Details
ह्युमिनोझ :-
(1) हे औषध जमिनीतून पिकास दिले असता पांढऱ्या मुळांची संख्या जबरदस्त वाढविते.
(2) जमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढवून शेण खताचा वापर कमी करते.
(3) जमिनीतील अन्नद्रव्य झाडाला पुरविते.
पर्यायी रासायनिक खतांच्या वापरामध्ये बचत झाल्यामुळे खर्च कमी होऊन
उत्पादनात भरपूर वाढ होते.
या औषधांमध्ये प्रामुख्याने ह्युमिक ॲसिड असल्यामुळे या बद्दलची सविस्तर माहिती.
ह्युमिक ॲसिड मुळे मातीची रचना सुधारते. तसेच पिकांची नत्र स्फुरद पालाश शोषून घेण्याची क्षमताही सुधारते. मातीचा सामू स्थिर ठेवण्यास फायदेशीर ठरते. नत्र स्थिरीकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरून काढते. याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत राहण्यास फायदेशीर ठरते . ह्युमिक ॲसिड वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणार्या बुरशीची वाढ होऊन या बुरशीमुळे मातीपासून उद्भवणारे रोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ह्यूमस युक्त मातीमधील जनधारणा क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणूनच दुष्काळ युक्त भागात ह्युमिक ॲसिड वापर खूप महत्त्वाचा आहे.जमीन हलकी होऊन त्यात हवा खेळती रहाते. व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद कॅल्शिअम लोह यांचे उपलब्ध रूप तयार होते. व पिकांस हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात मिळतात. बीजप्रक्रिया म्हणून वापर केल्यास बीजाची उगवण चांगली होण्यास मदत होते. ह्युमिक ॲसिडच्या वापरामुळे जिवाणूंना कार्बन पुरविला जातो. व त्यामुळे जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते. सोडियम व इतर विषारी रसायनापासून मातीवर होणारे दुष्परिणाम थांबविण्यास हे अतिशय उपयोगी पडते. युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीस नापीक होण्यापासून वाचविते. रासायनिक खताची कार्यक्षमता 30% परियंत वाढविते. त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ जलद गतीने होते पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.
उपयोग :-
4 माही पिकांसाठी
फवारणीस प्रमाण
प्रति पंप 16 ते 20 लिटर पाण्यास
25 ते 50 मिली
ड्रिप द्वारे :-अर्धा ते 1 लिटर
12 माही पिकांसाठी