ज्वारी :- 

ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ब्ते मुख्य पिक आहे .  समुद्र किनार्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र , विशेषतः दक्षिणेकडील भागात , धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते . ज्वारी ज्या भागात पिकविली जाते . त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे . ज्वारीमध्ये तांदळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते . 

पृथक्करन :- 

ज्वारीच्या दाण्याचे प्रमुख घटक सर्वसामान्यपणे पुढील प्रमाणे आहेत . जलांश ११.९  टक्के , प्रथिन १० .४ टक्के , कार्बोहायड्रेड ७२.६  टक्के , वसा १.९ टक्के , लवने १.६ टक्के . ज्वारीतील प्रथिन गव्हातील प्रथीनपेक्षा जैवमुल्ल्याचा दृष्टीने श्रेष्ठ आहे ; परंतु प्रथिन , व जीवनसत्व व लवणे यांचा एकत्रित विचार केला असता ज्वारी गव्हापेक्षा कमी दर्जाची ठरते .

हवामान :- 

विशूववृत्तापासून ४५  अक्षन्शापर्यंत या पिकाची लागवड होते . आफ्रिका , आशिया , उ अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडाच्या उष्ण हवामानात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते . या पिकाला साधारणतः २७ सेल्सिअस ते ३२ से . तापमान लागते , परंतु काही प्रकार ३८ ते ४४ से. तापमानातही वाढू शकतात . हिवाळी हंगामातील प्रकारांना १६ से . पर्यंत किमान तापमान चालते . सर्वसाधारणपणे हे पिक सपाट प्रदेशात वाढणारे आहे . परंतु कर्नाटकात काही प्रकार ९०० मी . उंचीवरील प्रदेशातही लागवडीखाली आहेत वार्षिक ५० ते १०० सेमी पर्जन्याच्या प्रदेशात ज्वारीचे पिक चांगले येते . ३० ते ४५ सेमी वार्षिक पर्जन्याच्या विभागात दुर्जल शेती पद्धतीनुसार ज्वारीचे पिक घेतात . यापेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात ओलिताखाली ज्वारीचे पिक घेतात . 

जमीन :- 

ज्वारीचे पिक अगदी रेताड व चोपण जमिनी सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या , मध्यम काळ्या अगर दुमट जमिनित चांगले येते . काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी ( अल्कलाइन ) जमिनीत व pH मूल्य ५.५ असेपर्यंत आम्लीय जमिनीतही हे पिक वाढू शकते . 

फेरपालट :- 

ज्वारीच्या पिकाच्या बाबत पिकांच्या फेरपालटीची आवश्यकता असते . त्याकरिता ज्वारीच्या पिकाची कडधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट करणे जास्त उपयुक्त ठरते . फेरपालटीमुले जमिनीच्या एकाच पातळीवरील वनस्पतीपोषक द्रव्यांचे शोषण होत नाही . मुले खोलवर जाणाऱ्या पिकानंतर ज्याची मुळे जास्त खोलवर जात नाहीत . असे पिक त्याच जमिनीत लावल्यास दोन्ही पिके चांगली येतात . कडधान्याच्या मुलांवरील गाठीमुळे त्या त्या पिकाखालच्या जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढून नंतरचे त्याच शेतातील ज्वारीचे पिक चांगले येते . उत्तर भारतात बार्ली , गहू अगर भात व वाटण्यानंतर ज्वारी पेरतात . मद्य व दक्षिण भारतात कापूस अगर कडधान्याच्या पिकाबरोबर ज्वारीच्या पिकाची फेरपालट करतात . बागायती ज्वारीची फेरपालट मिरची , तंबाखू भुईमुग वगैरे पिकांबरोबर करतात . 

मिश्रपिक :- 
ज्वारीचे पिक मिश्रपिक म्हणून अगर स्वतंत्रपणे घेतात . उत्तर व मद्य भारतात ते तूर , जवस अगर करडीईबरोबर आणि महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्यांच्या काही भागात चवळी , तूर , उडीद , मुग , मटकी अगर कुळीथबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात . काही शेतकरी ज्वारीबरोबर गावर अन्म्बाडीचेही पिक घेतात . रबी ज्वारीत हरभर्याचे मिश्रपीक घेतात . 

मशागत :- 

या पिकाकरीता जमीन दर वर्षी नांगरित नाहीत . तीन - चार वर्षातून एकदा  नांगरली तरी चालते . मी महिन्यात दोन - तीन वेळा १० - १२ सेमी खोलीपर्यंत जमीन कुळवाणे मोकळी करतात . 

हंगाम आणि पेरणी पद्धती :- 
एकून हंगाम तीन असतात . पावसाळी ( खरीप ) , हिवाळी ( रबी ) व उन्हाळी . पावसाळी हंगामातील जाती जून - जुलैमध्ये व हिवाळी हंगामातील जाती सप्टेंबर - ऑक्टोंबरमध्ये पेटत . खरीप व रबी पिके दाने आणि वैरणीसाठी लावतात . पिक लावण्याचे जिरायत ( कोरडवाहू ) व बागायत ( ओलीताखालाचे पिक असे दोन प्रकार आहेत . जिरायत पिकाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत . 

स्थानिक रूढ पद्धत :- 
जमिनीत पुरेशी ओळ झाल्यावर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे जमीन चांगली भिजून वाफसा आल्यावर पाभरीने बी पेरतात . 

दुर्जल  शेती पद्धत :- 
यात पावसाचे पाणी शक्य तितके मुरवून नंतर जमिनीची मशागत करून पाभारीच्या दोन फनांत  ४५ सेमी अंतर ठेवून बी पेरतात . 

टोकन पद्धत :-
जमिनीत पुरेशी ओळ होऊन वाफसा आला म्हणजे ४५ * ४५ सेमी अंतरावर  सरळ ओळीत ५ - ६ सेमी खोल ( ओळीपर्यंत ) भोके पाडून त्यांमध्ये प्रत्येकी ६ - ८ ज्वारीचे दाणे टाकून ओल्या मातीने ती भोके झाकून टाकतात . बी उगवल्यानंतर बी विरळनीच्या वेळी प्रत्येक तोकांनीच्या जागी दोन - तीन जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटतात . खरीप पिकात दोन ओळींमधील अंतर ३० - ४५ सेमी आणि रबी ( कोरडवाहू आणि बागायती ) पिकांच्या बाबतीत ते ४५ सेमी . ठेवतात पेरणीसाठी निवडक बी वापरतात . त्यासाठी बी चालून पाखडून घेतात . पिकात पुढे क कवकीय ( बुरशीसारख्या हरीतद्रव्य वनस्पतीमुळे होणारी ) रोग उद्भव नयेत म्हणून पेरण्यासाठी बियांना पारायुक्त कवकनाशक अथवा गंधक चोळून घेतात . त्याचप्रमाणे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारलेल्या प्रकारचे बी वापरणे आवश्यक ठरते . धान्याच्या पिकासाठी हेक्टरी ९ - १० किग् आणि वैराणीच्या पिकासाठी ५० - ६० किग्र . बी पेरतात . 

आंतरमशागत :- 
पेरणीनंतर ( अगर बी तोकाल्यानंतर ) सु . तीन आठवड्यांनी पिकला कोळपणी दे४तत . निंदनी करून ओळीतील टन काढून घेतात . पुढे तर पंधरा दिवसांनी कोळपणी देतात. पिकात टन वाढू देत नाहीत . कोळपणीमुले जमीन भेगाळत नाही , पिकाच्या मुलांना हवेचा पुरवठा होतो . एकून ३ -० ४ कोळपण्या व दोन तीन खुरपण्या देतात . दुष्काळी अगर कमी पावसाच्या विभागात अकोला कोळपण्यासारख्या कोलाप्याने कोळपणी करतात . 

खत :- 
वार्षिक ७५ ते ८२ सेमी पाउस पडणाऱ्या क्षेत्रात ज्वारीच्या कोरडवाहू पिकाला हेक्टरी ६ टन आणि बागायती पिकाला १२ ते १८ टन शेणखत अगर काम्पोष्ट पूर्व मशागतीच्या वेळी देतात . हेक्टरी ८० किग्र . नायट्रोजन मिळेल असे कोणतेही रासायनिक खात आणि १९० किग्र . सुपरफोस्फेट पेरणीच्या वेळी देतात . निरनिराळ्या प्रयोगावरून असे आढळून आले आहे कि , हेक्टरी २० ते ४० किग्र . पेक्षा फोस्फेरिक आम्ल दिल्यास भारतातील स्थानिक प्रकारच्या उत्पन्नात वाढीव खताच्या प्रमणात वाढ होत नाही . मात्र संखारीत ( हायब्रीड ) ज्वारीच्या प्रकरण जास्त खत दिल्यास स्थानिक जातींच्या तुलनेने जास्त उत्पन्न येते . निरनिराळ्या राज्यांतील बागायत आणि कोरडवाहू तसेच स्थानिक आणि संकरीत प्रकारासाठी रासायनिक खतांच्या वेगवेगळ्या मात्रा प्रयोगांती ठरविण्यात आल्या आहेत . बागायती पिकला कोरडवाहू पिकापेक्षा जास्त आणि स्थानिक प्रकारापेक्षा संकरीत प्रकरण जास्त खतांची मात्रा ठरविण्यात आली आहे . महाराष्ट्रासाठी कृत्रिम खतातील घटकाचे भेक्टोरी प्रमाण खालील कोष्टका मध्ये दिल्याप्रमाणे शिफारस करण्यात आले आहे . 

पिकाची राखण :- 
ज्वारीच्या दाण्यासाठी लावलेल्या पिकाचे पक्ष्यापासून संरक्षण करणे आवश्यक असते . पिकाच्या दाने भरलेल्या कणसावर चिवळ , भोरड्या , चिमण्या वगैरे जातींची पाखरे मोठ्या थव्याने सकाळी व संध्याकाळी उतरतात आणि कणसातील दाने टिपून खून पिकाचे नुकसान करतात , म्हणून टी पिकावर उतरल्याबरोबर पिकातून हाकलून द्यावी लागतात . 

काढणी :- 
ज्वारीचे पिक तयार व्हावयाला सु . पाच महिने लागतात . पिक काढणीलायक होण्याच्या आधी २० - २५ दिवस त्याच्या तातांवरील खालची बुन्ध्याकडची दोन - चार पाने काढून  घेतल्यामुळे पिकात हवा खेळती राहून अकार्यक्षम पानांमध्ये जाणारा अन्नरस वाचून त्याचा ताटाला उपयोग गौण कणसात दाने चांगले भरतात . नंतर पेंढ्या बांधून त्या खाल्यावर रचून ठेवतात . 

मळणी :- 
कणसे पूर्ण वाळल्यानंतर पेंढ्या खळ्यात पसरून ताटांवरची कणसे कापून घेऊन ती खळ्यात पसरून बैलांची पात धरून अगर त्यांच्यावरून बैलगाडी हाकून ती चोलावतून माळून त्यांच्यातले दाने मोकळे करतात . खळ्यातल्या कणसांच्या थरावरून दगडी रूळ चालवूनही मळणीने काम लवकर आणि सुलभतेने करून घेता येते . हल्ली संपूर्ण मळनीचे काम शक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने थोड्याच वेळात करता येते व अशा प्रकारच्या मळणी यंत्राची उपयुक्तता शेतकऱ्यांना पटल्यामुळे या यंत्राचा वापर वाढत्या प्रमणावर होत आहे . मळणी व उफांनी हि दोन्ही कामे एकाच यंत्रात होतात . एका तासात ८ ते १२ क्विंटल ज्वारीची मळणी होते . 

उत्पन्न :- 
जमिनीचा दर्जा पर्जन्यमान ( अथवा पाणी पुरवठ्याची साधने ) , खताची मात्रा आणि मशागत यावर ज्वारीचे उत्पन्न अवलंबून असते . त्यामुळे गावोगावी त्यात फरक आढळतो . १९६८ - ६९ ते न१९७२ - ७३ या पाच वर्षाच्या काळात ज्वारीचे भारतातील सरासरी हेक्टरी उत्पन्न सर्वसाधारणपणे ४०० ते ५०० किग्र असते व दाण्याच्या तीन ते साडेतीन पट कडब्याचे उत्पन्न मिळते कोरडवाहू रबी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी ६५० ते ७५० किग्र असते व दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते . बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न १,२०० ते १,८०० किग्र असते . भारी जमिनीत ते हेक्टरी ४,००० किग्र पर्यंतही असते . ओल्या वैरणीचे उत्पन्न हलक्या जमिनीत हेक्टरी २० टन आणि भारी जमिनीत ३० ते ३५ टन मिळते . 

उपयोग :- 
नेहमीच्या आहाराचा एक प्रमुख भाग म्हणून ज्वारीचा भारतात , विशेषतः कमी पर्जन्यमान भागात उपयोग करतात . शिवाय कणसे काढून घेतल्यावर राहिलेली वाळलेली ताटे ( कडबा ) यांचा जनावरांना वैरण म्हनुंनाही उपयोग होतो . दाण्याचे पीठ करून त्याच्या भाकरी करतात . अथवा लाह्या , हुरडा व लापशी या स्वरूपातही दाण्याचा वापर करतात . पावासाठी गव्हाच्या पिठात ज्वारीचे पीठ २५ टक्के पर्यंत मिसळून वापरता येते . तासेव्च दाण्यातील स्तर्चापासून किनवाने ( आंबवून ) एथिल अल्कोहोल , सिटोन व ब्युटील अल्कोहोल तयार करतात . ज्वारीच्या स्टार्च मक्याच्या स्तर्चाप्रमाणे असून त्याचा खाद्य पदार्थाचा उद्योगात आणि कापडधंद्यात खलीसाठी उपयोग होतो . वॅकसी सोर्घम नावाच्या ज्वारीच्या प्रकारापासून पाकिटे व तिकिटे चीकटविण्यासाठी आसंजक ( चिकट पदार्थ ) तयार करतात . मिलो आणि काफिर या ज्वारीच्या प्रकारापासून साबुदाण्यासारखा पदार्थ आणि ज्वारीचे पोहे तयार करतात . 

ज्वारीच्या काही प्रकारच्या तुसंत लाल रंगद्रव्य असते आणि त्याचा चामद्याला रंग देण्यासाठी इजिप्त आणि भारतात उपयोग करतात . 

ज्वारीच्या तातांपासून रासायनिक कृतीने तयार केलेला लगदा आणि लाकडापासून तयार केलेला लगदा यांच्या मिश्रणापासून लिहिण्याचा वृत्तपत्राचा आणि वेष्टनाचा कागद तयार करतात . 

ज्वारीच्या दाण्यांत ऱ्हायझोपास निग्रीक्स या कवकाचा एक प्रकार काही विशिष्ट परीस्तीतीत वाढतो . अशा प्रकारची कवकामुळे दुषित झालेली ज्वारी खाण्यात आल्यास त्याचे अनिष्ट परिणाम म्हणजे तहान लागणे , बहुमुत्राता , भूक मंद होणे , थकवा येणे हि लक्षणे दिसून येतात . महाराष्ट्रात काही अशा रोगाची साथ पसरली होती . 

वैरण :- 
फुलावर आल्यावर ज्वारीची ताटे कापून टी ओळी वैरण म्हणून अथवा मुरघास करून जनावरांना खाऊ घालतात . फुलावर येण्यापूर्वी ओळी वैरण जनावरांना खाऊ घातल्यास त्यातील धुरीण या सायनझाड वर्गातील विषारी पदार्थामुळे विषबाधा होऊ शकते . लक्षणे सायनईड विषबाधेची असतात व त्वरित उपचार ण केल्यास जनावर मृत्युमुखी पडते . पिक फुलावर आल्यावर धुरीनाचे प्रमाण फारच अल्प असते . कडबा उन्हात वळविल्याने अथवा ओल्या वैरणीचा मुरघास केल्याने राहिलेले अल्प प्रमाणातील धुरीण नाहीसे होते . बागायती पिकात कोरडवाहू पिकापेक्षा धुरीनाचे प्रमाण कमी असते ; तसेच खोडामध्ये ते पानांपेक्षा कमी असते .