ऊस 

सन २०१२ - १३ मध्ये भारतातील ऊस पिकाखालील एकून क्षेत्राच्या ( ५० .६३ लाख हे ) १५ .८० टक्के क्षेत्र ( ८.०० लाख हे ) महाराष्ट्र राज्यात झाले होते . देशातील एकून ऊस उत्पादनाच्या ( ३६१०  लाख टन ) १९.३९ टक्के उत्पादन ( ७०० लाख टन ) महाराष्ट्र राज्यात होते . राज्याची दर हेक्टरी उत्पादकता ( ८७.५ टन / हे ) हि राष्टीय उत्पादक्तेपेक्षा ( ६६.१० टन / हे ) जास्त होती राज्याच्या सरासरी साखर उतारा ११.४० तक्के४ होता . हा राष्टीय सरासरी उतार्यापेक्षा ( १०.२५ टक्के ) जास्त होता . 

लागवडीचा हंगाम 
सुरु - १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी , 

पूर्वहंगामी - १५ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर , 

आडसाली - १५ जुलाई ते १५ ऑगष्ट 

असे ऊस लागवडीचे हंगाम ऊस उत्पादकता व साखर उताऱ्याच्या दृष्टीने योग्य आहेत . 

जातींची निवड 
महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी अंतर्गत ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था (व्ही . एस . आय ) मांजरी , पुणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत अधिक ऊस उत्पादन आणि चांगला साखर उतारा असणाऱ्या अनेक जाती प्रसारित न्केल्या आहेत . तथापि सध्या को . ८६०३२ ( नीरा ) , को ९४०१२ ( फुले सावित्री ) को . एम . ०२६५ ( फुले २६५ ) , को ९२००५ आणि को . सी ६७१ या मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असणार्या जातींची प्रामुख्याने निवड करावी . 

जमीन आणि लागवड 
उसासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी . उभी आडवी  नांगरट , कोलावणी इ . मशागत करून चांगली भुसभुशीत करावी . 

लागवड 
उसाची लागवड करताना मध्यम जमिनीसाठी दोन सऱ्यातील अंतर १०० ते १२० से .मी . व भारी जमिनीसाठी १२० ते १५० सेमी ठेवून सरीचा लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी . पत्ता पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी ७५ - १५० सेमी व भारी जमिनीसाठी ९० - १८० सेमी पद्धतीचा अवलंब करावा . एक डोळा पद्धतीने लागण करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सेमी ठेवावे . शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी . डोळा वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकून पाणी द्यावे किंवा ऊस लागणीपूर्वी सरीत हलकेसे पाणी सोडावे व वाफश्यावर कोळी घेऊन लागण करावी . दोन टीपरयामधील अंतर १५ ते २० सेमी ठेवावी यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल . मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी . लागणीसाठी भारी जमिनीसाठी एकरी १० ,००० व मध्यम जमिनीसाठी १२,००० टिपरी लागतात . 

एक डोळा रोपांपासून ऊस लागवड 
संशोधन केंद्रे आणि काही खाजगी नर्सरीमधून आता उसाची रोपे विक्रीस उपलब्ध आहेत . प्लास्टिक ट्रेमध्ये कोकोपिट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण ३० ते ४० दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात . यासाठी ९ ते १० महिने वयाचे चांगल्या बेनेमळ्यातील शुध्द , निरोगी बेने रोपे तयार कर्न्यसथी वापरावे . ऊस बेने लागणीपूर्वी १०० लिटर पाणी अधिक ३०० मिली . मेलाठीओन अधिक १०० ग्राम बाविस्टीनाची १० मिनिटासाठी बेने प्रक्रिया करावी . यामुळे बुरशीजन्य रोग खवले किडीचा बंदोबस्त होतो . असेटोबाक्टोर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू खताचे प्रमाण अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात उसाच्या टिपऱ्या ३० मिनिटे बुडवून लागण करावी . त्यामुळे नत्राची ५० टक्के बचत होते . एक महिन्याच्या रोपांना  सूक्ष्म निरोगी ऊस रोपे निवडून घेता येतात . निकृष्ट रोपे लागवडीस ण वापरल्याने शेतात सर्वत्र एकसारखे उसाचे पिक वाढते , एकरी उसाची संख्या ४० ते ५० हजार मिळते . ऊस लोळण्याचे प्रमाण कमी राहून उसाचे सरासरी वजन २ ते ३ किलोपर्यंत मिळते . रोप लागण पद्धतीत नेहमिच्या लागणीस ३० - ४० दिवसंपर्यंत जोपासण्याची लागणारे पाणी , तननियंत्रान , खते , देखरेख यामध्ये बचत होते . अशा वेळी पाउस १ ते १.५ महिना लांबला तरी उसाची रोपे लागण करून हंगाम साधता येतो . काही वेळेस अगोदरचे पिक काढणीस उशीर होतो किंवा जास्त पावसाने वापसा नसल्याने वेळेवर लागण करता येत नाही . उसाच्या दोन ओळीतील अंतर व रोपातील अंतर यावरून एकरी लागणाऱ्या ऊस रोपांची संख्या काढता येते . 

आंतरपिके 

आडसाली उसामध्ये भुईमुग , चवळी , सोयाबीन , भाजीपाला , तर पूर्वहंगामी उसामध्ये बटाटा , कांदा , लसून , पानकोबी , फुलकोबी , पालेभाज्या , हरभरा , वाटणा आणि सुरु  उसामध्ये उन्हाळी भूइमुग , पानकोबी , फुलकोबी , नवलकोल , मेथी , कोथिंबीर , गावर , भेंडी इ . पिके आंतरपीक म्हणून घेता येतात . 

ऊस बेने आणि प्रक्रिया 
बेने मळ्यात वाढविलेले १० ते ११ महिने वयाचे निरोगी , रसरशीत आणि अनुवांशिकदृष्ट्या शुध्द बेने वापर्ल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते . ऊस बेने लागणीपूर्वी १०० लिटर पाणी अधिक ३०० मिली मेलाठीओन अधिक १०० ग्राम बाविस्तीनाची १० मिनिटासाठी बेने प्रक्रिया केल्यानंतर जीवाणूंची बीज प्रक्रिया करावी . यामुळे बुरशीजन्य रोग आणि खवले किडीचा बंदोबस्त होतो . 

असेटोबाक्टोर आणि स्फुरद विरघालणारे जीवाणू खताचे प्रमाण अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात उसाच्या टिपऱ्या ३० मिनिटे बुडवून लागण करावी . यामुळे नत्राखतामध्ये ५० टक्के ची तर स्फुरद खतामध्ये २५ टक्के बचत करता येते . 

एकात्मिक खत व्यवस्थापन 
रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी झाली आहे . यासाठी सेंद्रिय , जैविक आणि रासायनिक अशी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे . 

सेंद्रिय खते 
सुरु , पूर्वहंगामी व आडसाली उसासाठी प्रती हेक्टरी अनुक्रमे २० ( ४० गाड्या ) , २५ ( ५० गाड्या ) व ३० ( ६० गाड्या ) टन शेणखत अथवा पाचताचे काम्पोष्ट खत प्रती हेक्टरी ७.५ टन ( १५ गाड्या ) , प्रेसमड केक प्रती हेक्टरी ६ टन ( १२ गाड्या ) आणि गांडूळ खत प्रती हेक्टरी ५ टन ( १० गाड्या ) ऊस लागवडीपूर्वी दुसर्या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सारी सोडण्यापूर्वी द्यावी . शेणखत अथवा काम्पोष्ट खताची उपलबद्धता नसल्यास ताग , धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय वापर करावा .  

ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खते 

ठिबक सिंचनातून देण्यासाठी युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळनारे उत्तम नत्रयुक्त खत आहे . लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसाच्या अंतराणे समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते . पारंपारिक स्फुरदयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यात ऊस लागणीचे वेळी व मोठ्या बांधणीचे वेळी जमिनितून द्यावीत .