बाजरी :-
बाजरी हे पिक अधिक सहनशील आणि धन्याबरोबरच चारा देणारे पिक आहे . आपत्कालीन पिक व्यवस्थापनामध्ये महत्वाच्या असलेल्या पिकाची खरीपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य होईल .
बाजरी पिकाचे महत्व :-
पाउस उशिरा , अनिश्चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधाण्यापेक्षा अधिक धन्य व चार उत्पादन देणारे हे पिक आहे .
आपत्कालीन पिक व्यवस्थापानामध्ये या पिकला महत्व आहे .
कमी कालावधीत तयार होणारे तृणधान्य पिक असल्यामुळे खरिपानंतर रब्बीची पिके वेळेवर घेता येतात . सोयाबीन , गहू व बटाटा या पिकांमधील सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी या पिकांचा फेरपालटीचे पिक म्हणून उपयोग होतो .
बाजरीपासून तयार केलेले पोल्ट्री फीड , अंडी देणाऱ्या कोंबड्यांना ( लेअर ) दिल्यास अन्द्याम्धील अनावश्यक कोलेस्टेरोलचे (LDL) प्रमाण हे मक्यापासून बनविलेल्या पोल्ट्री फिद्च्या पावरातून उत्पादित अन्द्यामधील प्रमाणापेक्षा कमी असते .
हवामान :-
४०० ते ५०० मी .मी पावसाचे प्रमाण असलेल्या भागात हे पिक घेतात .
उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते .
पिकाची उगवण व वाढ २३ ते ३२ अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते .
पिकाच्या संपूर्ण वाढीच्या काळात स्वच्छ सूर्यप्रकाश अधिक उत्पादनाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे .
जमीन व पूर्वमशागत :-
अधिक उत्पादनासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी . जमिनीचा सामू ६ . ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा .चांगल्या उगवणीसाठी जमीन भुसभुशीत , ढेकळे विरहित व दाबून घटत केलेली असावी . यासाठी अर्धा फुट खोल नांगरट करून दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन शेवटच्या वर्खानिपुर्वी कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे .
पेरणीपूर्वी फळी फिरवून जमीन एकसारखी दाबून घ्यावी म्हणजे पेरणीनंतरच्या जोरदार पावसामुळे बी दडपून उगवणीनंतर विपरीत परिणाम होणार नाही .
बियाणे व बीजप्रक्रिया :-
भरघोस उत्पादनासाठी स्थानिक वानाऐवजी बाजरीचे सुधारित किंवा संकरीत वनाचे बियाणे हेक्टरी ३ ते ३.५ किलो या प्रमाणात पेरणीसाठी वापरावे . अरगट आणि गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे . बियाणे पेरणीपूर्वी २० टक्के मिठाच्या द्रावणात ( १० लिटर पाणी अधिक २ किलो मीठ ) टाकावे . त्यात वर तरंगणाऱ्या बुरशी पेशी व हलके बी काढून त्याचा नाश करावा , राहिलेले बी काढून त्याचा नाश करावा , राहिलेले बी स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळवावे . मेतेलाक्झील या रसायनाची बीजप्रक्रिया ( ६ ग्राम प्रती किलो बियाणे ) या प्रमाणात करावी . या सर्व प्रक्रियेनंतर एझोस्पिरीलीयाम व पीएसबी हे जीवाणू सावर्धक २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे या प्रमाणात गुळाच्या द्रावणात ( २५० ग्राम गुल अधिक १ लिटर पाणी ) एकत्र करून बियाण्यास चोळावे व सावलीत सुकवून ४ ते ५ तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे .
पेरणी :-
पावसाळा सुरु झाल्यावर ७५ ते १०० मि. मी . पाउस झाल्यास पेरणी करावी . खरीप बाजरीची पेरणी १५ जून ते १५ जुलाई या कालावधीत जमिनीत चांगली ओळ असताना दोन ओळींत ४५ सेमी तर दोन रोपांत १२ ते १५ सेमी अंतर राहील अशा बेताने करावी . पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभारीने ( तिफन ) करावी म्हणजे रासायनिक खते बियाण्यासोबत व बियाण्याच्या खाली दिल्यामुळे त्यांची उपयुक्तता वाढून चांगले उत्पादन मिळते . बाजरीची पेरणी दोन ते तीन सेमी पेक्षा जास्त खोल करू नये . अन्यथा , यापेक्षा खोलीवर केल्यास उगवण कमी प्रमाणात होते . यासाठी पाभरीच्या फनास टोकाकडे कापडाची चुंबळ बांधावी म्हणजे पाभारीचे फण जमिनीत जास्त खोल जाणार नाही व बियाणे अपेक्षित खोलीवर पेरले जाईल . आपत्कालीन परिस्थितीत उशिरात उशिरा ३० जुलाईपर्यंत बाजरी पिकांची पेरणी करता येते .
खत व्यवस्थापन :-
अधिक उत्पादनासाठी दहा किलो झिंक सल्फेट प्रती हेक्टरी पूर्वमशागतीच्या वेळेस जमिनीतून द्यावे . स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फोस्फेत्मधून दिल्यास पिकास काल्शियम व सल्फर हि अतिरिक्त सूक्ष्म अन्न्द्रव्येही मिळतात . ( माती परीक्षणानुसारच रासायनिक खते द्यावीत . )
आंतरमशागत :-
पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी गरजेनुसार विरळणी करावी किंवा नंग्या भरून दोन रोपांतील अंतर १२ - १५ सेमी ठेवावे . जमिनीत चांगली ओळ असल्यास विरळणी केलेली रोपे नंग्या भरण्यास वापरता येतात . तीस ते चाळीस दिवसापर्यंत पिक ताणविरहित राहण्यासाठी खुरपणी किंवा डवरणी करावी . एक महिन्यानंतर पिकास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा . कोरडवाहू पिकास युरिया देताना चांगली ओळ असणे गरजेचे आहे .
हंगाम - मध्यान्ह - उपाययोजना :-
चांगल्या उगवणीनंतर मधल्या काळात पावसाचा खंड पडला तर मृद्बाश्पाची गरज भागविण्यासाठी डवरणी करून जमिनीचा वरचा पापुद्रा मोकळा करावा . यालाच डस्ट मल्चिंग म्हणतात . पिकातील काढलेले टन दोन ओळींत पसरून ठेवावे . डवरणी करताना दाव्र्याला खाली दोरी बांधल्यास पिकाला मातीची भर बसेल व पडणाऱ्या पावसाचे पाणी तयार झालेल्या सरीमध्ये व्यवस्थित मुरले जाऊन त्याचा उपयोग पिकाच्या पुढील वाढीच्या काळात होतो .
पाणी व्यवस्थापन :-
बाजरी पिकास फुटवे येण्याची वेळ , पिक पोटरी अवस्थेत असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे . या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओळ नसल्यास पिकास संरक्षित ओळीत म्हणून पावसाचा अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावे .
आंतरपीक :-
अन्नाद्रव्यासाठी व जागेसाठी स्पर्धा नसलेला कालावधी या तत्वानुसार बाजरी तूर हि आंतरपीक पद्धती सर्व दृष्टीने फायदेशीर आहे . यासाठी बाजरी व तूर यांची आंतरपीक म्हणून पेरणी करताना याचे ओळीचे प्रमाण २ : १ ( बाजरी : तूर ) किंवा ४ : २ ठेवावे या प्रमाणेच बाजरीत सोयाबीन , सुर्यफुल हि पिकेसुद्धा ४ : २ या प्रमाणात आंतरपीक म्हणून घेता येतात . हलक्या जमिनीत आणि कमी पाउस असणार्या प्रदेशात बाजरी अधिक मटकी २ : १ या प्रमाणात आंतरपीक अवलंब करावा .
तननाशकाचा वापर :-
गरजेनुसार बाजरी पिकात तननाशकाचा वापर करता येतो . यासाठी एट्राझिन किंवा सिमाझीन हे उगवनपूर्व ( पेरणीनंतर परंतु बी उगवण्यासाठी ) तननाशक हेक्टरी १.५ ते २ किलो ६०० ते ७०० लिटर पाण्यासोबत फवारावे . फवारणी नंतर १५ ते २० दिवस पिकात खुरपणी किंवा डवरणी करू नये . तसेच पेरणीनंतर २५ ते ३० दिवसानी २ , ४ - डी ( फक्त सोडीअम साल्ट ) हे उगवणपश्चात तणनाशक हेक्टरी १२५० ग्राम या प्रमाणात ६०० लिटर पाण्यासोबत ताणावर फवारावे . तणनाशक फवारणीपूर्वी ताज्न्ह्याचा सल्ला अवश्य घ्यावा .