ढोबळी मिरची:-

प्रस्तावना:-

महाराष्ट्रात पुणे, नाशिक,साताराजिल्यामध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची पक्व असली तरी रंग हिरवीगार असल्याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबली मिरची चविमधील फरक हा मुख्यत्त्वे करून  कॅपिसिंच्या प्रमाणावर अवलंबून असते. ते साधारणत: २ ते ४ टक्केपर्यंतअसते.

हवामान:-

ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तापमान २५ सेल्सिअस व  रात्रीचे १४ सेल्सिअस या पिकास उत्तम तापमान असून तापमान १० सेल्सिअस पेक्षाकमी झाल्यास व ठिपके पडल्यास या पिकास वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

जमीन व हंगाम:-

ढोबळ्या मिरचीची लागवड ऑगष्ट , सप्टेंबर महिन्यात करतात . त्यामुळे फळांची काढणी जानेवारी, फेब्रुवारी या कालावधीत करता येते. ढोबळी मिरचीला जमीन चांगली कसदार व सुपीक लागते. मध्यम ते भारी काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारा जमीन या पिकास योग्य आहे. नदीकाठच्या योग्य पोयट्यांचा सुपीक जमिनी लागवडीस सामू ६ ते ७ च्या दरम्यान असावा.

पूर्वमशागत :- 

ढोबळ्या मिरचीची लागवड रोपे लाऊन करतात यासाठी एक किवा दोन आर क्षेत्रावर रोपवाटिका  करावी. जमीन चांगली उभी आडवी नांगरणी हेक्टरी १५ ते २० तन शेणखत घालावे. पूर्वीच्या पिकांचे धसकटे गोळा करून दोन कुळव्याच्या पाळ्या द्याव्यात.  

वाण:-

कॅलिफोनिया वंडर:-

या जातीचे झाड मध्यम उंचीचे भरत वाढणारे असून मिरची गर्द हिरव्या रंगाची असते. या मिरचीचे साल जड असून फळांना तिखटपणा नसतो. हि उशिरा तयार होणारी जात असून हेक्टरी उत्पादन १२ ते १५ तण मिळते 

अर्का  मोहिनी:-

या जातीची फळे मोठी आणि हिरव्या गडद रंगाची असून फाळाचे सरासरी वजन ८० ते १०० ग्रॅम असते. या जातिचे हेक्टरी उत्पादन २० ते २५ तण असते. 

या जाती यलो वंडर ,भारत आणि इंद्र या सारख्या  मिरचीच्या संकरीत जाती लागवडीस योग्य आहेत. 

बियाण्याचे प्रकार:-

दर हेक्टरी ३ किलो बियाणे लागतील एक किलो बियाण्यास पेरणी करण्यापूर्वी २ ग्रॅम थायरम चोळावे. 

लागवड :-

रोपे तयार  करण्यास निवडलेली रोपवाटीकेची जागा चांगली नांगरून कुळवून तयार करावी.

त्या नंतर तीन मीटर लागवडीसाठी  लांब १ मीटर रुंद व १५ सेमी उंचीचे गादि   वाफे तयार करून वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत घालावे. वाफायांच्या रुंदीला समातर अशा २ सेमी खोलीच्या रेघा ओढून त्यांत फोरेट १० जी हे किटकनाशक १० ग्रॅम प्रत्येक वाफ्यात टाकून बी पेरावे व ते मातीने झाकून टाकावे.व बियाण्यांची चांगली उगवण व्हावी. म्हणून वाफायांना झारीने हलकेसे पाणी द्यावे.बी ६ ते ८ आठवड्याने लागवडीस तयार होते.

पूर्ण लागवड करण्यासाठि ६० सेमी अंतराने सऱ्या काढाव्यात . रोपे सरीच्या दोन्ही बाजूस सरीच्या बगलेत ३० सेमी अंतरावर एका टिकाणी एक रोपे लाऊन करावे. व रोपांना लगेच पाणी  द्यावे.

खते व पाणी व्यवस्थापन :-

हेक्टरी १५ ते २० तन शेणखत व्यतिरिक्त १५० किलो नत्र १५० किलो स्फुरद व २०० किलो पालाश ची आवश्यकता असते. पैकी पालाश व स्पुरद यांचा पूर्ण हप्ता व नत्राचा अर्धा हप्ता लागवडीच्या एक मिहीण्याने व दुसरा हप्ता १५ दिवसांनी द्यावा.

ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्या वाढीसाठी भरपूर व नियमित पाण्याची आवश्यकता असते.फुले व फळे लागताना नियमित पाणी द्यावे.सर्वसाधारणपणे एक आठवड्याचे  अंतराने पाणी द्यावे.

आंतरमशागत :-

ढोबळी मिरची चुरडा मुरडा या रोगास बळी पावडत असते.त्यासाठी मिरचीचा मळा नेहमी स्वच्छ असणे आवश्यक असते. त्यासाठी सुरवातीच्या कळस जरुरीप्रमाणे दोन ते तीन वेळा निंदनी करावी. तसेच झाडांना मातीचा भक्कम आधार ध्यावा.

रोग व किडे:-

रोग

मर

या रोगांमध्ये शेंड्याखालील  भाग वळत जातो.हा रोग फायटोप्थोरा अळीबीच्या प्रकारामुळे होतो.

उपाय:-

रोग ग्रस्त झाडे समूळ नष्ट करावीत व राहिलेल्या झाडांच्या मुळाजवळ ०.६ टक्के तीव्रतेने बोर्डो मीक्षणओतावे. 

बोकड्या

हा व्हायरस रोग असून या विषाणूंचा प्रसार माव्याचा किदिमार्फात रोगट झाडा पासून चंगल्या झाडाकडे होत असतो. या रोगामुळे होत असतो.

या रोगामुळे पाने आखडून झाडांची वाढ खुंटते . झाडांना फुले येत नाहीत. व उत्पन्नावर परिणाम होतो. 

उपाय:-

रोग ग्रस्त झाडे सामुळ उपटून नष्ट करावीत. १ किलो मोनोक्रोतोफाॅस प्रती लिटर पाण्यात या प्रमाणत घेऊन झाडांवर दर १५ दिवसांचेअंतराने नेहमी फवारणी करावी.

 उपटून नष्ट करावीत. १ किलो मोनोक्रोतोफाॅस प्रती लिटर पाण्यात या प्रमाणत घेऊन झाडांवर दर १५ दिवसांचेअंतराने नेहमी फवारणी करावी.

काढणी व उत्पादन :-

फळे हिरवीगार व संपूर्ण वळलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाळलेल्या स्त्री केसरांचा भाग गळून पडलेल्या आसावा. फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते. परंतु यामुळे पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व उत्पादन कमी मिळते. फळे झाडावरून देठासहित काढावीत. साधारणपणे दर ८ दिवसांनी फाळाची काढणी करावी. अशा ४ ते ५ काढणीत सर्वर पिक निघते प्रती हेक्टरी ढोबळ्या  मिरचीचे १७ ते २० टनापर्यंत सरासरी उत्पादन मिळते.