गहू :-
गहू एक महत्वाची रबी धन्य आहे,जायची भारतात एकूण अन्नधान्य उत्प्दानाचा जवळपास ३ टक्के भागीदारी आहे.यद्यपि येथे अनेक जाती आहेत .
जमीन:-
गहू पिकासाठी चांगल्या निचऱ्याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे.जिरायत गहू ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी जमिनीतच घ्यावा.
पेरणीची वेळ:-
जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातकरावी.बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबर च्या पहिल्या पंधरवड्यातपूर्ण करावी.त्यासाठी जमिनीची पूर्व मशागत करून जमीन तयार ठेवावी .
पेरणी :-
पेरणी दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० से..मी ठेउन करावी बी ५ते ६ से.मी.पेक्षा जास्त खोल पेरू नका .
उभी आडवी पेरणी करू नेये .एकेरी पेरणीमुळे आतंर मशागत करणे सुलभ होते.पेरणी श्यकतो. दोन चाडी पाभरीने करावी.म्हणजे पेरणीबरोबरच रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल .
जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ३.० मीटर रुंदीचे सारे पडावेत व आडव्या दिशेने पाट पडावेत.
उतारानुसार २.५ ते ३.० मीटर रुंदीचे सारे पडावेत व आडव्या दिशेने पाट पडावेत.
बियाणे:-
गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे.यासाठी नोव्हेंबर पेरताना हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे .
उशिरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे आणि पेरणी १८ से.मी.अंतरावर करावी.
जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे व २२.५ से.मी.अंतरावर पेरणी करावी.
आंतरमशागत:-
पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत ताणाचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदन करावे.रुंद पाणी तणांच्या बंदोबस्तासाठी २,४-डी या तणनाशकाची प्रतिहेक्टरी १ किलो क्रीयाशील मूलद्रव्ये ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.हि फवारणी करावी.हि फवारणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी करावी.
खते:-
हेक्टरी २५ ते ३० गाड्या वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र,६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.निम्मे नत्रव संपूर्ण स्फुरद व पालाश पेरानिचे वेळी पेरून द्यावे.उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे.
उशिरा पेरणीसाठी हेक्टरी ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश हि खते वरीलप्रमाणे दोन हप्त्यात द्यावे. जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्रआणि २० किलो स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंची २५० ग्राम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
पाणी व्यवस्थापन :-
बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी-जास्त असू शकतात पाण्याचा साठा एकाच पाणी देण्या इतका उपलब्ध असेल,तर पेरानिनंतर ४० ते ४२ दिवसांनी पाणी द्यावे.पाण्याचा साठा दोन पाणी देण्याइतका उपलब्ध असेल,तर फाहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवासांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. पाण्याचा साठा तीन पाणी देण्याइतका उपलब्ध असेल,तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी देसरे पाणी ४२ ते ४५ दिवसांनी आणि तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. तथापि ,गहू पिकाच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत,त्या वेळी,पिकास पाणी देणे फायद्याचे आहे.त्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे :
पिकवाढीची अवस्था पेरणी नंतरचे दिवस :-
मुकुट फुटण्याची वेळ १८ ते २१कांडी धरण्याची वेळ ४० ते ४५
पिक ओंबीवर येण्याची वेळ ६० ते ६५
दाण्यात चिक भरण्याची वेळ ८० ते ८५ गव्हावरील किडीचे एकीकृत व्यवस्थापन
महाराष्ट्रात गव्हाची लागवड दोन प्रकारे करण्यात येते. जिरायत पद्धत व बागायत पद्धत म्हणून गहू आपल्या भागातील रबी हंगामात एक महत्वाचे अन्न धन्याचेपिक आहे. या पिकावर अनेक किडीची नोंद करण्यात आळी असली तरी आपल्या विभागात या पिकावर मुख्यात:खोड किडी ,तुडतुडे ,मावा वाळवी,इत्यादी व प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो.त्याची व्यावस्थापनाबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
खोड किडा:-
या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व गावाती रंगाचे असतात पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे २ - ३ सेमी असून तिचा रंग गुलाबी असते . टी अंगाने मु आणि डोके काळे असते . या किडीच्या प्रादुर्भावाने वाढणारा मधला भाग सुकून जातो . या खोडात शिरून खालीलास भागावर उपजीविका करते . त्यामुळे रोपे सुकून जातात . व त्यांना ओम्ब्या येत नाही .
या किडीचे नियंत्रणासाठी उभ्या पिकातील किडग्रस्त झाडे आठवड्याचे अंतराने २ - ३ वेळा मुळासकट उपटून नाश करावा . तसेच पिकाखाली फवारणी झाल्यावर उपद्रवग्रस्त शेतातील धसकटे एकत्र करून जाळावीत . उभ्या पिकात पिक पोटरीवर येण्याचे सुमारास हेक्टरी २ किलो कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळून भुक्ती ५०० लिटर व्पाण्यात मिसळून करावी .
तुडतुडे : -
हे कीटक आकाराने लहान व पाचरीच्या आकाराचे असतात . त्यांचा रंग हिरवट राखाडी असतो . तुडतुडे व त्यांची पिल्ले पानातून रस शोषण करतात . त्यामुळे पाने पिवळी पडून टी वाळू लागतात . त्यामुळे पाने पिवळी पडून ती वाळू लागतात व पिकांची वाढ खुंटते . या किडीचे नियंत्रणासाठी ( प्रादुर्भाव दिसून आल्यावर ) डायमेखोएट ३० टक्के प्रवाही ३०० प्रवाही ४०० मिली किंवा पेन्थिओन ५० टक्के २०० मिली . किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १ किलो प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात विरघळवावी . आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी / धुरळणी १५ दिवसांनी वरीलप्रमाणे करावी .
मावा :-
गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसून येतो . एकाचा रंग पिवळसर तर दुसर्याचा रंग हिरवा असते . हेकीटक लाब व वर्तुळाकार असते या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातून व कोवळ्या शेंड्यातून रस शोषण करतात . तसेच आपल्या शरीरातून मधासारखा गोडव चिकट पदार्थ सोडतात . व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते . या किडीचे नियंत्रण तुडतुड्या प्रमाणे करावे .
वाळवी किंवा उधई
हि कीड सर्वांच्या परिचयाची आहे व या किडीचा प्रादुर्भाव पिक वाढीच्या अवस्थेत दिसून येतो . हि कीड गव्हाच्या रोपाची मुले खाते . व त्यामुळे रोपे वाळतात बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारुळे खणून काढावीत . व त्यातील राणीचा नाश करावा . वारूळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट केल्यानंतर मध्यभागी सुमारे ३० सेमी खोलवर एक छिद्र करावेत आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे कीटकनाशक १५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून वारुळात वापरावे .
वरील औषधाचे मिश्रण ५० लिटर एका वरुलासाठी पुरेसे होते . किंवा क्विनडलफॉस ५ दाजानेदार किंवा फोरेट १० टक्के दाणेदार किंवा कार्बोफ्युरोन ३ टक्के दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे . अथवा शेनखताबरोबर द्यावे .
उंदीर
उंदीर गव्हाचे फुटवे व ओम्ब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात . उन्दिरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिशांचा वापर करावा . हे आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरड ४९ भाग थोडे गोडे तेल व १ भाग झिंक फोस्फाइड किंवा ब्रोमाडीऑलोन एकत्र मिसळावे . चमचाभर ( अंदाजे १० ग्राम ) विषारी आमिष प्लाष्टीकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे .