगली माती २ ते ३ घमेली कंपोस्ट किंवा शेणखत व १ किलो सुपर फॉस्फेट किंवा हाडांचा चुरा तसेच ५० ग्रम बिएचसीपावडर यांच्या मिक्षानने  भरून ठेवावेत स्वतंत्ररीत्या पांगा-यावर मिरी लागवड करावयाची असल्यास मिरीवेल लागवड करण्यापूर्वी एक वर्षी आगोदर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पांगा -यात खुटांची लागवड करावी लागते. अशावेळी योग्य जमिनीची निवड केल्यानंतर ३*३ मीटर अंतरावर ६०*६०*६० सेमी आकाराचे खड्डे घेऊन ते खड्डे चांगली माती २ ते ३ घमेले ,शेणखत किंवा कंपोस्ट व एक किलो सुपर  फॉस्फेट ने भरून घ्यावेत .अशा खाद्यामध्ये १.५ ते २ मीटर खोलीच्या पांगा-याच्या खुटांची लागवड करावी.पांगा -यामध्ये प्रत्येक झाडाजवळ वर उल्लेख केल्याप्रमाणे पूर्व व उत्तर दिशेस एक एक असे दोन वेळ लावावेल. 

लागवड :-

ज्यावेळी सुपारीमध्ये आंतरपिक घ्यावयाचे असेल त्यावेळी सुपारीच्या दोन झाडांमधील अंतर २.७ ते ३.३ मीटर असावयास पाहिजे मात्र घट्ट लागवड असल्यास फार सावलीमुळे मिरीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.अशा वेळी बागेच्या चोहीकाडेच्या फक्त दोन रंगातील सुपारीच्या झाडांवर    मिरीचे वेळ चढवतात लागवड करतान तयार केलेल्या खड्ड्यात मधोमध मूल्य असलेली मिरीची रोपे लावावीत .वेलआधाराच्या झाडावर चढण्यासाठी वेलास आधार घ्यावा.

खते :-

तीन वर्षापासून पुढे प्रत्येक वेलास २० किलो शेणखत/कंपोस्ट,३०० ग्रम युरिया २५० ग्रम म्युरेट ऑफ पोटॅश व १ किलो सुपर फॉस्फेट द्यावे.हि खाताची मात्र दोन समान हप्त्यात द्यावी. पहिला हप्ता स्प्तेम्बारच्या पहिल्या आठवड्यात व दुसरा जानेवारी महिन्यात द्यावा.

हि खाते वेलापासून ३० सेमी.अंतरावर चर खणून त्यामेध्ये द्यावीत लागवाडीच्या पहिल्या वर्षी खताचा १/३ हप्ता,दुसरा वर्षी २/३ हप्ता ,तिसऱ्या वर्षी आणी पुढील प्रत्येक वर्षी संपूर्ण हप्ता द्यावा.आठ वर्षानंतर मिरीचे भरपूर पिक मिळू लागल्यानंतर जरुरीप्रमाणे खतांचा मात्रा वाढवावी.

 आंतरमशागत आणि निगा :-

काही मिरीचे लहान वेलआधाराच्या झाडावर चढेपर्यंत अधूनमधून त्यांना आधार देणे आणि झाडावर चढण्यासाठी दोरीच्या सहाय्याने भांडणे जरुरीचे आसते. वेल४ ते ५ मीटरहून जास्त वाढू देऊ नये. वेळ आधाराच्या पांगा -याच्या फांद्या काही प्रमाणत कापून सावली योग्य प्रमाणत ठेवावी. वर्षातून दोनवेळा आँगस्टसप्टेंबर आणि नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये वेलाभोवती जमीन खोतून भुसभुशीत करावी.

काढणी , उत्पन्न व प्रक्रिया :-

हिरव्या घडतील एक दोन दाण्यांचा रंग तांबडा  -लाल  होताच घड तोडावेत. एक पेयुर-१य जाती वेलापासून सुमारे ५ ते ६ किलो हिरवी मिरी मिळते आणि मिरी वाळविल्यानंतरदीड ते दोन किलो होते . नंतर त्या घडतील मिरीचे दाने हातानी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्या जमिनीवर घडांचे ढीग करून स्वच्छ पायाने तुडवावेत.हि पद्धत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी घड तयार झाले तरच वापरतात .

हिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाने बांबूच्या कार्दीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्यात गुंडाळलेली मिरी त्या उकळत्या पाण्यात बुडवून काढावी. अशा रीतीने उकळत्या पाण्यातून बुडवून खालेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडके आन्तःरून त्यावर वळत ठेवावी. साधारणपणे ७ ते १० दिवस उन्हामध्ये वळवावी.म्हणजे काळी कुळकुळीत ण सुरकुतलेली उत्तम प्रतीची काळी मिरी तयार होईल.परंतु हिरवी मिरी उकळत्या पाण्यात ण बुडविता तशीच जर वळविली तर ती चांगल्या प्रकारे काळ्या रंगाची होत नाही.,त्यामध्ये काही दाने भरकट तपकिरीरंगाचे होतात व त्यामुळे भेसळ असल्याचा भास होतो.अशा मालाला भाजर्भाव कमी मिळतो.म्हणूनच हि प्रक्रिया फार महत्वाची आहे.नंतर चांगली वाळलेलीकाळी मिरी काचेच्या बरणीत अगर घट्ट झाकण असलेल्या भांड्यात ठेऊन झाकण १२ टक्का पेक्षाहि जास्त ओलावा असता कामा नये. म्हणजे ती साठविण्याच्या कालावधीत चांगली राहू शकते.

कीड व रोग:-

मिरीच्या पिकांवर जास्त हानिकारक कीड व रोग आढळून येत नाही. परंतु पोलभुंगे मिरीची फळे दाने हिरवी असताना त्यातील गार काह्वून मिरीचे दाने पोकळ बनवून नुकसान करतात ह्या किडीच्या बंदोबस्तासाठी मॅलेथिऑन किंवा कार्बरील औषधांचा फवारा जुलाई व ऑक्टोंबर महिन्यात वेलीव फळांवर द्यावा.वेळच्या खालील जमीन खणून घेतल्यास ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

मार व इतर रोगांपासून वेलींची हानी होऊ नये ह्यासाठी पावसाला सुरु होण्यापूर्वी मे महिन्यात व नोव्हेंबर महिन्यात १ टक्का बोडोमिश्रण वेलीवर फवारावे.

योजना :-

काळी मिरीची रोपे शेतकऱ्यांना क्षेत्र विस्तावर आणि आतार्पिक कार्यक्रमासाठी ५० टक्के अनुदानावर रुपये ०.७५ प्रती कलम या दराने देण्यात येतात.

नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने मिरीचे अधिक उत्पन्न देणाऱ्या व चांगली प्रतिक्षा व गुणधर्म असलेल्या जातीचे व १०० कलमांचे प्रात्यक्षित प्लॉट स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनातीन वर्षापर्यंत अनुक्रमे रु.२२५ रु.१४० व रु.१५० असे अनुदान देण्यात येते.

काळी मिरीची आंतरपीक म्हणून चांगली लागवड करणे प्रकारची लागवड करण्यासाठी मारलं/सुपारीची कमीत कमी सात वर्षाची झाडे असणाऱ्या काळी मिरीची कमीत कमी ३० जास्तीत जास्त २०० रोपे विनामूल्य पुरविण्यात येतात .