प्रस्तावना :-
हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पिक म्हणून ओळखले जाते.भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे.टनइतके आहे.जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८० टक्के उत्पादन भारतामध्ये होते,
परंतु त्यापैकी १५ ते २० टक्के फक्त हळद निर्यात होते.उत्पदानाचाविचार केला असतात प्रथमक्रमांक आंध्र प्रदेश असुंज त्यानंतर ओरिसा तामिळनाडू आसाम,कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो.महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टार क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते.
हळदीचे औषधी गुणधर्म :-
१.आयुर्वेद शात्रानुसार हळद पोटदुखी निवारक ,रक्तशुद्धीकारक बलवर्धक कृमिनाशक आल्मापित्तहारक भूक उद्दीपित करणारी आहे.
२. हळदिमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे.
३. पायावर सूज आल्यास हळद,गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे.
४.डोळ्याचे विकारावर हळकुंड तुरीच्या दलित शिजवून डोळ्यात अंजन करावे.
५.डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद ,थोडा पिसालेला कपूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग ,खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.
महत्व:-
धार्मिक कार्यक्रमात तसेच हळदी पासुनचे कुंकू,हळद,लग्नकार्य ,पूजा,भंडारा,सौंदर्य प्रसाधने व अनेक पोषक घटक तयार करतात .
हवामान :-
हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पूस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊससमान हे पिक काही वेळ सहज सहन करू शकते,पंरतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही.सरासरी ५०० ते ७५० मिलीमीटर असणाऱ्या निमशुल्क वातावरणात हळदीचे पिक चांगले येते.थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अशी थांबते .व जमिनित्तील कंदाची वाढ होते.कोरडे व थंड कंद पोषणास अनुकूल असते.
जमीन:-
हळद पिकाची यशस्वी किंबहुना फायदेशीर लागवड हि प्रमुख्खानेजमिनीच्या निवडीवरच अवलंबुन असते.या पिकास मध्यम प्रतीची तसेच चांगलानिचरा होणारी जमीन आवश्यक असते. भारी काळ्या चिकन क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पिक चांगले येत नाही म्हणून हळद लागवडीसाठी श्याक्तो अशा जमिनीची निवड करू नये.,
सुधारीत जाती:-
१)फुले स्वरूप
२)सेलम:
३)कृष्णा(कडप्पा ):
४)राजापुरी :
५)खाण्याची हळद (Curcuma Longa):
६)कस्तुरी किंवा रान हळद (cucuma caesia):
७)इस्ट इंडिअन अँरोरूट(East Indian Aroroot):
८)आंबे हळद (Curcuma Amada):
९)काळी हळद (curcuma Caesia):
१०)कचोर (Curcuma Zedoria):
पूर्व मशागत :-
हळद लागवाडीमध्ये पूर्व मशागतीच्या कामामध्ये नांगरट करणे,ढेकळे,फोडणे,शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावानेखणून हि सर्व पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे करून घेणे आवश्यक आहे .
पहिल्या नांगरटीनंतर शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याच्या कुळव मारून द्यावा. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी परत संपूर्ण ढेकळे फोडून द्यावीत आणि ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.
लागवडीचा हंगाम आणि लागवड :-
हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो.लागाविडी साठी वापरले जाणार्या बियाणांची सुप्तावस्थ संपलेली असावी.रुंद वरंबा पद्धतीने ३०*३० से.मी.अंतरावरती गड्डे पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.
बेणे:-
एकरी १००० किलो बेणे लागते. लागवड मातृ कंदापासून करतात .या कंदापासून तयार केलेल्या ३० दिवसाच्या वयाच्या रोपापासुनही लागवड करतात कन्या कंदहीलागवडीसाठी वापरतात .
बीजप्रक्रिया :-
१ ली. जर्मिनेटर १०० ली.पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये १०० किलो बेणे १० मिनिटे भिजवून नंतर ते सुकवून लावावे.हे द्रावण २ ते ३ वेळा वापरता येते .त्यामुळे कंद लवकर एकसारखे उगवून मर होत नाही.
आंतरमशागत (भरणी करणे):-
हळदीच्या लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी भरणीकरणे अत्यंत अत्यावश्यक आहे.सरीमधीलमाती किंवा लागण केलेय दोन्ही गाड्यांच्या मधील मोकळ्या जागेमधील म्मती १.५ ते २ इंच शिपिच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूंच्या गड्यांना लावणे.म्हणजे भरणी करणे होय.माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी.भरणी केल्यानंतरपिकास हलकेसे पाणी द्यावे.भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंड झाकले जातात व त्यांची चांगली वाढ होते. मात्र याउलट भरणी ण केलायस जमिनीच्या बाहेर आलेल्या हळकुंडा ची वाढ होत नाही. थोडीफार झाली तरी ती निक्रुस्त दर्जाची होते.आणि उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्क्यांनी घात येते.
पाणी व्यवस्थापन :-
हळदीची लागवड एप्रिल मे महिन्यामध्ये होत असल्याने सुरुवातीच्या काळात पावसाची सुरुवात होईपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते . कारण दरम्यानच्या काळात मुळाकडून स्थिरता प्राप्त होणे हा महत्वाचा कालावधी असतो,म्हणून लागवडीनंतर आंब विणाचेपाणी लगेच ४ ते ६ दिवसांच्या अंतराने द्यावे.जमिनीच्या प्रतीनुसार हा कालावधी कमी-जास्त ठेवावा.पावसाला सुरु झाल्यानंतर पावसाचेही पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही.याची दक्षता घ्यावी..पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या २ पाळी मधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे .मात्र पिक काढणीच्या १५ दिवस अगोदर आजीबात पाणी देऊ नये .
खते :-
हळद पिकासाठी खतामधील सर्व घटकांची कमी-अधिक प्रमाणात गरज असते.मात्र हळद पिकासाठी रासायनिक खतेवापरलेल्या हळदीच्या कांदावारती अनिष्ट परिणाम होतो. असा अनुभव शेतकर्यांचा आहे. तेव्हा हळदीला श्यक्य तेवढ्या प्रमाणत सेंद्रिय खतांचा वापर करावा.यामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत एकरी १० टन आणि कल्पतरू सेंद्रिय खत ७५ ते १०० एकरी किलो दिन हप्त्यातून मात्र आणि भार्निच्यावेली अर्धी मात्र आणि भार्निच्यावेली अर्धी मात्राद्यावे.त्याचवेळी हेकॅत्री २०० ते ३०० किलो कारंजी किंवा निवली पेंड द्यावी.आंनी भरणी करून द्यावी या पिकास भरणी नंतर कोणतेही खाते देऊ नयेत.
आंतरपिकाची लागवड :-
मुख्यपिकाशी स्पर्धा ण करता हळद पिकाच्या उत्पादामध्ये वाढ करणाऱ्या आंतरपिकाची निवड करणे अंत्यंत महत्याव्चे आहे. हि पिके हळद पिकपेक्षा उंचीने कमी तसेच पसाऱ्याने कमी जागा व्यापणारी असावीत. हळद पिकाची लागवड केल्यापासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे.येऊन कंद पोसण्यास सुरुवात होते. त्यासाठी हळकुंड येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी होणे फयदेशिओर ठरते म्हणून हळद पिकामध्ये श्रावण घेवडा ,मिरची,कोथिंबीर या पिकांची लागवड करावी. मका हे पिक हळदिमध्ये घेऊ नये.कारण माक्यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये १५ ते २० टक्के घात येते.
फवारणी :-
१)पहिली फवारणी :(जूनमध्ये ):हलाद १ महिन्याची असताना जर्मिनेतर २५० मिली.अधिक थाइवर २५० मिली.अधिक क्रॉपशाईणर २५० मिली अधिक प्रोतेक्टेट १०० ग्रम अधिक प्रिझम २५० मिली अधिक हार्मोनी १०० मिली अधिक १०० ली.पाणी.
२)दुसरी फवारणी :(ऑगस्टमध्ये ):-
जर्मिनेतर ५०० मिली अधिक थाइवार अधिक क्रॉप शाईनर ५०० मिली अधिक राईपणर २५० मिली अधिक न्यूट्रोटोन २५० मिली अधिक हार्मोनी २५० मिली अधिक १५० ली.पाणी.
३)तिसरी फवारणी:(सप्टेंबरमध्ये ):
थ्राइवर ५०० मिली अधिक क्रॉप शाईनर ५०० मिली अधिक राईपणर २५० मिली अधिक न्यूट्रोटोन २५० मिली अधिक हार्मोनी २५० मिली अधिक १५० ली.पाणी.
४)चौथी फवारणी :(ऑक्टोंबर मध्ये ):
थ्राइवर १ ली अधिक क्रॉप शाईनर १ ली अधिक राईपणर ७५० मिली अधिक न्यूट्रोटोन ७५० मिली अधिक हार्मोनी ३५० ते ५०० मिली अधिक २०० ते २५० ली.पाणी.
साप्तमृत हार्मोनी फवारण्याचे फायदे: पहिल्या पाह्वारानिमुळे उगवून आलेल्या कोम्बाची मरहोत नाही. तसेच रोगापासून संरक्षन होऊन वाढ चालू होते दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीमुळे हळदीच्या फुटावा होऊन पाने रुंद चमकदार आणि तजेलदार तयार होतात तसेच कंद वाढीस लागून हळद लागत नाही.तिसऱ्या फारावारानिमुळे कंद पोसून फान्यांची संख्या आकारात वाढ होऊन एकंदरीत उत्पादन व दर्जात वाढ होते.
जर्मिनेतर पिझाम मध्ये हळदीची वाढ झपाट्याने होऊन मार किंवा हळद लागणे यावर प्रतिबंद होतो. थ्राइवर ,क्रॉप शाईनर,हार्मोनी मुळे पानांवर करपा ,ठिपके येत नाहीत,तसेच वेडीवाकडी पाने सरळ व टवटवीत होतात,धो धो पाऊस धुक्याचा त्रास होत नाही . राईपनर , न्यूट्राटोनमध्ये हळदीच्या फानीची संख्या , आकार , वजन व गार वाढून गर्द रंगाची दर्जेदार हळद उत्पादन घेता येते .
काढणी : हळद लागवडीमध्ये अतिशय महत्वाची आणि शेतकरी बंधूंना खऱ्या अर्थाने क्लिष्ट वाटणारी बाब म्हणजे काढणी होय . चांगल्या उत्पादन देणाऱ्या हळद पिकाची काढणी ८.५ ते ९ महिन्यांनी करावी . पक्क झालेल्या हळद पिकाच्या झाडाला पाला जमिनीच्या मगदुरानुसार पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ६० ते ८० टक्केच वाळला जातो . अशावेळी झाडाचा पाला जमिनीलगत धारदार विळ्याने कापून घ्यावा . त्यानंतर जमीन थोडशी भेगाळून घ्यावी आणि कुदळीच्या सहाय्याने हळद काढणी करावी . काढणी करताना जेठे गड्डे , हळकुंडे , सोर गड्डा अशी प्रतवारी करावी . काढणीनंतर हळकुंडे तसेच बियाणे त्वरित सावलीच्या ठिकाणी हलवावे .
हळद शिजवण वाळविणे व पोलिश करणे :-
हळद शिजवताना सच्छिद्र वापर करून हळद शिजविणे फायदेशीर ठरते . या पद्धतीमध्ये डिझेलच्या बॅरलपासून बनविलेले १.५ फुट उंचीचे व २ फुट व्यासाचे ४ ते ५ सच्छिद्र ड्रम ५ फुट व्यासाच्या मोठ्या कढईमध्ये पाणी ओतून पाण्याची आतील पटली ड्रमच्या उंचीच्या वर ४ ते ५ सेमी इतकी ठेवली जाते . नंतर ड्रम जाड गोणपाटाने झाकून घेतले जातात . या पद्धतीने हळद फक्त २५ ते ३० मिनिटात चांगल्या प्रकारे शिजते . त्यावेळी पाण्याचे तापमान ९० डी . ते १०० डी . सेंटीग्रेट असते . हळद शिजल्यानंतर चुलवनामध्ये इंधन टाकण्याचे प्रमाण कमी केले जाते . त्यामुळे आपोआप पाण्याचे तापमान कमी होते . शिजलेल्या हळदीचे ड्रम लांब बांबूच्या सहाय्याने २ कड्यामध्ये असकून २ व्यक्तींकडून सहाजासाहजी उचलून वाळविण्यासाठी खळ्यामध्ये अथवा कठीण जागेवर टाकावे . असे रिकामे झालेले ड्रम पुन्हा कच्च्या हळदीने भरून काहीलीतील गरम पाण्यात ठेवतात .
पाण्याची पातळी पुन्हा ठेवलेल्या ड्रमवर ४ ते ५ सेमी राहील इतकी ठेवली जाते . ठेवलेले ड्रम वरीलप्रमाणे गोणपाटात झाकतात व परत इंधन टाकून त्याच पद्धतीने हळद शिजविली जाते .
वरील पद्धतीमध्ये एका ड्रगमध्ये सुमारे ५५ ते ६० किलो याप्रमाणे एका वेळी जवळ जवळ २५० ते ३०० किलो हळद शिजविली जाते . प्रत्येक वेळी जुन्या पद्धतीमुळे गरम पाणी काढून टाकणे आणि पुन्हा नवीन पाणी टाकणे हि प्रक्रिया करावी लागत नाही . दुसरे हळद भरलेले ड्रम काहिलीत ठेवलेले असता पाण्याचे तापमान ८३ डी . ते ८४ डी . सेंटीग्रेटपर्यंत खाली येते . त्यामुळे पहिले ड्रम काढल्यानंतर दुसऱ्या घेतलेल्या ड्रममधील हळद शिजविण्याची लागणारे इंधन हे तापमान ८४ ते १०० डी . सेंटीग्रेटपर्यंत वाढविण्यासाठी लागेल इतकेच असते . त्यामुळे इंधनाची बचत होते . तसेच सर्व हळद एकसारखी शिजली जाते . शिजताना पाण्यातील माती हलकुंडावर न बसता काहिलीत जमा होते . त्यामुळे इंधनाची बचत होते . तसेच सर्व हळद एकसारखी शिजली जाते . त्यामुळे मातीविरहित स्वच्छ धुतलेली हळद मिळते . अशा हल्डीस वाळविलयानंतर पोलिश केल्यास आकर्षक रंग प्राप्त होतो आणि उताराही चांगला मिळतो . अशा हळदीची गुणवत्ता चांगली असल्याने बाजारभावही चांगला मिळतो . अशा या वेळ , इंधन व मजुरी यांची बचत करणार्या व किफायतशीर नफा मिळवून देणाऱ्या सुधारित तंत्राचा पारंपारिक पद्धतीत थोडाफार खर्च करून अवलंब नक्कीच फायदा होईल .
हळद वळविणे :-
हळद शिजविल्यानंतर सुरुवातीचे ४ ते ५ दिवस ३ ते ४ इंचापेक्षा मोठा थर देऊ नये . मोठा थर दिल्यास हळकुंड वाळलयास उशीर लागतो . त्याचप्रमाणे हळकुंड काळी पडतात . हळकुंडे साधारणपने ८ ते १० दिवस उन्हात चांगली वळवावी . वाळलेली हळद घ्यावी . हळद शक्यतो तोद्पात्रीवरील किंवा कठीण जागेवरती वाळवावी , त्यामुळे माजुरुवर्ती होणारा खर्च कमी होईल .
उत्पादन :-
हळदीचे उत्पादन हे वापरलेली जात , निरोगी बियाणे , दिलेली खते , जमिनीचा प्रकार यावर अवलंबून असते . सर्वसाधारणपाने ओल्या हळदीचे प्रती हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल ( अधिक २५ ते ३० क्विंटल गड्डे ) इतके उत्पादन मिळते . तसेच या ओल्या हळदीपासून ५८ ते ७५ क्विंटल वाळलेली हळद मिळते .